उत्पादन वाढीसाठी ताणांच्या स्थितीतही नैसर्गिक यंत्रणा होते कार्यरत
ताणाच्या स्थितीतही पिकांचे उत्पादन वाढविणाऱ्या वनस्पतीतील एका नैसर्गिक यंत्रणेचा शोध अमेरिकेतील डुरहॅम विद्यापीठातील संशोधकांना लागला आहे. त्यामुळे ताणांच्या स्थितीत वाढ खुंटून पिकांच्या उत्पादनामध्ये होणारी घट रोखणे शक्य होणार असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे. हे संशोधन जर्नल डेव्हलपमेंटल सेल मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. तसेच या तंत्राच्या स्वामीत्व हक्क (पेटंट) साठी अर्ज करण्यात आला आहे.
हवामान बदलाच्या काळात वनस्पतींना विविध ताणांना सामोरे जावे लागते. या कालावधीमध्ये पिकांच्या उत्पादनामध्ये घट येते. काही वेळा पिकांची वाढ खुंटते. अवर्षण, मातीतील क्षारांचे अधिक प्रमाण अशा ताणाखाली वनस्पती अनेक कार्ययंत्रणांचा वेग कमी करून किंवा थांबवून तग धरण्याच्या दृष्टीने ऊर्जेची बचत करतात. त्यासाठी वनस्पतींच्या वाढीसाठी कारणीभूत ठरणाऱ्या संजीवकांच्या (जिबरेलिन) निर्मितीवर नियंत्रण आणले जाते. त्यामुळे पिकांची वाढ कमी होऊन उत्पादनामध्ये घट येते. या समस्येवर मात करण्यासाठी डुरहॅम पीक सुधारणा तंत्रज्ञान संस्थेच्या नेतृत्वाखाली नॉटिंगहॅम विद्यापीठ, रोथॅमस्टेड संशोधन आणि वारविक विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन केले आहे. या संशोधनामध्ये वनस्पतीमध्ये वाढीचे जिबरेलिन या संप्रेरकाशिवाय नियंत्रण करण्याची नैसर्गिक क्षमता असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे ही क्षमता पर्यावरणातील ताणांच्या कालावधीमध्येही कार्यरत असते. या प्रक्रियेसाठी वनस्पती एक सुधारीत प्रथिन ( त्याला संशोधकांनी सुमो SUMO हे नाव दिले आहे.) तयार करते. हे प्रथिन वाढीवर नियंत्रण आणणाऱ्या प्रथिनांशी समन्वय साधून वाढीतील अडथळे दूर करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे संशोधकांचे मत आहे. त्याचा फायदा ताणांच्या स्थितीमध्येही अधिक उत्पादन मिळविण्यासाठी होऊ शकतो.
पिकामध्येही असते अशीच यंत्रणा
हे प्रयोग संशोधकांनी थेल क्रेस या प्रारुप वनस्पतीवर केले आहेत. ही वनस्पती युरोप आणि मध्य आशियामध्ये नैसर्गिकरीत्या आढळते. मात्र, अशाच प्रकारची यंत्रणा सध्याच्या पिकातील बार्ली,मका, भात आणि गहू पिकामध्येही असल्याचे संशोधकांना दिसून आले आहे.
-------------------
जर्नल संदर्भ ः
Lucio Conti, Stuart Nelis, Cunjin Zhang, Ailidh Woodcock, Ranjan Swarup, Massimo Galbiati, Chiara Tonelli, Richard Napier, Peter Hedden, Malcolm Bennett et al. Small Ubiquitin-like Modifier Protein SUMO Enables Plants to Control Growth Independently of the Phytohormone Gibberellin. Developmental Cell, January 2014 DOI: 10.1016/j.devcel.2013.12.004

ताणाच्या स्थिती तयार होत असताना वनस्पतीच्या वाढीवर नियंत्रण आणणाऱ्या विशिष्ट प्रथिनांची पातळी स्थिर ठेवणारी वनस्पतीतील रेण्वीय यंत्रणा प्रयोगात आढळली आहे. ही यंत्रणा जिबरेलिन संप्रेरकासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणेपेक्षा वेगळी आणि स्वतंत्रपणे कार्यरत असते. या यंत्रणेचा वापर ताणाच्या स्थितीतही वनस्पतीच्या वाढीसाठी होऊ शकतो. हे शेतकऱ्यांसाठी उत्पादनवाढीच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे.
- डॉ. अरी सदानंदोम, सहयोगी संचालक, डुरहॅम पीक सुधारणा तंत्र संस्था, डुरहॅम विद्यापीठ.
जर्नल संदर्भ ः
Lucio Conti, Stuart Nelis, Cunjin Zhang, Ailidh Woodcock, Ranjan Swarup, Massimo Galbiati, Chiara Tonelli, Richard Napier, Peter Hedden, Malcolm Bennett et al. Small Ubiquitin-like Modifier Protein SUMO Enables Plants to Control Growth Independently of the Phytohormone Gibberellin. Developmental Cell, January 2014 DOI: 10.1016/j.devcel.2013.12.004
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा