सोन्याचा साठा करणारे जिवाणू सापडले
सोने जमा करण्याचा हव्यास काही केवळ मानवामध्येच असतो असे नाही़, तर काही जिवाणूही सोन्याचे सूक्ष्म कण जमा करत असल्याचे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा येथे झालेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. हे जिवाणू सोने कण वाचविण्यामध्ये मोलाची भुमिका बजावू शकतील. हे संशोधन नेचर केमिकल बायोलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
जागतिक विनिमयाकरिता सोने हा मुलभूत आणि महत्त्वाचा धातू मानला जातो. सोन्याच्या खाण उद्योगामध्ये टाकाऊ समजल्या जाणाऱ्या घटकांपासूनही काही प्रमाणात सोने मिळवण्यासाठी एक प्रकारचे जिवाणू मदत करू शकतील, असे ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे. हे जिवाणू स्वतःच्या वाढीसाठी सोन्यातील विषारी घटकांचा वापर करतात. त्यासाठी अतिसूक्ष्म सुवर्णकण एकत्र करतात.
ऑस्ट्रेलियातील ऍडलेड विद्यापीठातील पर्यावरण जीवशास्त्रज्ञ फ्रॅंक रिथ हे सोने प्रक्रिया उद्योगासाठी उपयुक्त ठरतील अशा जिवाणूंबाबत संशोधन करत आहेत. त्यांना दहा वर्षापूर्वी प्रथम Cupriavidus metallidurans हे जैविक फिल्म वर आढळणारे जिवाणू सोन्याच्या कणावर आढळले होते. अधिक संशोधन केले असता हे जिवाणू सोन्याच्या अतिसूक्ष्म विषारी कण त्यांच्या पेशीत साठवून ठेवत असल्याचे आढळले आहे.
अन्य संशोधन
- जैविक फिल्मवर आढळणारी दुसरी जिवाणू प्रजाती Delftia acidovarans ही असून कॅनडा येथील मॅकमास्टर विद्यापीठातील संशोधक नॅथन मॅगार्वे आणि गटाने त्यावर संशोधन केले आहे. त्यांनी या जिवाणूंची वाढ सोन्याच्या द्रवामध्ये केली असता त्यांच्या वसाहतीच्या बाजूने सोन्याचे अतिसूक्ष्म कण जमा झालेले दिसले. या जिवाणूमध्ये पेशीच्या बाहेर हे कण होते. सी. मेटालड्युरॅन जिवाणूंच्या पेशीमध्ये हे कण आढळले आहेत.
सोनेरी जनुके
- जैवरसायने आणि जनुकिय विश्लेषणातून संशोधकांनी सोने एकत्रीकरणासाठीची जनुके आणि रासायनिक प्रक्रिया उलगडली आहे.
- ही जनुके वगळून जनुकिय सुधारीत जिवाणू तयार केले असता, त्यांनी सोने एकत्रीकरण केले नाही.
- Delftia acidovarans हे जिवाणू सोन्याचे कण आपल्या पेशीमध्ये येऊ न देता बाह्य भागात साठवतात. तर Cupriavidus metallidurans हे जिवाणू सोने धातूतील विषारीपणा कमी करून स्वतःच्या पेशीमध्ये सामावून घेतात.
- संशोधक रिथ यांनी सांगितले, की हे दोन्ही जिवाणू सहजिवी पद्धतीने राहू शकतात. त्यांच्या प्रक्रिया उलगडणे शक्य झाल्यास आजवर सोन्याचे जे कण मिळवणे शक्य होत नव्हते, तेही येत्या काही वर्षात मिळवता येतील.
-------------------
फोटोओळ ः सोने धातूचा विषारीपणा दूर करत काही प्रजातीचे जिवाणू सोन्याचा साठा जमा करतात. (स्रोत ः बर्ट्रान्ड रिजर, हेमिस, कोस)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा