वेलीच्या वेटोळ्यामागील रहस्याचा घेतला शोध
वेली झाडाभोवती किंवा आधाराभोवती स्वतःला गुंडाळत वाढत असतात. या मागील जैविक यंत्रणेबाबत अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन केले असून काकडीच्या वेलीतील आधार घेण्याच्या प्रक्रियेतील अंतर्गत रचनेवर प्रकाश टाकला आहे. पेशीय पातळीवर होणाऱअया बदलांचा अभ्यास केला असून त्यावर आधारीत अनेक प्रारुप विकसित केले आहेत. भविष्यात या रचनेचा वापर अधिक वैशिष्टपुर्ण अशा स्प्रिंग तयार करण्यासाठी होऊ शकतो. या प्रयोगाचे निष्कर्ष सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
काकडीच्या वेलीच्या सुरवातीची वाढ होताना लवचिक आणि मऊ प्रकारच्या गोलाकार धागे विकसित होतात. जेव्हा त्या ओढल्या असता सरळ होऊ शकतात. चपटी पातळ पट्टी रिळमधून सुट्टी केली असता, त्यांचे वेटोळे होते. तसेच काकडीच्या वेलीचेही होत असते. ही प्रक्रिया उलगडण्यासाठी संशोधकांनी भौतिकी प्रारूप, गणिती प्रारूप , पेशीय जीवशास्त्र आणि शास्त्राचा उपयोग केला. त्यातून काकडीच्या कॉयलींग ची प्रक्रिया उलगडली असून त्यातून जैविक स्प्रिंग कशा प्रकारे कार्य करतात, यावर प्रकाश पडला आहे.
काकडी घेवडा, द्राक्षे या सारख्या अनेक वेलीमध्ये आधार घेण्यासाठी वेटोळे तयार करण्याची पद्धत ही सामान्य आहे. वेल वनस्पतीची सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढ होत असताना सभोवतीच्या झाडे किंवा अन्य आधाराला घट्ट पकडले जाते. या प्रक्रियेची पेशीय आणि तंतूच्या पातळीवरील उलाढाल आजवर अज्ञात होती. त्याविषयीच्या कुतुहलातून हार्वर्ड विद्यापीठातील विविध साखांचे संशोधक एकत्र येऊन त्यांनी ही रचना उलगडण्याचा प्रयत्न केला. हार्वर्ड विद्यापीठातील अभियांत्रिकी आणि उपयोजित शास्त्र विभागातील गणिती संशोधक एल. महादेवन, लोला इंग्लंड डी वाल्पीन तसेच उत्क्रांती जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि वायस जैवि अभियांत्रिकी संस्था यांच्या संयुक्त संशोधनातून नैसर्गिक घटनेविषयी अधिक सखोल संशोधन करण्यात आले. त्याविषयी माहिती देताना संशोधक शेरॉन गेरबोडे यांनी सांगितले, की निसर्गाने आवश्यक ती ऊर्जा विषयक आणि यांत्रिकी प्रश्नाची सोडवणूक केलेली आहे. उत्क्रांतीच्या ओघात अत्यंत संथपणे त्यांनी योग्य ते काम पुर्ण केलेले आहे. मात्र अलिकडे या जैविक क्रियाचा अभ्यास शास्त्रीय आणि अभियांत्रिकी दृष्टीकोनातून होत आहे. वरवर पाहता काकडीचा वेल आधार घेताना वेटोळे कशा प्रकारे करतो, हा अत्यंत सोपा प्रश्न आहे. ही वेटोळी तयार होण्याची प्रक्रियेची वैशिष्टे प्रथमच दिसली आहेत.
काकडीच्या वेलीतील पेशीय रचना
काकडीची वेल ही आधार मिळेपर्यंत सरळ वाढत जाते. हा आधार मिळताच ती स्थिर होते. डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने लंबगोलाकार आकार मिळत जातो. या दोन्ही लंबगोलाकाराचा मध्य तो आधार असतो. त्यानंतर वेटोळ्याची दिशा बदलली जाते. संशोधिका गेरेबोडे आणि सहकाऱ्यांनी या वेटोळ्यातील पेशी आणि तंतूच्या प्रकारावर लक्ष केंद्रीत केले.
- तंतूमय रिबन ही धाग्यांसारक्या जिलॅटीनोस फायबर पेशी या वाढीच्या टप्प्यावर पुर्ण लांबीच्या असतात. या रिबनला ताकद देण्यासाठी दोन जाड असे पेशींचे थर कोणत्याही स्नायूंची मदत न घेता लंबगोलाकर तयार करतात. एका बाजूच्या पेशी या आकुंचित झाल्याने त्यांना गोलाकार प्राप्त होतो.
...असे आहे संशोधन
पेशीय माहिती गोळा झाल्यावर संशोधिका गेरबोडे आणि सहलेखक जोशूआ पुझे यांनी सिलीकॉन पासून तंतूची रिबन तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यावेळी टेलिफोनची वायर आपल्या नेमकी समोर येते. त्या दुव्याचा वापर करून पुन्हा जी फायबरच्या रचनेविषयी त्यांच्या आकुंचन आणि प्रसरण पावण्याच्या गुणधर्माविषयी अभ्यास करण्यात आला. पेशीभित्तिकेच्या विशिष्ट रचनेमुळे वेलींना आधार पकडणे शक्य होते. या आधी पेशीतील लिग्नीन या घट्ट पकडण्यासाठी कारणीभूत असल्याचे मत होते. मात्र केवळ रचनेतून ही ताकद मिळत असल्याचे आता पुढे आले आहे.
- त्यानंतर या विचारावर आधारात रिबन सिलीकॉन आणि तांब्यापासून बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात सिलीकॉनच्या पट्टीने दोन लंबवर्तुळाकार आकार मिळवला. तो काकडीच्या वेटोळ्यासारखा होता.
- जैविक पातळीवर घडणाऱ्या घटनाचा वेध घेण्यासाठी महादेवन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वेलीच्या पेशीतील पाण्याच्या पातळीचा अभ्यास केला. या सर्व प्रक्रियेमध्ये पेशीतील पाण्याची पातळी महत्त्वाची भूमिका निभावत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे वेलीची वेटोळी वाळवली. त्यांची तसाच घट्ट आकार मिळाला. शक्यतो लिग्निन हे पाण्याला दूर ठेवणारे मानले जाते. माहदेवन यांनी नव्या वेटोळ्यातील आणि जुन्या वेटोळ्यातील यांत्रिकी प्रतिक्रिया अजमावण्यात आल्या. त्यात जुन्या वेटोळ्यात ओढण्याच्या विरूद्ध अधिक ताकद दिसून आली. त्यातून आधी मांडलेली रचना आणि रचनेवर आधारीत संगणकिय प्रणाली यांची तुलना करण्यात आली.
असा होईल रचनेचा उपयोग
- एकाच वेळी लवचिक आणि वेलींचे पुर्ण वजन पेलू शकेल, असी ही रचना आहे. ही रचना मिलविण्यासाठी वनस्पतीला उत्क्रांतीमध्ये कितीतरी हजार वर्षाचा कालावधी लागला असला तरी त्यामागील तत्त्व समजल्यास अनेक रचनामध्ये त्याचा वापर करणे शकय होईल.
- या रचनेवर आधारीत अधिक लवचिक आणि ताकदवान स्प्रिंग विकसित करणे शक्य होणार आहे.- सध्या असा कोणताही पदार्थ किंवा वस्तू निर्माण करण्याच्या उद्देशाने हे संशोधन केलेले नाही. या तंत्रज्ञानाचे पेटंट वायस संशोधन संस्थेच्या माध्यमातून मिळविण्यात येणाऱ अशल्याचे संशोधकांनी सांगितले.
जर्नल संदर्भः
S. J. Gerbode, J. R. Puzey, A. G. McCormick, L. Mahadevan. How the Cucumber Tendril Coils and Overwinds. Science, 2012; 337 (6098): 1087 DOI: 10.1126/science.1223304
---------
फोटोओळः काकडीच्या वेलीचे वेटोळे (वर) आणि तंतूची फायबर रिबन (खाली) या एकाच प्रकारे कार्य करतात. त्यांच्या पेशीय रचनेचा अभ्यास करून नव्या पद्धतीची स्प्रिंग तयार करणे शक्य होईल. ( स्रोतः जोशुआ पुझे आणि शेरॉन गेरबोडे)
--------