स्टिंक बगसाठी गंध सापळे होताहेत विकसित
अमेरिकेतील फळबागेतील हानीकारक कीडींचे जैविक नियंत्रण शक्य
गेल्या दशकामध्ये अमेरिकेमध्ये पहिल्यांदा तपकिरी रंगाचे स्टिंक बग ( BMSB) आढळले होते. आता त्यांचा प्रादुर्भाव जवळजवळ 39 राज्यामध्ये आढळून येतो. त्याचा प्रादुर्भाव फळबागा, भाजीपाला आणि अन्य काही पिकांमध्ये दिसून येतो. अमेरिकेतील सर्वाधिक हानीकारक कीडीमध्ये या कीडीची गणना केली जाते. या कीडीच्या नियंत्रणासाठी अमेरिकन कृषी संशोधन संस्थेच्या बेल्टव्हिले येथील जैविक कीड नियंत्रण आणि वर्तणूक प्रयोगशाळेतील संशोधकांनी संशोधन केले आहे. या कीडीचा जनुकिय अभ्यास केला असून त्यांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या गंधाचे विश्लेषण केले आहे. त्यांचा या कीडींना आकर्षित करणारे व्यावसायिक सापळे बनविण्यासाठी उपयोग करण्यात येणार आहे. या दोन्ही संशोधनामुळे या कीडीचे चांगल्या प्रकारे नियंत्रण करणे शक्य होणार आहे. हे संशोधन ऍग्रीकल्चरल रिसर्च मॅगेझीन या अमेरिकेतील संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.
गंध विषयक संशोधन
- एआरएस मधील रसायनतज्ज्ञ ऍशोट ख्रिमियन व सहकाऱ्यांनी या कीडीतील आक्रमकतेसाठी कारणीभूत असलेला गंध ओळखला आहे. हा गंध खाद्य खाणाऱ्या नर- मादी आणि त्यांच्या पिल्लांनाही आकर्षित करतो. जेव्हा हा गंध अन्य गंध रसायने ( स्टेरियोआयसोमर ) यांच्या सोबत मिसळला जातो. त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो.
- ख्रिमियन आणि ऐजून झांग यांनी नेमका स्टेरियोआयसोमर घटक ओळखण्याचे संशोधन पूर्ण केले आहे. स्टिंक बग अन्य कीडींना आकर्षित करण्यासाठी त्याचा वापर करतात. त्यामध्ये हा गंध अधिक काळ टिकण्यासाठी अन्य घटक रसायने मिसळून त्याचेही फॉर्म्यूलेशन बनविले आहे. त्याच्या 2012 च्या उन्हाळ्यामध्ये विविध प्रक्षेत्रावर चाचण्या घेऊन कीडींचे आकर्षित होण्याचे संख्येतील प्रमाण मिळवले आहे. या चाचण्याच्या माहितीवर आधारित पेटंटसाठी अर्ज दाखल केला आहे.
जनुकिय संशोधन
वेल्टसव्हिले येथील संशोधिका डॉन गुंडेरसेन-रिन्डाल हे स्टिंक बग या कीडीचा जनुकिय अभ्यास करत असून नियंत्रणासाठी त्याचा फायदा होणार आहे. तसेच गुंडेरसेन-रिन्डाल या होस्टन (टेक्सास) येथील बेलॉर वैद्यकीय महाविद्यालयातील संशोधकांसह स्टिंक बगचे जनुकिय नकाशा तयार करण्यासाठी संशोधन करत आहे. त्यामुळे या कीडीच्या नियंत्रणासाठी त्याचा लाभ होईल.
अधिक माहितीसाठी ः http://www.ars.usda.gov/is/AR/archive/jan13/stinkbug0113.htm
-

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा