तण नियंत्रणासाठी मका जाती चीनमध्ये होताहेत विकसित
सनफ्लॉवर ब्रुमरेप या परजिवी तणांच्या नियंत्रण होईल शक्य
मका या पिकाची लागवड अन्न, पशुखाद्य आणि इंधनासाठी जगभर केली जाते. मात्र चीनमधील संशोधकांना मका या पिकामध्ये ब्रुमरेप या परजिवी तणांचे नियंत्रण करण्यासाठी सापळा पीक म्हणून उपयुक्त असल्याचे आढळले आहे. या अभ्यासावर आधारीत योग्य गुणधर्माच्या मका जाती पैदास करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी करण्यात आला असून भविष्यामध्ये मका या पिकाला तण नियंत्रक अशी नवी उपयुक्त ओळख मिळणार आहे. हे संशोधन क्रॉप सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
हानीकारक परजिवी तण ः
आशिया, आफ्रिका आणि आग्नेय युरोप या खंडामध्ये भाज्या आणि अन्य पिकामध्ये सनफ्लॉवर ब्रुमरेप हे परजिवी तण प्रामुख्याने आढळून येते. या तणामध्ये हरितद्रव्य नसल्याने ते पाणी आणि अन्नद्रव्यासाठी पुर्णपणे यजमान पिकावर अवलंबून असते. सुर्यफूल पिकामध्ये या तणांचा प्रादुर्भाव झाल्या उत्पादनामध्ये सुमारे 50 टक्क्यापर्यंत घट येते. चीनमध्ये सुर्यफूल हे महत्त्वाचे तेलबिया पीक असून एकूण क्षेत्राच्या सुमारे 64 टक्के ( 24 हजार हेक्टरपेक्षा अधिक) पिकावर या तणांचा प्रादुर्भाव दिसून येतो.
असा झाला अभ्यास
- ब्रुमरेप या तणांचे नियंत्रण करण्यासाठी रासायनिक आणि लागवडीच्या विविध पद्धतीचा वापर सध्या केला जातो. गेल्या काही अभ्यासामध्ये या तणांचे अंकुरण थांबवण्यासाठी सापळा पीकांचा वापर काही प्रमाणात फायदेशीर दिसून आला होता. त्या पद्धतीला आत्मघाती अंकुरण असे म्हटले जाते.
- तणाचे पुर्णपणे नियंत्रण करण्यासाठी चीनमधील आग्नेय ए आणि एफ विद्यापीठातील संशोधक यॉंगक्विंग मा आणि सहकाऱ्यांनी मका या पिकाचा सापळा पीक म्हणून उपयोग करण्यासाठी अभ्यास केला आहे.
- चीनमध्ये मका आणि सूर्यफूल या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. मका या पिकावर ब्रुमरेप या तणाचा प्रादुर्भाव होत नाही.त्यामुळे सूर्यफूलामध्ये मक्याच्या काही ओळी पेरून तणाला अटकाव करणे शक्य आहे. त्याचवेळी या मक्यापासून जनावरासाठी चारा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
-विविध मका जातीचे ब्रुमरेप च्या अंकुरणावर होणारे परिणाम तपासण्यात आले. त्यामध्ये संकरीत आणि साध्या दोन्ही वाणांचा वापर केला गेला. त्यातील एक संकरीत जात आणि तिची मुळ प्रजाती ही सर्वाधिक अंकुरण दर देणारी आहे.
- सापळा पीक म्हणून वापर करतानाच मका पिकाच्या मुळा, कोंबाचा रस वापरण्याबरोबरच मुळाशेजारची माती यांचा तणावर होणारा परिणाम पाहण्यात आला. त्यामध्ये मुळांच्या रसामुळे कोंबाच्या रसाच्या तुलनेत अधिक अंकुरण मिळते.
- अंकुरणासाठी कारणीभूत रसायनामध्ये स्ट्रिगोलॅक्टोन हे महत्त्वाचे असते. ते मक्याच्या मुळामध्ये तयार होते.
तण नियंत्रक मका जाती विकसनासाठी कार्यक्रम
- या अभ्यासावर आधारीत ब्रुमरेप या तणामध्ये आत्मघाती अंकुरणायोग्य मक्याच्या जाती पैदास करण्यासाठी कार्यक्रमाची आखणी करण्यात आली असून भविष्यात मका हे पीक ब्रुमरेप या तणांच्या नियंत्रणासाठी वापरणे शक्य होईल.
- सूर्यफूलामध्ये मक्याचे सापळा पीक जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्यासाठी फायद्याचे ठरेल. त्यातून त्याचा खर्च वसूल होईल.
फोटोओळ1ः सूर्यफुलामध्ये आढळणारे ब्रुमरेप परजिवी तण (Orobanche cumana)
फोटोओळ 2 ः सुर्यफूलावर परजिवी ब्रुमरेप तणांच्या प्रादुर्भाव
जर्नल संदर्भ ः
Yongqing Ma, Jinnan Jia, Yu An, Zhong Wang, Jianchang Mao. Potential of Some Hybrid Maize Lines to Induce Germination of Sunflower Broomrape. Crop Science, 2012; DOI: 10.2135/cropsci2012.03.0197
-

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा