प्रदूषण टाळण्यासाठी वाफ्यामध्येच वापरता येतील गाळण घटक
तीन प्रकारच्या गाळण घटकांपासून बनविलेल्या वाफ्यांतून निचरा होणाऱ्या पाण्यातील प्रदूषित घटकांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून आले असून, वनस्पतींच्या वाढीवर कोणताही परिणाम होत नाही. 16 पैकी 11 प्रजातीच्या वनस्पती रेन गार्डनमध्ये वाढविण्यास योग्य असून, त्यांची शिफारस केली आहे. पाण्यांचाहे वापर पिकांच्या वाढीसाठी करण्याच्या उद्देशाने नुकताच अभ्यास करण्यात आला. त्यामुळे अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये पाण्याच्या स्रोतांचे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. हे संशोधन हॉर्ट सायन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
पावसाळी प्रदेशामध्ये अधिकच्या पाण्याचा निचरा होऊन परिसरातील पाण्याचे स्रोत प्रदूषित होतात. त्याचा परिणाम जलचर आणि वन्य जीवांवर होतानाच पिण्यासाठी व वापरासाठीही पाणी असुरक्षित होत जाते. या उपाय शोधताना रेन गार्डनमधून निचरा होणाऱ्या पाण्याचा पुनर्वापर पिकांच्या वाढीसाठी करण्याच्या दृष्टीने नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठातील संशोधिका हेलेन कराऊस व रिबेका तुर्क यांनी अभ्यास केला.
- प्रदुषकांचे प्रमाण कमी ठेवण्यासाठी वाफ्यामध्येच गाळण घटकांचा वापर केला. त्यामुळे वाहते पाणी अडवणे, त्याचा प्रदूषित निचरा कमी करणे शक्य होते.
- वाफ्यामध्ये तीन प्रकारच्या गाळण घटकांचा वापर केला. त्यामध्ये
1. 80 टक्के स्वच्छ वाळू, 15 टक्के चिकण माती, 5 टक्के पाईनच्या साली.
2. 50 टक्के सॅण्डी लोम सॉईल, 50 टक्के पाईनच्या साली,
3. स्लेट आधारीत घटक 80 टक्के, 20 टक्के पाईनच्या साली.
- हे तिन्ही गाळण घटकांची मुरण्याचा, निचरा दर वेगळा असून, रासायनिक गुणधर्मही वेगळे आहेत.
- घटकांनी बनविलेल्या वाफ्यामध्ये झाडे, झुडूपे, गवते यासारक्या भिन्न प्रकारच्या वनस्पतींची लागवड केली गेली.
असे होत निष्कर्ष ः
- वाळूआधारीत गाळण घटक नत्राशिवाय अशा प्रदूषकांचे प्रमाण चांगल्या प्रकारे कमी करतात.
- माती आधारीत घटकांतून अधिक स्फुरद तीव्रता बाहेर पडते.
- स्लेट आधारीत घटकामध्ये नत्र आणि स्फुरद चांगल्या प्रकारे धरून ठेवले जाते.
- अभ्यासाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये वनस्पतींची वाढ, मुळांची वाढ चांगल्या प्रकारे झालेली दिसली.
--------
रेन गार्डनमधील लागवडीच्या वेळचे छायाचित्र. नॉर्थ कॅरोलिना येथील अशा 12 बागांतील 16 वनस्पती प्रजातींचा अभ्यास करण्यात आला. (स्रोत ः हेलेन कराऊस)
--------------------------------

ब्लॉग प्रशासकाने ही टिप्पण्णी हटविली आहे.
उत्तर द्याहटवा