सिलीकॉन मुलद्रव्य उत्पादनवाढीसाठी महत्त्वाचे...
फिलीपिन्स येथे भात उत्पादनवाढीसाठी राबवला लेगाटो प्रकल्प
सिलीकॉन या मुलद्रव्याचा भात पिकासह विविध पिकांच्या उत्पादनामध्ये वाढ मिळत असल्याचे गेल्या काही वर्षामध्ये होत असलेल्या संशोधनामध्ये दिसून आहे. त्या संदर्भात फिलिपिन्स व व्हियतनाम येथील प्रक्षेत्रामध्ये अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये अन्नसुरक्षिततेसाठी आवश्यक अशा भात, गहू आणि बार्ली सारख्या पिकांमध्येही या मुलद्रव्याचा फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.
सिलीकॉन हे पृथ्वीतलावर ऑक्सिजननंतर दुसरे महत्त्वाचे मुलद्रव्य असूनही दीर्घकाळ पर्यावरणतज्ज्ञांनी त्याकडे दूर्लक्ष केले होते. अनेक कृषीतज्ज्ञ अद्यापही पिकासाठी आवश्यक मुलद्रव्यामध्ये त्याचा समावेशही करत नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षापासून सातत्याने होत असलेल्या संशोधनातून विविध पिकांच्या वाढीसाठी सिलीकॉन अत्यंत महत्त्वाचे ठरत असल्याचे समोर येत आहे. सध्या सीलीकॉनच्या वापर व पर्यावरणातील त्यांच्या फिरत्या चक्रांसंदर्भात अभ्यास करण्यासाठी लेगाटो (LEGATO ) या आंतरशाखीय प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत व्हियतनाम येथील प्रदेशामध्ये सीलीकॉनच्या पर्यावरणातील साखळीबाबत अभ्यास करण्यात आला, तर फिलिपिन्स येथे सिलीकॉन या मुलद्रव्यांचा भात उत्पादनामध्ये विविध घटकांवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यात आला. सिलीकॉनमुळे पिकांची कीडरोग प्रतिकारकता आणि अजैविक ताण सहनशीलता विकसित होण्यास मदत होते. त्याचा फायदा भातासारख्या मुख्य अन्न पिकांच्या उत्पादनवाढीसाठी होऊ शकतो. त्या दृष्टीकोनातून या मुलद्रव्यांचा सखोल अभ्यास करण्यात येत आहे. फिलिपिन्स येथील लागुना प्रांतामध्ये सीलीकॉन साखळी आणि शेतामध्ये त्याचा ताळेबंद मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याविषयीचे निष्कर्ष जर्नल प्लॅंट ऍण्ड सॉईल रिपोर्टस मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
- सिंचनाच्या पाण्याद्वारे सीलीकॉन मोठ्या प्रमाणात पिकापर्यंत पोचत असतो. मात्र, पावसाच्या पाण्यामध्ये सिलीकॉनची तीव्रता ही प्रयोगशाळेत केल्या जाणाऱ्या परिक्षणाच्या मर्यादेपेक्षा कमी असते. त्यामुळे पावसाचे पाणी सिलीकॉनचा महत्त्वाचा स्रोत नसल्याचे संशोधक मानतात.
- मातीच्या कणाच्या विरघळण्यातून पिकांना उपलब्ध होणारे सिलीकॉन हा एक महत्त्वाचा स्रोत ठरतो. विशेषतः वाढीच्या अवस्थेत त्याचा फायदा होतो. लेगाटो प्रकल्पामध्ये विविध शेतकऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यामध्ये विविध शेतकरी हे भाताच्या काडाचा वापर भातासह अन्य पिकामध्ये खताप्रमाणे करत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, दीर्घकालीन विचार करता भात पिकातील सिलीकॉन पुर्नवापर व साखळीमध्ये अडथळे येऊ शकतात. ज्या भागामध्ये तीव्र हवामान आणि सिलीकॉनची कमतरता आहे, अशा ठिकाणी पिकांच्या उत्पादनामध्ये अडचणी येऊ शकतात. सध्या व्हियतनाम येथे झालेल्या चाचण्यामध्ये कमतरतेच्या अडचणी दिसून येते.
------------------------------

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा