शनिवार, २४ मार्च, २०१२

केळीवरील मर रोगासाठी फिलीपिन्स राबवतेय प्रतिबंधक उपाय


केळीवरील मर रोगासाठी फिलीपिन्स राबवतेय प्रतिबंधक उपाय
----------
केळीमध्ये येणाऱ्या कुज किंवा मररोगासाठी (बनाना विल्ट) नैसर्गिक उपायाचा अवलंब करण्यासाठी फिलिपिन्समधील कृषी विभाग प्रयत्न करत आहे. सध्या वापरण्यात येणाऱ्या
रासायनिक उपायाचा फारसा उपयोग होत नसल्याचे आढळून आले आहे. गेल्या वर्षी फिलीपिन्समध्ये सुमारे 200 हेक्टर केळीवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला होता.  त्यातही पीक
संरक्षणासाठी अधिक खर्च करू न शकणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतात या रोगामुळे अधिक नुकसान झाले होते. या रोगापासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी
फिलिपिन्समधील कृषी विभागाने डिसेंबर महिन्यामध्ये 253 दशलक्ष डाॅलरचा निधी दिला होता. तसेच या वर्षी 50 दशलक्ष डाॅलरचा निधी सर्वेक्षण, निरीक्षणे त्याचबरोबर या
रोगाविरूद्ध उपाययोजना करण्यासाठी विविध पर्यायाचा वापर करण्यासाठी देण्यात आला आहे.
असे राबवण्यात येताहेत उपाय
- त्या अंतर्गत पर्यायी केळी जाती विकसित करण्यासाठी पुढील पाच वर्षाचा कार्यक्रम राबवला जाणार आहे. त्यासाठी 200 दशलक्ष डाॅलरचा निधी संशोधन, विकास आणि
जातींच्या चाचण्यासाठी राखून ठेवला आहे. सध्या पीबीजीईए आणि कॅव्हाॅन्डीश जात जीसीटीसीव्ही 119 (फ्युजारीयम बुरशीसाठी प्रतिकारक )या जाती पनामा रोगासाठी
प्रतिकारक आहेत, त्यांच्या चाचण्या घेण्यात येत आहेत.
-  रोगबाधीत क्षेत्राला चांगल्या क्षेत्रापासून वेगळे ठेवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी  प्रादुर्भावित केळी शेतीच्या भोवतीची जमिनी भाताच्या तुसाच्या साह्याने भाजून
घेण्यात येत आहेत. तसेच फिलिपिनो केळी उत्पादक आणि निर्यातदार संघाच्या सहकार्यांने रोगग्रस्त रोपे व अन्य घटकांची वाहतूक थांबवण्यात आली आहे.
- रोगाचा प्रसार रोखण्यासाठी केळी उत्पादकांसाठी विविध प्रकारच्या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहेत.
- शास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव मारियो मोन्तेजो यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, की पनामा विल्ट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रोगाच्या नियंत्रणासाठी
वेगाने प्रयत्न केले जात आहेत. प्रतिकारक जाती विकसित करण्याबरोबर नैसर्गिक व जैविक घटकांचा वापर करण्यासाठी संशोधन केले जात आहे.
- सध्या ट्रायकोडर्मा या बुरशीचा वापर रोप प्रक्रियेसाठी करण्यात येत आहे. त्यामुळे दोन महिन्यापर्यंत विल्टींग रोखणे शक्य असल्याचे पुढे आले आहे.मात्र त्याचे देशांतर्गत
उत्पादन फार कमी आहे. ते वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. 73 टक्के प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रावर ट्रायकोडर्माचा वापर फायदेशीर ठरला आहे. 

हरित बॅटरी- लिग्निनचा कॅथोड म्हणून वापर


सध्या रिचार्जेबल बॅटरीमध्ये लिथीयम आणि अन्य धातूंचा वापर केला जातो. या रिचार्जेबल बॅटरी हा ऊर्जेचा चांगला पर्याय असल्याने त्याचा वापर अनेक उपकरणामध्ये केला जातो. कॅमेरा, मोबाईल, लॅपटाॅप या सारखी आधुनिक इलेक्ट्राॅनिक उपकरणे तर त्याशिवाय शक्यच नाहीत. लिथीयम, कोबाल्टसारख्या धातूचा वापर कमी करण्यासोबतच कागद आणि त्यांच्या लगदा यांचा वापर करण्यासंदर्भात स्वीडनमधील पोझनॅन तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन केले आहे. या कागद आणि लगद्यापासून बॅटरीतील  कॅथोड विकसित करणे शक्य असल्याचे संशोधन पुढे आले आहे. लाकडामध्ये असलेल्या पेशी, फायबर आणि शिरा यांना जोडून ठेवणाऱ्या लिग्नीन या घटकाचा वापर संशोधक मिल्कझरेक आणि इन्गानास यांनी बॅटरीमध्ये केला आहे.
- प्रति वर्ष कागद उद्योगामध्ये 35 ते 45 दशलक्ष मेट्रीक टन तपकिरी लिक्वर या नावाने ओळखले जाणारे उपपदार्थ तयार होतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लिग्निन हा घटक असतो. त्याचा वापर या हरीत बॅटरीमध्ये करणे शक्य आहे.
असे आहे संशोधन
- संशोधकांनी या लिग्निन गटकापासून कॅथोड विकसित करून त्याच्या विविध जाडीसाठी चाचण्या घेतल्या आहेत. या लिग्निन घटकाच्या विद्युतरोधक गुणधर्मासोबत पाॅलिपायराॅलच्या विद्युतवाहक गुणधर्माचा वापर करून एक विद्यात चार्ज धरून ठेऊ शकेल, असा पदार्थ विकसित केला आहे. याचे निष्कर्ष सायन्स या नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
- या प्रकारच्या बॅटरी कार्यरत नसताना लवकर डिसचार्ज होतात. त्यासाठी सध्या संशोधन करण्यात येत आहे.

हरीत बॅटरी - कॅथोड म्हणून लिग्निन


सध्या रिचार्जेबल बॅटरीमध्ये लिथीयम आणि अन्य धातूंचा वापर केला जातो. या रिचार्जेबल बॅटरी हा ऊर्जेचा चांगला पर्याय असल्याने त्याचा वापर अनेक उपकरणामध्ये केला जातो. कॅमेरा, मोबाईल, लॅपटाॅप या सारखी आधुनिक इलेक्ट्राॅनिक उपकरणे तर त्याशिवाय शक्यच नाहीत. लिथीयम, कोबाल्टसारख्या धातूचा वापर कमी करण्यासोबतच कागद आणि त्यांच्या लगदा यांचा वापर करण्यासंदर्भात स्वीडनमधील पोझनॅन तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन केले आहे. या कागद आणि लगद्यापासून बॅटरीतील  कॅथोड विकसित करणे शक्य असल्याचे संशोधन पुढे आले आहे. लाकडामध्ये असलेल्या पेशी, फायबर आणि शिरा यांना जोडून ठेवणाऱ्या लिग्नीन या घटकाचा वापर संशोधक मिल्कझरेक आणि इन्गानास यांनी बॅटरीमध्ये केला आहे.
- प्रति वर्ष कागद उद्योगामध्ये 35 ते 45 दशलक्ष मेट्रीक टन तपकिरी लिक्वर या नावाने ओळखले जाणारे उपपदार्थ तयार होतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लिग्निन हा घटक असतो. त्याचा वापर या हरीत बॅटरीमध्ये करणे शक्य आहे.
असे आहे संशोधन
- संशोधकांनी या लिग्निन गटकापासून कॅथोड विकसित करून त्याच्या विविध जाडीसाठी चाचण्या घेतल्या आहेत. या लिग्निन घटकाच्या विद्युतरोधक गुणधर्मासोबत पाॅलिपायराॅलच्या विद्युतवाहक गुणधर्माचा वापर करून एक विद्यात चार्ज धरून ठेऊ शकेल, असा पदार्थ विकसित केला आहे. याचे निष्कर्ष सायन्स या नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
- या प्रकारच्या बॅटरी कार्यरत नसताना लवकर डिसचार्ज होतात. त्यासाठी सध्या संशोधन करण्यात येत आहे.

पनामा उत्खननामध्ये उंटाच्या दोन प्रजाती आढळल्या

फ्लोरिडा विद्यापीठातील संशोधकांना पनामा कालव्याच्या परीसरामध्ये उत्खऩन करताना
दोन नव्या उंटाच्या प्रजाती असल्याचे आढळून आले आहे. त्याचा या उष्ण कटिबंधीय
प्रदेशातील जैवविविधता आणि पर्यावरणाच्या इतिहासावर नवा प्रकाश पडणार आहे. हे
संशोधन व्हर्टेब्रेट पॅलेन्टोलाॅजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकासित करण्यात आले आहेत.
अमेरिकेतील राष्ट्रीय शास्त्र फौऊंडेशनच्या अर्थसाह्याने 2009 पासून जीवसृष्टीच्या मागोवा
शास्त्र तसेच जीवाश्म तज्ज्ञ आणि भुवैज्ञानिक शास्त्रातील संशोधक पनामा कालव्याच्या
परिसरामध्ये उत्खनन केले जात आहे. त्यामध्ये प्राचीन काळी असलेल्या सस्तन
प्राण्याच्या प्रसाराचा, पर्यावरणाचा अभ्यास केला जात आहे. या बाबत माहिती देताना
संशोधक ब्रुस मॅकफॅडन यांनी सांगितले की, मध्य अमेरिकेमध्ये सुमारे 30 दशलक्ष
वर्षापुर्वी उंटाच्या Aguascalietia panamaensis and Aguascalientia minuta या दोन
प्रजाती होत्या, त्याचा प्रसार संपुर्ण अमेरिकेमध्ये झाला. ही प्रजाती सर्वात जुन्या सस्तन
प्राण्यापैकी एक असल्याचे आढळले आहे. यांच्या तोंडाचा जबडा हा मगरीसारखा लांब
असून सध्या असलेल्या उंटाच्या प्रजातीपेक्षा आकारामध्ये आणि जबड्याच्या आकारामध्ये
मोठ्या प्रमाणात फरक आहेत.
- उंट हे खुराच्या दृष्टीने गाई, बकरे, मेंढ्या , गरीण, म्हशी आणि डुकरे यांच्याशी जवळीक
असलेले आहेत. या प्रकारातील अन्य प्राणी या आधी मिळून आले आहेत. उंट हे प्राणी
प्राचीन काळापासून आढळून येत आहेत. मात्र त्यांचा प्रसार आणि रहिवास याबाबत फारच
कमी माहिती उपलब्ध आहे.
- सध्या असे मानले जाते की, 4 ते 5 दशलक्ष वर्षापुर्वी उत्तर अमेरिकेत त्याचा उगम
होऊन नंतर त्यांचा प्रसार दक्षिण अमेरिकेत झाला. त्यानंतर त्यांचे रुपांतर अमेरिकेतील
अलपॅका नावाच्या मेंढी, शेळ्या व अन्य प्राण्यामध्ये झाले असे मानले जाते.

शनिवार, १७ मार्च, २०१२

वनस्पती ही लक्षात ठेवतात अवर्षण

वनस्पती ही लक्षात ठेवतात अवर्षण
-----
येणाऱ्या अवर्षणानुसार बदलतात प्रतिक्रिया
-----
अवर्षणाचा सर्वात जास्त फटका हा वनस्पती आणि झाडांना बसत असतो. त्यामुले अवर्षणाशी लढण्यासाठी वनस्पती स्वतःची धोरणे, प्रतिक्रिया ठरवत असतात. दर काही वर्षानंतर
येणाऱ्या अवर्षणाचे टप्पे वनस्पती लक्षात ठेवत असल्याचे आढळून आले आहे. पाण्याचा पडलेला ताण, त्याचा कालावधी आणि त्यावेळी तग धरण्यासाठी करण्यात येणाऱ्या
वनस्पती अंतर्गत प्रक्रिया या साऱ्या गोष्टीचा लक्षात ठेऊन आगामी अवर्षणाशी लढताना उपयोग करून घेत असल्याचे अमेरिकेतील नेब्रास्का- लिन्कोलन विद्यापीठाच्या
वनस्पतीशास्त्रज्ञांना आढळले आहे. या संशोधनाचा उपयोग अवर्षणामध्येही योग्य प्रकारे तग धरू शकेल, अशा प्रकारची  पिक प्रजाती विकसित करण्यासाठी होऊ शकेल.
दर काही वर्षानंतर येणाऱ्या अवर्षणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. हे नुकसान शेतकऱ्याबरोबरच अन्य ग्राहकासाठीसुध्दा अन्न सुरक्षेसाठी धोका निर्माण करत असते. त्यामुळे या प्रश्नासाठी अमेरिकेतील नेब्रास्का -लिन्कोलन विद्यापीठातील संशोधक मायकेल फ्रोम यांनी संशोधन केले आहे.
सर्वसाधारणपणे रोपवाटिकामध्ये अनुभवावर आधारीत पुनर्लागवडीची पद्धत विकसित केली आहे. त्या पद्धतीमागील शास्त्रीय कार्यकारणभावाचा या संशोधनामुळे उलगडा होण्यास
मदत मिळणार आहे. हे संशोधन नेचर कम्युनिकेशनस या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले असून, राष्ट्रीय शास्त्र फाऊंडेशन या संस्थेने अर्थसाह्य केले होते.

असे झाले संशोधन
-संशोधकांनी अर्बीडॅाप्सिस या मोहरीच्या कुळातील वनस्पतीवर अभ्यास केला आहे. त्यासाठी वनस्पती मुलद्रव्यीय जीवशास्त्रज्ञ झोया अॅवरामोव्हा  आणि याॅग डींग यांनी ज्या वनस्पतीना आधी पाण्याचा ताण पडलेला आहे, अशा वनस्पतीच्या प्रतिक्रियांचा ज्या वनस्पतींना पाण्याचा ताण पडलेला नाही, अशा वनस्पतींशी तुलनात्मक अभ्यास केला. त्यामध्ये आधीही ज्या वनस्पतींनी ताणाचा सामना केला होता, त्या वनस्पती पुढील अवर्षणामध्ये लवकर जुळवून घेऊ शकतात. अन्य रोपे मात्र रोगांना लवकर बळी पडल्याचे आढळून आले आहेत. त्यांच्या पानामधील पाण्याचे बाष्पोत्सर्जन अधिक दराने होत असल्याचे आढळले आहे.
-संशोधकांना अवर्षणासाठी ट्रेनड रोपामध्ये या प्रतिक्रियासाठी जनुकांचा एक गट कार्यरत होऊन अधिक काम करू लागतात ज्यावेळी पाणी उपलब्ध होते, त्यावेळी ही जनुके पुन्हा
नेहमीप्रमाणे काम करू लागतात. मात्र ते हा अवर्षणाचा कालावधी लक्षात ठेवतात. पुढीलवेळी पाण्याची कमतरता भासल्यास ते अधिक प्रमाणात प्रतिक्रिया देतात. हे सर्व
मुलद्रव्याच्या पातळीवर होते.  त्यानंतर सलग पाच दिवस अधिक पाणी उपलब्ध झाल्यास अर्बीडाॅप्सिस नेहमीप्रमाणे कार्य करू लागतात. मात्र त्यांच्या स्मरणामध्ये या बाबी तसाच राहतात.
या आधी अशा प्रकारची स्मरणशक्ती यीस्टपेक्षा वरच्या सजीवामध्ये आढळली होती. सध्या हे संशोधन प्राथमिक पातळीवर असून आगामी काळात नव्या अवर्षणाला प्रतिकारक जाती पैदास करताना त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. तसेच अवर्षणाच्या मोठ्या कालावधीमध्ये उत्पादकता स्थिर ठेवणे किंवा वाढवणे शक्य होणार आहे.
- मात्र बागेमध्ये किंवा रोपवाटिकेमध्ये याचा लगेच वापर करणे शक्य असल्याचे सांगताना फ्रोम म्हणाले की रोपांचे पुनर्लागवड करण्यापुर्वी दोन तीन दिवस पाण्याचा ताण देऊन
पुन्हा एक दिवस पाणी देऊन त्यांची पुनर्लागवड करावी.