वनस्पती ही लक्षात ठेवतात अवर्षण
-----
येणाऱ्या अवर्षणानुसार बदलतात प्रतिक्रिया
-----
अवर्षणाचा सर्वात जास्त फटका हा वनस्पती आणि झाडांना बसत असतो. त्यामुले अवर्षणाशी लढण्यासाठी वनस्पती स्वतःची धोरणे, प्रतिक्रिया ठरवत असतात. दर काही वर्षानंतर
येणाऱ्या अवर्षणाचे टप्पे वनस्पती लक्षात ठेवत असल्याचे आढळून आले आहे. पाण्याचा पडलेला ताण, त्याचा कालावधी आणि त्यावेळी तग धरण्यासाठी करण्यात येणाऱ्या
वनस्पती अंतर्गत प्रक्रिया या साऱ्या गोष्टीचा लक्षात ठेऊन आगामी अवर्षणाशी लढताना उपयोग करून घेत असल्याचे अमेरिकेतील नेब्रास्का- लिन्कोलन विद्यापीठाच्या
वनस्पतीशास्त्रज्ञांना आढळले आहे. या संशोधनाचा उपयोग अवर्षणामध्येही योग्य प्रकारे तग धरू शकेल, अशा प्रकारची पिक प्रजाती विकसित करण्यासाठी होऊ शकेल.
दर काही वर्षानंतर येणाऱ्या अवर्षणामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. हे नुकसान शेतकऱ्याबरोबरच अन्य ग्राहकासाठीसुध्दा अन्न सुरक्षेसाठी धोका निर्माण करत असते. त्यामुळे या प्रश्नासाठी अमेरिकेतील नेब्रास्का -लिन्कोलन विद्यापीठातील संशोधक मायकेल फ्रोम यांनी संशोधन केले आहे.
सर्वसाधारणपणे रोपवाटिकामध्ये अनुभवावर आधारीत पुनर्लागवडीची पद्धत विकसित केली आहे. त्या पद्धतीमागील शास्त्रीय कार्यकारणभावाचा या संशोधनामुळे उलगडा होण्यास
मदत मिळणार आहे. हे संशोधन नेचर कम्युनिकेशनस या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले असून, राष्ट्रीय शास्त्र फाऊंडेशन या संस्थेने अर्थसाह्य केले होते.
असे झाले संशोधन
-संशोधकांनी अर्बीडॅाप्सिस या मोहरीच्या कुळातील वनस्पतीवर अभ्यास केला आहे. त्यासाठी वनस्पती मुलद्रव्यीय जीवशास्त्रज्ञ झोया अॅवरामोव्हा आणि याॅग डींग यांनी ज्या वनस्पतीना आधी पाण्याचा ताण पडलेला आहे, अशा वनस्पतीच्या प्रतिक्रियांचा ज्या वनस्पतींना पाण्याचा ताण पडलेला नाही, अशा वनस्पतींशी तुलनात्मक अभ्यास केला. त्यामध्ये आधीही ज्या वनस्पतींनी ताणाचा सामना केला होता, त्या वनस्पती पुढील अवर्षणामध्ये लवकर जुळवून घेऊ शकतात. अन्य रोपे मात्र रोगांना लवकर बळी पडल्याचे आढळून आले आहेत. त्यांच्या पानामधील पाण्याचे बाष्पोत्सर्जन अधिक दराने होत असल्याचे आढळले आहे.
-संशोधकांना अवर्षणासाठी ट्रेनड रोपामध्ये या प्रतिक्रियासाठी जनुकांचा एक गट कार्यरत होऊन अधिक काम करू लागतात ज्यावेळी पाणी उपलब्ध होते, त्यावेळी ही जनुके पुन्हा
नेहमीप्रमाणे काम करू लागतात. मात्र ते हा अवर्षणाचा कालावधी लक्षात ठेवतात. पुढीलवेळी पाण्याची कमतरता भासल्यास ते अधिक प्रमाणात प्रतिक्रिया देतात. हे सर्व
मुलद्रव्याच्या पातळीवर होते. त्यानंतर सलग पाच दिवस अधिक पाणी उपलब्ध झाल्यास अर्बीडाॅप्सिस नेहमीप्रमाणे कार्य करू लागतात. मात्र त्यांच्या स्मरणामध्ये या बाबी तसाच राहतात.
या आधी अशा प्रकारची स्मरणशक्ती यीस्टपेक्षा वरच्या सजीवामध्ये आढळली होती. सध्या हे संशोधन प्राथमिक पातळीवर असून आगामी काळात नव्या अवर्षणाला प्रतिकारक जाती पैदास करताना त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो. तसेच अवर्षणाच्या मोठ्या कालावधीमध्ये उत्पादकता स्थिर ठेवणे किंवा वाढवणे शक्य होणार आहे.
- मात्र बागेमध्ये किंवा रोपवाटिकेमध्ये याचा लगेच वापर करणे शक्य असल्याचे सांगताना फ्रोम म्हणाले की रोपांचे पुनर्लागवड करण्यापुर्वी दोन तीन दिवस पाण्याचा ताण देऊन
पुन्हा एक दिवस पाणी देऊन त्यांची पुनर्लागवड करावी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा