शनिवार, २४ मार्च, २०१२

हरीत बॅटरी - कॅथोड म्हणून लिग्निन


सध्या रिचार्जेबल बॅटरीमध्ये लिथीयम आणि अन्य धातूंचा वापर केला जातो. या रिचार्जेबल बॅटरी हा ऊर्जेचा चांगला पर्याय असल्याने त्याचा वापर अनेक उपकरणामध्ये केला जातो. कॅमेरा, मोबाईल, लॅपटाॅप या सारखी आधुनिक इलेक्ट्राॅनिक उपकरणे तर त्याशिवाय शक्यच नाहीत. लिथीयम, कोबाल्टसारख्या धातूचा वापर कमी करण्यासोबतच कागद आणि त्यांच्या लगदा यांचा वापर करण्यासंदर्भात स्वीडनमधील पोझनॅन तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन केले आहे. या कागद आणि लगद्यापासून बॅटरीतील  कॅथोड विकसित करणे शक्य असल्याचे संशोधन पुढे आले आहे. लाकडामध्ये असलेल्या पेशी, फायबर आणि शिरा यांना जोडून ठेवणाऱ्या लिग्नीन या घटकाचा वापर संशोधक मिल्कझरेक आणि इन्गानास यांनी बॅटरीमध्ये केला आहे.
- प्रति वर्ष कागद उद्योगामध्ये 35 ते 45 दशलक्ष मेट्रीक टन तपकिरी लिक्वर या नावाने ओळखले जाणारे उपपदार्थ तयार होतात. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लिग्निन हा घटक असतो. त्याचा वापर या हरीत बॅटरीमध्ये करणे शक्य आहे.
असे आहे संशोधन
- संशोधकांनी या लिग्निन गटकापासून कॅथोड विकसित करून त्याच्या विविध जाडीसाठी चाचण्या घेतल्या आहेत. या लिग्निन घटकाच्या विद्युतरोधक गुणधर्मासोबत पाॅलिपायराॅलच्या विद्युतवाहक गुणधर्माचा वापर करून एक विद्यात चार्ज धरून ठेऊ शकेल, असा पदार्थ विकसित केला आहे. याचे निष्कर्ष सायन्स या नियतकालिकामध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
- या प्रकारच्या बॅटरी कार्यरत नसताना लवकर डिसचार्ज होतात. त्यासाठी सध्या संशोधन करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा