आशियाई मेंढ्यांच्या जनुकिय संशोधनातून मिळाली नवी दिशा
आशियाई मेंढ्यांच्या जनुकिय विश्लेषणातून मेंढ्याच्या जैवविविधतेच्या वैशिष्ठांची उकल करण्याकडे जागतिक पातळीवर संशोधकांचा एक गट लक्ष देत असून, त्यातून मांस उत्पादनासाठी उपयुक्त अशा नव्या जातींची पैदास करणे शक्य होणार आहे. या संशोधनातून उपलब्ध जनुकिय माहितीमुळे आशियाई मेंढ्याच्या प्राचीन पैदास व व्यापार प्रक्रियेच्या दुहेरी स्थलांतरीत मार्ग ही शोधण्यात यश आले आहे. हे संशोधन जर्नल मॉलेक्युलर बायोलॉजी ऍण्ड इव्हाल्युशन या संशोधनपत्रिकेमध्ये येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये प्रकाशित होणार आहे.
सध्या मांसाच्या व लोकरीच्या किमतीमध्ये वेगाने वाढ होत असून, अन्न सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा मेंढी पालन व उत्पादनासंदर्भात अधिक सजग राहण्याची वेळ येत आहे. त्यासाठी चीन, इराण, पाकिस्तान, इन्डोनेशिया, नेपाळ, फिनलॅंड आणि इंग्लंड येथील संशोधक एकत्र आले असून, त्यांनी जगभरातील 42 स्थानिक जातींच्या मेंढ्यांचा जनुकिय अभ्यास सुरू केला आहे. त्यासाठी अत्याधुनिक अशा जनुकिय सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानांचा वापर केला जात आहे. या अभ्यासासाठी जागतिक पातळीवरील संशोधक एकत्र येत मानवांच्या सुरवातीच्या म्हणजेच सुमारे 10 हजार वर्षापूर्वीच्या जुन्या पशुपालन फार्मपासून आताच्या स्थानिक जातीच्या मेंढ्या जनुकिय अभ्यास करत आहेत.
असे आहे संशोधन
अझरबैजान, मोलदोवा, सर्बिया, युक्रेन, रशिया, कझाकिस्तान, पोलंड, फिनलॅंड, चीन आणि इंग्लंड या सारख्या देशातील स्थानिक जातींच्या सुमारे 42 मेंढी जातींचा संपूर्ण मायटोकॉन्ड्रीयल डीएनएचे विश्लेषण केले आहे. त्यात कझाकिस्तान येथील दोन जंगली जातींचाही समावेश आहे. या माहिती साठ्यांची तुलना ही अन्य देशातील 150 जातींशी करण्यात आली आहे.
- बिजिंग (चीन) येथील पशुधन आणि चारा जनुकिय स्रोत संयुक्त प्रयोगशाळा येथील वरीष्ठ शास्त्रज्ञ जियान- लिन हान यांनी सांगितले, की आशियातील मेंढ्यामध्ये सामान्यपणे युरोपातील मेंढ्याच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात जनुकिय विविधता आढळली आहे. या विविधतेचा उपयोग करून मंगोलिया आणि पश्चिम चीन येथील मेंढ्याच्या मांस उत्पादनामध्ये वाढ करणे शक्य आहे. त्यावर सध्या लक्ष केद्रीत केले आहे.
- आशियाई मेंढ्याच्या पूर्वापार मानल्या जात असलेल्या एक स्थलांतर मार्गाऐवजी दोन मार्ग या जनुकिय संशोधनातून पुढे आले आहेत. हान त्याविषयी माहिती देताना म्हणाले, की जगभरातील विविध ठिकाणाहून जमा केलेल्या 150 प्रजातींच्या हजारो नमुन्यांचे विश्लेषण केले असता त्यातून 8 ते 11 हजार वर्षापूर्वीच्या मेंढ्याच्या पहिल्यांदा पाळिव बनण्यापर्यंतची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानंतरच्या काळात पूर्वेकडे चीन आणि मंगोलियापर्यंत झालेला व्यापाराचा मार्ग विकसित झाला. हा आशिया आणि युरोप मधील मानवी व व्यापाराच्या स्थलांतराचा सुमारे 4 हजार मैलाचा मार्ग तयार झाला.
- हान आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कळपांसह स्थलांतराचा दुसरा मार्ग शोधला असून, त्यातून उत्तर चीन आणि मंगोलियातील वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती सुमारे 5 हजार वर्षापूर्वी तयार झाल्या. त्यानंतर त्यांच्या व्यापारातून, वेगवेगळ्या संकरातून विविध जातींची निर्मिती होत गेली. उदा. चेंगीझ खान व अन्य मंगोलियन योद्ध्यांसह मेंढ्याचाही प्रसार होत गेला.
-इंग्लंड येथील नॉटिंगहॅम विद्यापीठातील पशुधन जनुकशास्त्रज्ञ ऑलिव्हर हॅनोट्टे यांनी सांगितले, की या अभ्यासामध्ये आधुनिक मेंढ्याच्या प्रजातींचे प्राचीन जनुकिय सांधे जुळवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. गेल्या हजारो वर्षाच्या व्यापार व पैदास प्रक्रियेतून प्रथम पश्चिम ते पूर्व आणि नंतर पूर्व ते पश्चिम अशा प्रवासाचा वेध घेण्यात आला आहे.
पैदाशीसाठी पाया ठरणार हे संशोधन ...
- आशियातील लक्षावधी पशुपालकांना फायदेशीर ठरतील अशा जातींची पैदास करण्यासाठी या अभ्यासाचा उपयोग होणार आहे. प्रामुख्याने या अभ्यासातून मांस उत्पादनासाठी उपयुक्त ठरतील अशा जाती ओळखण्यात येत आहेत. सध्या एकट्या चीनमध्ये 2011 च्या तुलनेमध्ये मांसाच्या किमतीमध्ये 40 टक्क्यापेक्षा अधिकक वाढ झाली असून, मांस उत्पादनातून सामान्य पशुपालकांच्या उत्पन्नांमध्ये चांगली भर पडू शकते.
- जागतिक पातळीवर प्रामुख्याने लोकरी उत्पादनासाठी पैदाशीवर अधिक भर देण्यात आला असला तरी 1996 पासून लोकरीच्या किमतीमध्ये सातत्याने घट येत आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया, न्युझीलॅंड येथे मांस उत्पादनासाठी खास नव्या जाती विकसित केल्या जात आहेत. अर्थात, तिथे कुरणे आणि अधिक महागड्या पशुखाद्याचा वापर त्यासाठी केला जातो. या जातीच्या तुलनेमध्ये चीन व मंगोलिया येथील जाती या अधिक सशक्त आणि विविध वातावरणात तग धरणाऱ्या आहेत. या जाती चाऱ्याच्या शोधामध्ये मोठे अंतर पार करू शकतात.
- सध्या चीनमध्ये स्थानिक जाती व अर्गलीसारख्या जंगली जातींच्या संकरातून पैदास करण्याचे काही प्रयोग होत आहेत. मात्र, या प्रयोगातून निर्माण होणारी पैदास ही अन्य गुणधर्माचीही असण्याचा धोका आहे. हे धोके टाळण्यासाठी जनुकीय माहितीसाठी उपयोगी ठरणार आहे.
- चीनसह अन्य आशियाई देशामध्ये लहान पशुपालकांसाठी अन्न, उत्पन्न, कपडे आणि शेतीसाठी खत या सर्व प्रकारे त्यांचे छोटे कळप उपयोगी पडतात. त्यामुळे मेंढ्याच्या सुधारीत जाती विकसनातून त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये चांगली भर पडण्यास मदत होणार आहे.
- केनियामध्ये आंतरराष्ट्रीय पशुधन संशोधन संस्थेच्या संशोधकांनी मसाई पशुपालकांच्या लांब लोकर असलेल्या स्थानिक जातींपासून सुधारीत जात विकसित केली जाते. ही लाल मसाई जात वातावरणाला अनुकुल असून, पूर्व आफ्रिकेतील उष्णतेचा ताण व आतड्यातील कृमींना प्रतिकारक आहेत. तसेच अन्य जातींच्या तुलनेमध्ये कमी चाऱ्यांमध्ये अधिक मांस व दूधाचे कार्यक्षम उत्पादन मिळते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा