कोळ्यांच्या आहारात मांसाहाराबरोबर वनस्पतीजन्य घटकांचा समावेश
कोळी हे किटकांना खाऊन पिकांच्या संरक्षणाचे काम करीत असतात. मात्र, किटकशास्त्रज्ञांना कोळ्यांच्या आहारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वैविध्य असल्याचे दिसून आले आहे. कोळी अन्य वेळी जरी कीटकांचा फडशा पाडत असले तरी काही वेळी शाकाहारी भोजन घेतात. हे संशोधन जर्नल ऑफ अर्चनॉलॉजी मध्ये प्रकाशित झाले आहे.
वास्तविक पाहता कोळी हे किटकांचे भक्षक असल्याचे पारंपरीकरीत्या मानले जात असले तरी गेल्या काही वर्षामध्ये सातत्याने पुढे येत असलेल्या संशोधनामध्ये त्यांच्या आहारातील वैविध्यामुळे अचंबित होण्याची वेळ संशोधकांवरही येत आहे. काही कोळी हे त्यांच्या आहाराची गुणवत्ता वाढविण्यासाठी मासे, बेडूक किंवा अगदी वटवाघूळांचाही फडशा पाडतात. युनिव्हर्सिटी ऑफ बेसेल आणि ब्रॅण्डीस युनिव्हर्सिटी (अमेरिका) आणि कार्डीफ विद्यापीठ (इंग्लंड) येथील प्राणीशास्त्रज्ञ यावर संशोधन करीत असून, त्यांना कोळ्यांच्या वनस्पतीजन्य आहाराचेही पुरावे आढळले आहेत.
इन्फो ः
पुरक आहार म्हणून शाकाहार
शास्त्रीय संशोधनाचा आढावा घेतला असता, त्यामध्ये कोळ्यांच्या दहा कुळांतील प्रजाती वनस्पतीच्या (झाडे, झुडूपे. तणे, गवते, नेचे किंवा फळझाडे)विविध भागाचा आपल्या आहारात समावेश करीत असल्याचे दिसून आले. त्यातही त्यांच्या चव आणि स्वादानुसार, पराग, वनस्पतींचा रस, मध, पानांचे स्नायू, बिया यांचा गरजेनुसार वापर केला जातो.
- वनस्पतींचा आहारामध्ये समावेश करणाऱ्या गटामध्ये Salticidae हा गट प्रमुख असून, मोठ्या डोळ्यांसाठी ओळखला जातो. विविध संशोधनामध्ये या गटातील ६० टक्के प्रजातींचा मुख्य आहार मांसाहार असला तरी त्या वनस्पतींचा आहारात समावेश करणाऱ्या असल्याचे दिसून आले.
- अंटार्क्टिका सोडून सर्व खंडातील कोळ्यामध्ये अशी वर्तवणूक आढळली आहे. त्यातही उष्ण कटीबंधातील देशामध्ये त्यांचे प्रमाण अधिक दिसून आले.
--------
कोट ः
ज्या काळात किटकांचे प्रमाण कमी असते, अशा वेळी वनस्पतीजन्य आहाराचा कोळ्यांना तग धरून राहण्यासाठी फायदा होत असेल. त्याच प्रमाणे आहारामध्ये वैविध्य असल्याने पोषकतेमध्येही वाढ होते. त्याचा फायदा त्यांच्या वाढीसाठी होत असावा.
- मार्टिन मेफ्फेलेर, युनिव्हर्सिटी ऑफ बेसेल, स्वित्झर्लंड.
----------------------
Martin Nyffeler, Eric J. Olson, William O.C. Symondson. Plant-eating by spiders. Journal of Arachnology, 2016; 44 (1): 15 DOI: 10.1636/P15-45.1
000000000000000000000000000000000000000

उड्या मारणारा कोळी. |
Martin Nyffeler, Eric J. Olson, William O.C. Symondson. Plant-eating by spiders. Journal of Arachnology, 2016; 44 (1): 15 DOI: 10.1636/P15-45.1
000000000000000000000000000000000000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा