अतिथंड तापमानाशी जुळवून घेण्यात याकुशियन घोड्यांनी मारली बाजी
केवळ आठशे वर्षामध्ये याकुशियन घोड्यांनी पूर्व सायबेरियातील अतिथंड तापमानाशी जुळवून घेतल्याचे कोपनहेगन विद्यापीठातील संशोधकांना आढळून आले आहे. उत्त्कांतीसाठी लागणाऱ्या लक्षावधी वर्षाच्या कालावधीच्या तुलनेत हा कालावधी अत्यंत कमी असल्याने ही बाब अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण मानली जात आहे. या बाबत दोन संशोधने प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल सायन्स व करंट बायोलॉजी च्या ताज्या अंकात प्रकाशित करण्यात आली आहेत.
डेन्मार्क येथील कोपनहेगन विद्यापीठातील डॉ. ल्युडोविक ओरलॅंडो यांनी आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने नेतृत्त्व केले असून,
या संशोधनामध्ये अतिपूर्व सायबेरियातील नऊ जिवंत आणि प्राचीन काळातील दोन याकुशियन घोड्यांच्या संपूर्ण जनुकांचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. हे घोडे ख्रिस्तपूर्व काळात १३ ते १५ व्या शतकात याकुत लोकांच्या स्थलांतरामध्ये सायबेरीयामध्ये आले होते. या ठिकाणी असलेल्या अतिशीत तापमानाला (वजा ७० अंशापर्यंत) जुळवून घेतले. हे एकूण सस्तन प्राण्यातील अत्यंत वेगवान प्रक्रिया मानली जात आहे. या प्रक्रियेसाठी विशिष्ठ अशा प्लिथोरा जनुकांतील काही बदलांची मदत झाली असून, त्यातील काही जनुके सायबेरीयन माणसांच्या आणि प्रचंड लोकर शरीरावर असलेल्या मॅमथ सारख्या प्राण्यामध्येही आढळली आहेत.
- याकुशियासारख्या अतितीव्र वातावरणाशी जुळवून घेण्याच्या तीव्र दबावातून ही उत्क्रांती घडली असावी. घोड्याच्या केवळ शंभर पिढ्यांच्या काळात हा बदल झाला आहे.
- अशा बदलासाठी कारणीभूत ठरलेल्या नेमक्या जनुकांचा शोध घोड्याच्या मोठ्या जनुकीय प्रणालीतून घेण्यात आला. जनुकांच्या कार्य करण्याच्या पद्धतीमध्ये प्रचंड बदल झाले असून, पहिल्या पिढीतील काही जनुकांची संख्या अत्यंत कमी होती.
- अशा अभ्यासाचा उपयोग आता नष्ट होत असलेल्या विविध प्रजातींच्या बचावासाठी करणे भविष्यात शक्य होईल.
घोड्यावर आधारीत अर्थव्यवस्था ः
अंदाजे १३ ते १५ व्या शतकामध्ये मंगोलियातून सायबेरियामध्ये आलेल्या याकुत लोकांच्या जगण्यातील घोडे हा अत्यंत महत्त्वाचा भाग होते. त्यांची पूर्ण अर्थव्यवस्था ही घोड्यावर आधारीत होती. अर्जेटिनापेक्षा क्षेत्रफळाने मोठ्या व त्यातील सुमारे चाळिस टक्के भाग आर्क्टीक गोलार्धात येत असलेल्या भागामध्ये संपर्कासाठी व मांसातून आहार शाश्वतीसाठी हे घोडे अत्यंत उपयुक्त ठरत.
Journal References:
Clio Der Sarkissian, Luca Ermini, Mikkel Schubert, Melinda A. Yang, Pablo Librado, Matteo Fumagalli, Hákon Jónsson, Gila Kahila Bar-Gal, Anders Albrechtsen, Filipe G. Vieira, Bent Petersen, Aurélien Ginolhac, Andaine Seguin-Orlando, Kim Magnussen, Antoine Fages, Cristina Gamba, Belen Lorente-Galdos, Sagi Polani, Cynthia Steiner, Markus Neuditschko, Vidhya Jagannathan, Claudia Feh, Charles L. Greenblatt, Arne Ludwig, Natalia I. Abramson, Waltraut Zimmermann, Renate Schafberg, Alexei Tikhonov, Thomas Sicheritz-Ponten, Eske Willerslev, Tomas Marques-Bonet, Oliver A. Ryder, Molly McCue, Stefan Rieder, Tosso Leeb, Montgomery Slatkin, Ludovic Orlando. Evolutionary Genomics and Conservation of the Endangered Przewalski’s Horse. Current Biology, 2015; 25 (19): 2577 DOI: 10.1016/j.cub.2015.08.032
Pablo Librado, Clio Der Sarkissian, Luca Ermini, Mikkel Schubert, Hákon Jónsson, Anders Albrechtsen, Matteo Fumagalli, Melinda A. Yang, Cristina Gamba, Andaine Seguin-Orlando, Cecilie D. Mortensen, Bent Petersen, Cindi A. Hoover, Belen Lorente-Galdos, Artem Nedoluzhko, Eugenia Boulygina, Svetlana Tsygankova, Markus Neuditschko, Vidhya Jagannathan, Catherine Thèves, Ahmed H. Alfarhan, Saleh A. Alquraishi, Khaled A. S. Al-Rasheid, Thomas Sicheritz-Ponten, Ruslan Popov, Semyon Grigoriev, Anatoly N. Alekseev, Edward M. Rubin, Molly McCue, Stefan Rieder, Tosso Leeb, Alexei Tikhonov, Eric Crubézy, Montgomery Slatkin, Tomas Marques-Bonet, Rasmus Nielsen, Eske Willerslev, Juha Kantanen, Egor Prokhortchouk, Ludovic Orlando. Tracking the origins of Yakutian horses and the genetic basis for their fast adaptation to subarctic environments. Proceedings of the National Academy of Sciences, 2015; 201513696 DOI: 10.1073/pnas.1513696112
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा