शनिवार, १९ मार्च, २०१६

शेतीने घडवले माणसांच्या जनुकांत बदल

शेतीने घडवले माणसांच्या जनुकांत बदल

शिकारी आणि अन्न गोळा करणारे मानवाचे पूर्वज साधारणतः ८५०० वर्षापूर्वी शेती करू लागले. या बदलामुळे माणसांच्या जनुकिय गुणधर्मांमध्ये नेमके काय बदल झाले, या विषयी संशोधकांच्या आंतरराष्ट्रीय गटाने अभ्यास केला आहे.  त्याचे निष्कर्ष नेचर या आंतरराष्ट्रीय संशोधनपत्रिकेमध्ये नुकतेच प्रकाशित झाले आहे.

जंगलामध्ये जगण्यासाठी अन्न गोळा करणे, शिकार कऱण्यासाठी आवश्यक गुणधर्म आपल्या पूर्वजाकडे होते. त्यामध्ये शेतीसाठी पुरक गुणधर्म त्याला स्वतःमध्ये बाणवावे लागले असतील. त्यासाठी आवश्यक ते बदल जनुकिय पातळीवरही दिसून येत असल्याचे हार्वर्ड मेडिकल स्कूल येथील संशोधकांनी केलेल्या विश्लेषणात आढळले आहे. त्या विषयी माहिती देताना जनुकिय शास्त्र संशोधक इयान मॅथीसन यांनी सांगितले, की सध्या उपलब्ध झालेल्या उच्च दर्जाच्या डीएनए मिळवण्याच्या तंत्रामुळे प्राचीन मानवाच्या जनुकिय माहितीसाठ्यामध्ये भर पडत आहे. तसेच प्रत्येक गुणधर्मांसाठी आवश्यक जनुकांची ओळखही पटत चालली आहे. त्यामुळे जंगली माणूस ते शेतकरी या बदलामागे घडलेल्या जनुकिय बदलांचाही वेध या संशोधनातून घेण्यात आला.
- मानवाच्या उंची, लॅक्टोज पचविण्याच्या प्रौढ अवस्थेतील क्षमता, मेदाम्लांचे चयापचय, शरीरातील ड जीवनसत्त्वाची पातली, त्वचेच्या रंगातील गोरेपणाकडे झालेला बदल आणि डोळ्यांचा निळा रंग या सारख्या वैशिष्ट्यासाठी युरोपिय माणसांमध्ये असलेल्या जनुकांमध्ये झालेले बदल तपासण्यात आले.
- त्यातील सुरवातीच्या काळात शेतीतील आहाराशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक असा सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे सेलियाक रोगाच्या धोक्याची पातळी वाढविणारे जनुकामध्ये दोन बदल दिसून आले. 

संशोधकांच्या मते...
- प्रतिकारकतेशी जोडलेल्या जनुकांमध्ये झालेले बदल महत्त्वाचे आहेत. त्यावर भाष्य करताना ऍडलेड विद्यापीठ आणि मॅक्स प्लॅन्क इन्स्टिट्यून फॉर दी सायन्स ऑफ ह्युमन हिस्ट्री येथील मुलद्रव्यीय पुरातत्त्वशास्त्र वोल्फगॅंग हाक म्हणाले की, न्युओलीथिर कालखंडामध्ये माणसांची संख्या वाढत गेली आणि ते एकमेकांच्या आणि आपल्या पाळीव प्राण्यांच्या सहवासात राहू लागले. त्यामुळे त्यांच्यामध्ये अधिक प्रतिकारकक्षमतेची आवश्यकता निर्माण झाली. प्रत्यक्षामध्ये ते नेमके कधी घडले हे जनुकीय अभ्यासाच्या माध्यमातूनच कळू शकणार आहे.
- या संशोधनामुळे युरोपातील पहिला शेतकरी मानला जाणारा माणूस हा ऍन्टोलिया (सध्याचे तुर्कस्थान) येथून आला, या गृहितकाला बळ मिळणार आहे. त्याने आपल्या बरोबर आणलेल्या शेतीच्या कौशल्यामुळे शेतीचा प्रसार झाला. त्यातून प्राचीन स्थलांतरीत गटाच्या एकत्रित इतिहासातील काही दुवे भरले जातील.
- सध्या आपल्याकडे प्राचीन माणसांचे डीएनए उपलब्ध आहेत, तसेच त्यांच्या विश्लेषणासाठी नवी साधनेही तयार आहेत. अगदी एखाद्या दाताच्या नमुन्यापासूनही पूर्वीच्या तुलनेमध्ये ७०० पट अधिक डिएनन मिळवता येत आहेत. मानवाच्या सध्याच्या स्वरुपापर्यंतचा त्याचा प्रवास समजण्यासाठी हे संशोधन उपयुक्त ठऱणार असून, वेगवेगळ्या वातावरणामध्ये जुळवून घेताना, तग धरताना त्यामध्ये झालेले बदल नक्कीच फायद्याचे ठरल्याचे हार्वर्ड मेडिकल स्कूल येथील जनुकियशास्त्राचे प्रा. डेव्हिड रिच यांनी सांगितले.

भूतकाळाचा जोमाने होतोय शोध
- युरोप, सायबेरिया आणि तुर्कस्थान येथील विविध ठिकाणाहून ३ ते ८.५ हजार वर्षापूर्वी राहणाऱ्या माणसांचे डीएनए उपलब्ध होत आहेत. त्यामुळे शेतीपूर्व, शेतीची सुरवात आणि शेती रुळल्यानंतरचा काळ याविषयी अधिक जनुकिय माहिती  उपलब्ध होत आहे. २३० प्राचीन नमुन्यापैकी ८३ नमुन्यांचे पूर्वी कधीही विश्लेषण झालेले नाही. त्यातही २६ नमुने भूमध्य सागराच्या पूर्वेकडील उष्ण भागातून मिळाले आहे. या ठिकाणी उष्ण वातावरणामुळे डिएनएचे लवकर विघटन होते. 
- सध्याच्या युरोपातील माणसांच्या पूर्वजाचा अगदी नीयान्ड्रेथ्रल्सपासूनच्या जनुकाचा अभ्यास या संशोधक गटाकडून केला जात आहे. या संशोधकामध्ये वाढ होत असू, २०१४ मध्ये जनुकीय शास्त्राचा अभ्यास कऱणाऱ्या तज्ज्ञांचा संख्या १० होती, ती वाढून २३०पर्यंत पोचली आहे. त्यामध्ये हार्वर्ड, एमआयटी आणि होगार्ड ह्युजेस येथील संशोधकांचा समावेश आहे.
- या संशोधनासाठी युरोपातील विविध देशांसह रशिया, ऑस्ट्रेलियासारख्या देशातून आर्थिक निधी मिळत आहे.

-----------------------
छायाचित्र ः
माणसांच्या शेती करण्यामुळे त्यांच्या जनुकिय गुणधर्मामध्ये बदल झाले असल्याचे अभ्यासात आढळले आहे. (स्रोत ः हार्वर्ड मेडीकल स्कूल)
---------------------------------

Journal Reference:

    Iain Mathieson, Iosif Lazaridis, Nadin Rohland, Swapan Mallick, Nick Patterson, Songül Alpaslan Roodenberg, Eadaoin Harney, Kristin Stewardson, Daniel Fernandes, Mario Novak, Kendra Sirak, Cristina Gamba, Eppie R. Jones, Bastien Llamas, Stanislav Dryomov, Joseph Pickrell, Juan Luís Arsuaga, José María Bermúdez de Castro, Eudald Carbonell, Fokke Gerritsen, Aleksandr Khokhlov, Pavel Kuznetsov, Marina Lozano, Harald Meller, Oleg Mochalov, Vyacheslav Moiseyev, Manuel A. Rojo Guerra, Jacob Roodenberg, Josep Maria Vergès, Johannes Krause, Alan Cooper, Kurt W. Alt, Dorcas Brown, David Anthony, Carles Lalueza-Fox, Wolfgang Haak, Ron Pinhasi, David Reich. Genome-wide patterns of selection in 230 ancient Eurasians. Nature, 2015; DOI: 10.1038/nature16152

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा