धोक्यातील सजीव संवर्धनासोबत परजिवींचाही विचार व्हावा
उत्क्रांतीविषयक संशोधकांचे मत
धोक्यात असेलल्या सजीवांच्या संवर्धनासाठी चळवळ जोरामध्ये असली तरी या प्राण्यांसोबत त्यावरील परजिवींचेही संवर्धन निसर्गाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे न्युझीलॅंड येथील ओटॅगो विद्यापीठातील संशोधकांनी मांडले आहे. हे सजीव वाचविताना परजिवीपासून मुक्त ठेवण्याकडे सध्याच्या तज्ज्ञांचा कल असून, हा दृष्टीकोन सम्यक नसल्याचे संशोधनातून समोर आले आहे. हे संशोधन ‘जर्नल ट्रेण्डस इन इकॉलॉजी अॅण्ड इव्हॅल्युशन’ मध्ये प्रकाशित केले आहे.
बदलत्या जागतिक हवामानामुळे व मानवी हस्तक्षेपामुळे अनेक सजीवांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे या सजीवांच्या संवर्धनासाठी जगभरातील जीवशास्त्रज्ञ प्रयत्न करीत आहेत. या सजीवाच्या संवर्धनामध्ये त्यांच्या शरीरावरील व अंतर्गत परजिवींना दूर ठेवण्याचे शास्त्रज्ञांचे धोरण असते. मात्र, या पद्धतीमध्ये निसर्ग आणि सजीवांच्या वाढीसाठी आवश्यक तो सम्यक दृष्टीकोन नसल्याचे न्युझीलॅंड येथील ओटॅगो विद्यापीठातील हॅमिश स्पेन्सर आणि अमेरितील उत्क्तांतीविषयक जीवशास्त्रज्ञ मार्लिन झुक यांनी स्पष्ट केले आहे. कारण या यजमानासोबतच काही परजिवींचेही संवर्धन होणे गरजेचे आहे.
- सजीवाच्या वाढीच्या कार्यक्रमामध्ये किंवा प्राणी संग्रहालयामध्ये प्राणी आरोग्यपूर्ण आणि परजीवीमुक्त असावेत, ही पहिली अट असते. कारण आपल्या संकल्पनेनुसार परजिवीमुळे यजमानाच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होत असतो.
- निसर्गामध्ये कोणताही सजीव संपूर्णपणे परजीवीमुक्त ठेवणे ही आपली माणसांची ढवळाढवळ तर ठरणार नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला आहे. सजीवाच्या उत्क्रांतीमध्ये त्यांच्यासोबतच परजीवींची उत्क्रांती होत गेली आहे. हे एकमेकामध्ये गुंफलेले जीवन आहे.
- प्रो. स्पेन्सर म्हणाले, की सजीवांच्या प्रतिकारशक्तीच्या विकासामध्ये परजिवींचा प्रादुर्भाव ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. या प्रतिकारक यंत्रणेवरच त्यांच्या संभाव्य तग धरण्याची क्षमता ठरणार आहे. लहान असताना झालेल्या परजिवींच्या प्रादुर्भावातूनच पुढे त्या प्रकारच्या परजिवींशी लढण्याची क्षमता विकसित होत असते. म्हणजेच एका प्रकारे परजिवी असणे ही सजीवांच्या नैसर्गिक प्रतिकारशक्तीमध्ये वाढ होण्यासाठी आवश्यक बाब आहे. कारण प्रत्येक रोगांसाठी लस निर्माण करणे अद्याप माणसांना शक्य झालेले नाही.
- याचा अर्थ असा नाही, की परजीवींच्या प्रादुर्भावाकडे दूर्लक्ष करावे. मुख्य आणि प्राणघातक परजिवींच्या प्रादुर्भावासाठी उपाययोजना केल्याच पाहिजेत. त्यासाठी सम्यक दृष्टीकोनाची गरज आहे.
जर्नल संदर्भ ः
Hamish G. Spencer, Marlene Zuk. For Host's Sake: The Pluses of Parasite Preservation. Trends in Ecology and Evolution, March 2016 DOI: 10.1016/j.tree.2016.02.021

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा