माशांचा आकार होतोय कमी
- बदलते तापमान, ऑक्सीजनची कमतरता यांचा विपरीत परिणाम
सागरात होत असलेल्या बदलांचा, तसेच वातावरणाच्या बदलांचा माशांच्या आकारमानावर परीणाम होत असून त्याचे आकारमान कमी होत असल्याचे ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात आढळले आहे. उष्ण सागरामध्ये आणि ऑक्सिजनच्या कमी प्रमाणामुळे मोठ्या आकाराच्या माशांच्या संख्येत घट होत असून त्याबाबत जागतिक अंदाज प्रथमच व्यक्त करण्यात आला आहे. हा अभ्यास नेचर क्लायमेट चेंज या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे.
सागरातील माशांच्या आकारमानाचा अभ्यास करताना संशोधकांनी संगणकिय प्रणालीचा वापर केला आहे. जगभरातील विवि सागरामध्ये आढळणाऱ्या 600 पेक्षा अधिक माशांच्या जातीचा अभ्यास केला आहे. सन 2000 ते 2050 या कालावधीमध्ये माशांच्या वजनामध्ये 14 ते 20 टक्क्यांनी घट होणार आहे. त्यातही उष्णकटिबंधीय प्रदेशामध्ये त्यांचा परिणाम अधिक प्रमाणात होणार आहे. या बाबत माहिती देताना ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील फिशरी विभागातील संशोधक विल्यम चेऊंग यांनी सांगतले, की सागरातील मासे हे बदलत्या तापमानाला लवकर प्रतिसाद देतात. त्यांच्या हंगामनिहाय आणि रहिवासाच्या सवयीमध्ये बदल होतात. मात्र वातावरणात होणाऱ्या बदलाचा मोठा परिणाम त्यांच्या शरीराच्या आकारमानावर होत असल्याचे अभ्यासात दिसले आहे. हे आश्चर्य असून आजवर तापमान बदलाचे सागरावर होणारे परिणामाविषयी फारसा विचार केला जात नव्हता.
- माशांच्या वाढीच्या अवस्थेवर मर्यादित ऑक्सिजन साठ्याचे परिणामाचा अभ्यास या संशोधन गटातील संशोधक डॅनिअल पॉली यांनी केला आहे. या प्रकारच्या अभ्यासामध्ये ते गेल्या वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले, की पाण्यामध्ये वाढीसाठी योग्य प्रमाणात ऑक्सीजन उपलब्ध होणे, हे माशांसाठी सातत्याने आव्हानात्मक होत चालले आहे. भविष्यात उष्ण आणि कमी ऑक्सीजनयु्क्त सागराचे पट्टे बदलत्या वातावरणात तयार होणार आहे. त्या काळआत मोठ्या माशांना आवश्यक तेवढा ऑक्सीजन मिळणार नाही. त्यांची वाढ खुंटत जाणार आहे.
- तापमान बदलासाठी कारणीभूत अशा हरितगृह वायूचे उत्सर्जन रोखण्यासाठी योग्य ती धोरणे आखण्याची गरज या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. अन्यथा मासे हे मानवाच्या अन्नातील महत्त्वाचे घटक आहेत. त्याचा मानवाच्या अन्नसुरक्षेवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे.
जर्नल संदर्भ ः
William W. L. Cheung, Jorge L. Sarmiento, John Dunne, Thomas L. Frölicher, Vicky W. Y. Lam, M. L. Deng Palomares, Reg Watson, Daniel Pauly. Shrinking of fishes exacerbates impacts of global ocean changes on marine ecosystems. Nature Climate Change, 2012; DOI: 10.1038/nclimate1691
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा