खुंट संशोधनासाठी युरोपिय संघ राबवतोय प्रकल्प
हरितगृहातील भाजीपाला पिकांना होईल फायदा
वनस्पतीच्या मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होण्यासाठी चांगल्या खुंटावर चांगल्या वाणाचे कलम करण्याची आवश्यकता असते. त्यासाठी सातत्याने चांगल्या दर्जाचे खुंट मिळविण्यासाठी संशोधन केले जाते. सध्या नेदरलॅंड येथील वेगनिंगंण विद्यापीठातील संशोधन खुंट मिळविण्यासाठी 145 प्रकारच्या विविध वनस्पतीवर संशोधन करण्यात येत आहे. युरोपिय संघाने रुटोपॉवर हा प्रकल्प हाती घेतला असून त्यामध्ये स्पेन, इंग्लंड, बेल्जियम, आणि तुर्कस्तान या देशातील संस्थेतील संशोधक त्यांच्या देशातील वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे वाढू शकतील, अशा खुंटावर संशोधन करत आहेत.
हरितगृहामध्ये भाजीपाला लागवडीसाठी 1960 ते 1980 या कालावधीमध्ये खुंटाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे. मात्र नंतरच्या काळामध्ये विविध माध्यमामुळे मातीतून येणाऱ्या रोगांना अटकाव करणे शक्य झाल्याने खुंटाची गरज कमी झाली. मात्र अलिकडे झालेल्या संशोधनामध्ये टोमॅटो पिक खुंटावर कलम पद्धतीने लावल्यास व्हर्टिसिलीयम आणि पेपिनो मोझाईक या रोगासाठी प्रतिकारक असल्याचे दिसून आले आहे. तसेच त्यांच्या उत्पादनातही वाढ दिसून येते. त्यामुळे खुंट पद्धतीने लागवडीमध्ये पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आता नेदरलॅंडमध्ये एकूण क्षेत्राच्या सुमारे 90 टक्के टोमॅटो लागवड ही खुंटावरील आहे.
सध्या टोमॅटोमध्ये जंगली टोमॅटो जाती, स्थानिक जातीच्या काड्यांचा खुंट म्हणून वापर केला जातो. मात्र नवीन खुंटाची निवड करताना त्याचा वाढीवर आणि उत्पादनावर होणाऱ्या परिणामाबाबत अभ्यास होण्याची आवश्यकता होती. त्यासाठी रुटोपॉवर या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे.
असा आहे प्रकल्प
- रुटस्टॉक किंवा खुंटाच्या मुळांच्या वाढीचा आणि वनस्पतीच्या वाढीचा संबंध तपासण्यात येत आहे. या जोडाच्या यशस्वीतेसाठी कार्यरत असणाऱ्या जनुकांची ओळख पटविण्यात येणार आहे. त्यासाठी एका जातीसाठी अनेक प्रकारचे खुंट वापरून पाहिले जात आहेत. त्यामध्ये जंगली टोमॅटो ( Solanum pimpinellifolium) आणि विकसित नवीन वाण यांचा समावेश आहे.
- वनस्पतीच्या मुळामध्ये तयार होणाऱ्या सायटोकिनीन्स या संप्रेरकामुळे कलमांच्या वाढीविषयी अंदाज करता येतात. सायटोकिनीन्स हे घटक अन्य घटकासह रोपाच्या वरच्या भागामध्ये पाठवले जातात. त्या संबंधी चाचण्यामध्ये खुंटावर कलमाच्या वरील बाजूस कट घेतल्यानंतर हे झायलम तिथे जमा होते. तिथे तयार होणारी संप्रेरके ही खुंट आणि कलम यांच्या दरम्यान संपर्काचे काम करते.
- अधिक वनस्पतीचा अभ्यास करून चांगल्या दर्जाच्या ,गुणधर्माच्या खुंट मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुले पैदासकार आणि संशोधकासाठी लवकर वाढणाऱ्या जाती उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा