पाण्याच्या शुद्धीकरणासाठी सिलिकायुक्त तंत्रज्ञान ओसार्ब
बऱ्याचवेळा संशोधक एका दिशेने संशोधन करत असतात. मात्र त्यातून निघणारे संशोधन वेगळ्याच स्वरूपात वापरणे शक्य असते. ओहियो येथील कॉलेज ऑफ वुस्टर मधील रसायनतज्ज्ञ पॉल एडमिस्टोन हे खरेतर विमानतळावरील स्फोटके शोधण्यासाठी तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र त्यातून ओसार्ब हे पाणी शुद्धीकरणासाठीचे नवे तंत्रज्ञान विकसित झाले. या तंत्रज्ञानामध्ये सेंद्रियरित्या सुधारीत सिलिका किंवा काच यांचा वापर केला आहे. हे घटक पाण्यातील तेल आणि अन्य प्रदुषक शोषून घेतात.
एडमिस्टोन हे अतिसुक्ष्म तंत्रज्ञानाने काचेच्या गुणधर्माचा स्फोटक शोधण्यासाठी वापर करण्यासंदर्भात संशोधन करत होते. प्रयोगशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या साह्याने विविध मिश्रणाच्या चाचण्या घेण्यात येत होत्या. त्यातील एक मिश्रण हे अचानक आकाराने वाढल्याचे लक्षात आले. सिलिका आधारीत उत्पादनाची प्रथमच ओळख पटली. पदवीच्या विद्यार्थ्यांसह करण्यात आलेले देशभरातील हे महत्त्वाचे संशोधन ठरावे. वुस्टर येथील एका कंपनीच्या सहकार्याने शेतातून वाहणारे पाणी, पुरातील पाणी यांच्या शुद्धीकरणासंदर्भात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. त्यातून शहर आणि उद्योगाच्या गरजेचे पाणी मिळविण्यात येत आहे. त्या बाबत माहिती देताना संशोधक एडमिस्टोन यांनी सांगितले, की स्फोटक आणि त्यांच्या वाफा यांनी बांधून ठेवण्याच्या दृष्टीने काचेच्या गुणधर्मावर अभ्यास करण्यात येत होता. त्यात असलेल्या गुणधर्माचा पाण्याच्या शुद्धीकरणासाठी उपयोग होऊ शकतो, हे योगायोगानेच लक्षात आले.
शुद्ध पाण्याचा लाभ पोचेल सर्वदूर
- ग्रामीण भागामध्ये लोकांच्या आरोग्यासाठी सर्वात महत्त्वाचा धोका अशुद्ध पाण्याचा आहे. त्यामुळ त्यांना विविध आजाराना सामोरे जावे लागते.
- तसेच अत्यंत दुर्गम ठिकाणी कार्यरत असलेल्या लष्करी अधिकारी आणि सैनिकांनाही या समस्येला तोंड द्यावे लागते. अशा प्रत्येक ठिकाणी पाणी शुद्धीकरणाचे प्रकल्प उभारणेही शक्य नसते.
- इलेक्ट्रॉनिक्स, रसायन आणि चिप उद्योगामध्येही प्रचंड प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. या प्रकल्पातून पाणी प्रदुषित होत असते. हे प्रदुषित पाणी विविध प्रकारच्या पाणी स्रोतामध्ये मिसळून ते दुषित होण्याचा धोकाही मोठा असतो. त्यातूनच दुषित पाण्याच्या दुष्टचक्रांला सुरवात होते.
ओसार्बचे विविध प्रकार
अमेरिकेतील अनेक नगर परिषदा आणि कॅनडातील प्रांतामध्ये आता ओसार्ब शुद्धीकरणासाठी वापरण्यास सुरवात झाली आहे. अनेक कंपन्यामध्येही याचा वापर वाढत आहे. या कंपन्यातून बाहेर पडणाऱ्या पाण्यातील विविध प्रदुषके विशेषतः हायड्रोकार्बन, औषधी द्रव्ये, कीडनाशके, तणनाशके, क्लोरीनयुक्त पाणी व अन्य घटक कमी करण्याच्या दृष्टीने आवश्यक ती ओसार्ब फॉर्म्यूलेशन तयार करण्यात आली आहेत.
रसायनदृष्ट्या ओसार्ब काय आहे
एडमिस्टोन यांनी दिलेल्या माहितीनुसार,
- खिडकीची काच आणि बाथटबमधील सिलीकॉन कॉल्क यांच्या दरम्यानचा हा घटक आहे. काच ही टणक आणि सिलीकॉन कॉल्क हे अत्यंत लवचिक असते.
- ओसार्ब हे पाणी किंवा कोणताही घटक शोषताना प्रसरण पावते. मात्र त्यामध्ये अन्य कोणतीही रासायनिक प्रक्रिया होत नाही. एखाद्या स्पंजप्रमाणे ते प्रदुषित घटक शोषून घेते.
- सायन्स नेशन या संस्थेच्या सदस्यापुढे ओसार्बचे प्रात्यक्षिक करण्यात आले. पाण्यामध्ये काचेचे कण, ऍसीटोन आणि अन्य घटकांच्या साह्याने दुषित झालेले पाणी चाचणीसाठी वापरले. काही सेकंदामध्येच ओसार्बचे रुपांतर जेलमध्ये झाले. प्रदुषक घटक वेगळे झाले.
- ओसार्ब हे अनेकवेळा वापरता येऊ शकते. त्यामध्ये शोषलेले घटक हे प्रदुषकाच्या स्थितीनुसार उष्णतेच्या किंवा साध्या पिळण्याच्या पद्धतीने वेगळे करता येतात.
ओसार्बचा असाही होतो वापर
- पाण्यात मिसळलेले तेलही सहजतेने वेगळे करणे शक्य आहे. मेक्सिको येथील खाडीच्या पाण्यातील तेलाचा तवंग दूर करण्यासाठी त्याचा वापर करण्यात आला होता. अनेकवेळा तेल मिळविण्यासाठी ड्रिलींग करताना एक बॅरल तेलासाठी सरासरी 10 बॅरल पाणी बाहेर येत असते. ते पाणी अन्य पाण्यामध्ये मिसळू नये, यासाठी फार दक्ष राहावे लागते. तरिही त्यातून गळती होते. त्याचीही शुद्धता करणे शक्य आहे.
- वुस्टर विद्यापीठाच्या पार्किंग लॉटमधून गाड्यांच्या धुण्याचे पाणी शुद्ध करून त्या पाण्याचा वापर बागेसाठी केला आहे. करण्यासाठी त्यांनी या घटकाचा वापर केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा