मधमाशा घेतात कॉफीचा अधिक स्वाद
आपली सकाळ सुरू होते ती चहा किंवा कॉफीच्या एका कपाने. चहा किंवा कॉफीतील उत्तेजकता आपल्याला ताजेपणा देते. मधमाशाही त्यांच्या दिवसाची सुरूवातही कॅफेन असणाऱ्या फुलांच्या रसाच्या शोषणाने करत असल्याचे इंग्लंडमधील न्यू कॅसल विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. कॅफेनचा रस शोषणाऱ्या मधमाशांच्या स्मृती आणि स्मरणक्षमतेत वाढ होत असून कॅफेन असणाऱ्या झाडाच्या परागीकरणामध्ये ते मोलाची भुमिका निभावतात.
चाचणीमध्ये मधमाशा या कॅफेनयुक्त शर्करा असलेल्या लिंबूवर्गीय फूले आणि कॉफीच्या फूलांवर येत असल्याचे दिसून आले आहे. ज्या मधमाशा या फुलांना भेट देतात, त्यांच्या स्मरणक्षमतेत साध्या शर्करेवर गुजराण करणाऱ्या मधमाशांपेक्षा वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. न्यु कॅसल विद्यापीठातील संशोधक डॉ. गेराल्डीन राईट यांनी मधमाशा व वनस्पती या दोहोतील कॅफेनच्या परिणामाविषयी अभ्यास केला आहे. फुलांच्या विविध प्रजातींच्या ओळख पटविणे, लक्षात ठेवणे यातूनच मधमाशा कमीत कमी श्रमामध्ये अधिक मध गोळा करू शकतात. या प्रक्रियेमध्ये कॅफेन त्यांना मदत करत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
कमी प्रमाणातील कॅफेन करते मधमाशांना आकर्षित
- - मधमाशा एका कॅफेन असलेल्या फुलाकडून दुसऱ्या फुलाकडे जात असल्याने या फुलांमध्ये परागीकरण वेगाने होते. त्याचा त्या झाडांनाही फायदा होतो. तसेच ज्या मधमाशा कॅफेन असलेल्या फुलांवरून मध गोळा करतात, त्याच्या परागीकरण करण्याच्या क्षमतेही वाढ होते.
- - अभ्यासामध्ये लिंबूवर्गीय फुले आणि कॉफीच्या प्रजातीमध्ये कमी प्रमाणात कॅफेन असते. त्यांचा वापर फ्रिज ड्राईड कॉफी तयार करण्यासाठी आणि आराबिका चा वापर एक्स्प्रेसो आणि फिल्टर कॉफी तयार करण्यासाठी केला जातो. द्राक्ष, लिंबू, पोमेलो आणि मोसंबी यांच्या नमुन्यामध्येही कॅफेन कमी प्रमाणात उपलब्ध असते.
- - ग्रीनविच विद्यापीठातील रॉयल बॉटॅनिक गार्डनमधील प्रोफेसर फिल स्टिव्हन्सन यांनी सांगितले की, कॅफेन हे वनस्पतीतील संरक्षक रसायन आहे. या रसायनाची चव वेगळी आहे. त्यामुळे फुलांच्या परागकणामध्ये याचे अंश मिळाल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटले होते. त्यांचे प्रमाण कमी असले तरी त्यांचा मधमाशांवर होणारा परिणाम मोठा आहे. त्याचे मधमाशांच्या वर्तणूकीवर अधिक परिणाम करतात.
स्मरणशक्तीत होते वाढ
- - या कॅफेनच्या मधमाशांच्या दिर्घकालीन स्मरणशक्तीमध्ये तिप्पटीने वाढ होत असल्याचे दिसून आले असून फुलांच्या वासांविषयी त्या 24 तासांनंतर लक्षात ठेवतात. तर दुपटीपेक्षा अधिक मधमाश्यामध्ये फुलांचा वास लक्षात ठेवण्याचे प्रमाण तीन दिवसापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.
- - मात्र अधिक कॅफेन असलेली फुले मधमाशांना त्यांच्या उग्र पणामुळे दूर ठेवतात.
- - कॅफेनचे माणसांच्या मेंदूवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी मुळ यंत्रणा समजण्यास या संशोधनाने वाव मिळणार आहे.
- - ऍरिझोना विद्यापीठातील डॉ. ज्युली मस्टार्ड यांनी सांगितले, की माणुस आणि मधमाश्यांच्या मेंदू रचनेमध्ये प्रचंड फरक अशला तरी पेशीय पातळीवर किंवा प्रथिनांच्या जनुकांच्या पातळीवर मधमाशा आणि मानवी मेंदूमध्ये मोठे साम्य आहे. त्यामुळे मधमाशांच्य मेंदूवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास वर्तणुकिशी जोडला गेल्यास त्याचे मोठे फायदे होणार आहेत.
मधमाशांच्या सवयी ठरतील शेतीसाठी फायद्याच्या...
नैसर्गिक पर्यावरणातून मधमाशांची संख्या वेगाने कमी होत असून परागीकरणामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पिके आणि जंगली फुले यांच्या परागीभवनासाठी मधमाशा आवश्यक असून सर्व वनस्पतीच्या जैवविविधतेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. मधमाशा घेतात कॉफीचा अधिक स्वाद
आपली सकाळ सुरू होते ती चहा किंवा कॉफीच्या एका कपाने. चहा किंवा कॉफीतील उत्तेजकता आपल्याला ताजेपणा देते. मधमाशाही त्यांच्या दिवसाची सुरूवातही कॅफेन असणाऱ्या फुलांच्या रसाच्या शोषणाने करत असल्याचे इंग्लंडमधील न्यू कॅसल विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. कॅफेनचा रस शोषणाऱ्या मधमाशांच्या स्मृती आणि स्मरणक्षमतेत वाढ होत असून कॅफेन असणाऱ्या झाडाच्या परागीकरणामध्ये ते मोलाची भुमिका निभावतात.
चाचणीमध्ये मधमाशा या कॅफेनयुक्त शर्करा असलेल्या लिंबूवर्गीय फूले आणि कॉफीच्या फूलांवर येत असल्याचे दिसून आले आहे. ज्या मधमाशा या फुलांना भेट देतात, त्यांच्या स्मरणक्षमतेत साध्या शर्करेवर गुजराण करणाऱ्या मधमाशांपेक्षा वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. न्यु कॅसल विद्यापीठातील संशोधक डॉ. गेराल्डीन राईट यांनी मधमाशा व वनस्पती या दोहोतील कॅफेनच्या परिणामाविषयी अभ्यास केला आहे. फुलांच्या विविध प्रजातींच्या ओळख पटविणे, लक्षात ठेवणे यातूनच मधमाशा कमीत कमी श्रमामध्ये अधिक मध गोळा करू शकतात. या प्रक्रियेमध्ये कॅफेन त्यांना मदत करत असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.
कमी प्रमाणातील कॅफेन करते मधमाशांना आकर्षित
- अभ्यासामध्ये लिंबूवर्गीय फुले आणि कॉफीच्या प्रजातीमध्ये कमी प्रमाणात कॅफेन असते. त्यांचा वापर फ्रिज ड्राईड कॉफी तयार करण्यासाठी आणि आराबिका चा वापर एक्स्प्रेसो आणि फिल्टर कॉफी तयार करण्यासाठी केला जातो. द्राक्ष, लिंबू, पोमेलो आणि मोसंबी यांच्या नमुन्यामध्येही कॅफेन कमी प्रमाणात उपलब्ध असते.
- ग्रीनविच विद्यापीठातील रॉयल बॉटॅनिक गार्डनमधील प्रोफेसर फिल स्टिव्हन्सन यांनी सांगितले की, कॅफेन हे वनस्पतीतील संरक्षक रसायन आहे. या रसायनाची चव वेगळी आहे. त्यामुळे फुलांच्या परागकणामध्ये याचे अंश मिळाल्यानंतर आम्हाला आश्चर्य वाटले होते. त्यांचे प्रमाण कमी असले तरी त्यांचा मधमाशांवर होणारा परिणाम मोठा आहे. त्याचे मधमाशांच्या वर्तणूकीवर अधिक परिणाम करतात.
स्मरणशक्तीत होते वाढ
- - या कॅफेनच्या मधमाशांच्या दिर्घकालीन स्मरणशक्तीमध्ये तिप्पटीने वाढ होत असल्याचे दिसून आले असून फुलांच्या वासांविषयी त्या 24 तासांनंतर लक्षात ठेवतात. तर दुपटीपेक्षा अधिक मधमाश्यामध्ये फुलांचा वास लक्षात ठेवण्याचे प्रमाण तीन दिवसापेक्षा अधिक असल्याचे दिसून आले आहे.
- - मात्र अधिक कॅफेन असलेली फुले मधमाशांना त्यांच्या उग्र पणामुळे दूर ठेवतात.
- - कॅफेनचे माणसांच्या मेंदूवर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास करण्यासाठी मुळ यंत्रणा समजण्यास या संशोधनाने वाव मिळणार आहे.
- - ऍरिझोना विद्यापीठातील डॉ. ज्युली मस्टार्ड यांनी सांगितले, की माणुस आणि मधमाश्यांच्या मेंदू रचनेमध्ये प्रचंड फरक अशला तरी पेशीय पातळीवर किंवा प्रथिनांच्या जनुकांच्या पातळीवर मधमाशा आणि मानवी मेंदूमध्ये मोठे साम्य आहे. त्यामुळे मधमाशांच्य मेंदूवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास वर्तणुकिशी जोडला गेल्यास त्याचे मोठे फायदे होणार आहेत.
मधमाशांच्या सवयी ठरतील शेतीसाठी फायद्याच्या...
नैसर्गिक पर्यावरणातून मधमाशांची संख्या वेगाने कमी होत असून परागीकरणामध्ये अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पिके आणि जंगली फुले यांच्या परागीभवनासाठी मधमाशा आवश्यक असून सर्व वनस्पतीच्या जैवविविधतेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
- मधमाशा कशा प्रकारे फुलांची निवड करतात, याचा मागोवा घेणे शक्य झाल्यास विविध प्रकारच्या जंगली वनस्पतींच्या प्रसारासाठी ते उपयुक्त ठरेल.
- मधमाशाच्या सवयी आणि आवडनिवड याविषयी माहिती उपलब्ध झाल्यास शेती आणि शेती उद्योगासाठी आवश्यक उत्पादन वाढ शक्य होईल.
--
जर्नल संदर्भ ः
G. A. Wright, D. D. Baker, M. J. Palmer, D. Stabler, J. A. Mustard, E. F. Power, A. M. Borland, P. C. Stevenson. Caffeine in Floral Nectar Enhances a Pollinator's Memory of Reward. Science, 2013; 339 (6124): 1202 DOI: 10.1126/science.1228806
------------------------------------
मधमाशांही कॅफेन असलेल्या फुलांची निवड करतात. त्याचा त्यांना स्मरणशक्ती वाढीसाठी फायदा होत असल्याचे दिसून आले आहे.

फोटोओळी ः

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा