मक्याच्या उत्पादनवाढीसाठी नत्र स्थिर करणाऱ्या झाडांचा वापर
जागतिक कृषी वनशास्त्र संस्थेने आफ्रिकेत केलेल्या दिर्घकालीन प्रयोगाचे निष्कर्ष
शेंगावर्गीय ग्लिरीसिडीया सारख्या झाडांचा अंतर्भाव मक्यासारख्या एकदल पिकांच्या शेतामध्ये केल्यास मका पिकांची उत्पादकता वाढवणे शक्य होणार आहे. ही बाब जागतिक कृषी वनशास्त्र संस्थेने दक्षिण आफ्रिकेमध्ये सुमारे 12 वर्षे केलेल्या अभ्यासातून पुढे आली आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष अमेरिकेतील सॉईल सायन्स सोसायटीच्या ऍग्रोनॉमी या संशोधनपत्रिकेमध्य प्रकाशित करण्यात आले आहेत.
आफ्रिकेतील अर्ध्यापेक्षा अधिक क्षेत्रावर मका पिकाची लागवड असून आहारामध्येही मोलाचा वाटा आहे. मका पिकांची उत्पादकता वेगाने घटत आहे. आफ्रिकेमध्ये अल्पभूधारक कोरडवाहू मका उत्पादक शेतकऱ्यांचे प्रमाण अधिक असून या पिकांच्या उत्पादनावरच त्यांची आर्थिक स्थिती अवलंबून असते. या पिकांच्या उत्पादन वाढीसाठी गेदेता सिलेशि, लिगस्से कास्सा डेबूशो आणि फेस्टस अकिन्निफेसी या संशोधकांनी दक्षिण आफ्रिकेतील कोरडवाहू मका पिकामध्ये शेंगावर्गिय झाडांच्या लागवडीचा पिकांच्या स्थिरतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला आहे.
...असे झाले संशोधन
- त्यांनी 1991 या वर्षापासूम मालावी आणि झांबिया येथे तीन समन्वयीत प्रयोग केले. मक्याच्या शेतामध्ये नत्र स्थिरीकरण करणाऱ्या झाडांचा अंतर्भाव केला. प्रति मक्यांच्या उत्पादनात होणाऱ्या वाढीचे निरीक्षण केले. मक्याच्या उत्पादनामध्ये दरवर्षी वाढ होत गेल्याचे दिसून आले.
- मालावी येथे शेंगावर्गीय झाडांचा अंतर्भाव केलेल्या शेतामध्ये आणि रासायनिक शेती क्षेत्रातील सरासरी मका उत्पादनामध्ये फारसा फरक दिसून आला नाही. काही क्षेत्रामध्ये नेहमी वापरत असलेल्या शिफारसीत खताची निम्मीच मात्रा दिली होती.
-प्रयोगामध्ये ग्लिरीसिडीया या झाडांची मक्यांच्या शेतामध्ये लागवड करण्यात आली. हे झाड हवेतून नत्र शोषून जमिनीमध्ये स्थिर करते. त्यामुळे नत्रयुक्त खताचा वापर कमी करावा लागतो. तसेच या झाडाची पाने मातीमध्ये मिसळल्यास सेंद्रिय पदार्थ उपलब्ध होतात. मातीची रचनात्मक गुणधर्म, स्थिरता, आणि पाणी साठवणक्षमता वाढते.
- रासायनिक खताच्या साह्याने फक्त मका पीक घेतलेल्या क्षेत्रामध्ये पहिला काही वर्षे उत्पादनामध्ये वाढ झाल्याचे जिसून आले तरी उत्पादनामध्ये सातत्य ठेवण्यामध्ये अडचणी येत गेल्या. मातीतील उपलब्ध पोषक घटक मका पिकाने उचलल्यानंतर पुढील काही वर्षामध्येच उत्पादनामध्ये घट होताना दिसून आली होती.
कोट ः
आफ्रिकेतील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी दिर्घकाळासाठी स्थिर आणि चांगले उत्पादन मिळण्याची आवश्यकता आहे. केवळ रासायनिक खताच्या साह्याने हे साध्य होणे शक्य नाही. या शेतकऱ्यांसाठी कृषी पद्धतीमध्ये नत्र स्थिरीकरण करणाऱ्या झाडांचा वापर हिच स्थिर, शाश्वत प्रणाली ठरू शकते.- फेस्टस अकिन्निफेसी,
समन्वयक, जागतिक कृषीवनशास्त्र संस्था,
दक्षिण आफ्रिका प्रादेशिक प्रकल्प.
--------------------------------
दिर्घकालीन फायद्यासाठी आफ्रिकेत संशोधनाची गरज
- पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करताना वनशास्त्रातील पद्धतीचा वापर दिर्घकालावधीसाठी फायद्याचा ठरत असल्याचे दिसून आले आहे. प्रथमच दिर्घकालावधीसाठी विश्लेषण करण्यात आले आहे. प्रति वर्ष पर्यावरणीय बदलामुळे पावसाच्या प्रमाणामध्ये, कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात बल होत आहेत. त्याचा सरळ परिणाम कोरडवाहू पिकांवर होत आहे. जागतिक तापमान बदलामुळे मका पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. एक अंश सेल्सियसने तापमान वाढल्यास अवर्षणामुळे 75 टक्केपेक्षा अधिक मका क्षेत्रावरील उत्पादनामध्ये 20 टक्के घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतीमधील मका लागवड ही धोक्यामध्ये असून उत्पादन स्थिर राहिले असून काही ठीकाणी ते घटत आहे.
- वाढत्या लोकसंख्येमुळे काही राज्यामध्ये सरासरी जमीन धारणा ही अर्ध्या हेक्टरपेक्षाही कमी होत आहे.
- सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा न करता सातत्याने पिके घेत राहिल्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. काही ठिकाणी मातीची आम्लता वाढली आहे.
अभ्यासाची मालिका...निष्कर्षातील साम्य
-अमेरिकेत,युरोपामध्ये 20 वर्षापासून 120 वर्षापर्यंतच्या निरीक्षणामध्ये विविध पिक पद्धतीचा मातीची पोषकता आणि घटकांवर होणारा परिणाम तपासण्यात आला आहे.
-नायजेरियामध्ये झालेल्या अभ्यासात केवळ रासायनिक खतावर घेतलेल्या मका पिकाचे उत्पादन 16 वर्षामध्ये प्रचंड घटले.
- पाकिस्तानमध्ये 14 वर्षे भात पिकावर केलेल्या प्रयोगातही असेच निष्कर्ष मिळाले आहेत. योग्य प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाशयपक्त खतांचा वापर करूनही उत्पादन घटल्याचे दिसून आले आहे.
जर्नल संदर्भ ः
Gudeta W. Sileshi, Legesse Kassa Debusho, Festus K. Akinnifesi. Can Integration of Legume Trees Increase Yield Stability in Rainfed Maize Cropping Systems in Southern Africa? Agronomy Journal, 2012; 104 (5): 1392 DOI: 10.2134/agronj2012.0063
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा