डाळिंब रोखते मेदयुक्त खाद्याचे विपरीत परिणाम
अतिरीक्त मेद असलेल्या पदार्थांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात. या विपरीत परिणामांना रोखण्याची क्षमता डाळिंबामध्ये असल्याचे स्पॅनिश संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये दिसून आले आहे.
स्पेन येतील कॅटालन ह्रद्यशास्त्र संस्थेमध्ये झालेल्या प्रयोगामध्ये फळापासून बनविलेल्या पूरक खाद्यपदार्थामुळे रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होत असल्याचे दिसून आले आहे. या पूरक खाद्यपदार्थांच्या चाचण्या माणसांसारखेच ह्रद्य असलेल्या वराहावर घेण्यात आल्या. या चाचण्या घेण्यापूर्वी त्यांनी अतिरीक्त मेद असलेला आहार देण्यात आला होता. या पूरक खाद्यामध्ये 200 मिलीग्रॅम पॉलीफिनॉल घटक ( त्यालाच प्युनिकलॅजिन्स असे म्हटले जाते.) ठेवण्यात आला. त्यामुळे मेदयुक्त खाद्यामुळे होणारे रक्तवाहिन्या कडक करण्याचे प्रमाण कमी होते. ह्रद्यरोग आणि अर्धांगवायूसारख्या रोगांना दूर ठेवणे शक्य होते. या संशोधनाबाबत माहिती देताना डॉ. लिना बॅडिमोन यांनी सांगितले, की आहारामध्ये डाळिंबाचा समावेश असल्यास त्यातील पॉलिफिनोलिट घटक ह्रद्य आणि शरीरातील अकार्यक्षमता निर्माण करणाऱ्या विविध घटकांचे परिणाम रोखू शकत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा