शेंगातील ऍलर्जीजन्य घटकांचा
एकत्रित माहितीसाठा केला तयार
अमेरिकी कृषी संशोधन संस्थेचे संशोधन
शेंगदाणे किंवा अन्य झाडावरील शेंगवर्गीय दाण्यांचा एकाच वेळी खाण्यामध्ये समावेश केल्यास काहीजणांना ऍलर्जी होते. अमेरिकी कृषी संशोधन संस्थेमध्ये अशा ऍलर्जी निर्माण करणाऱ्या प्रथिनांच्या माहितीचा साठा तयार करण्यात आला असून, त्याद्वारे ऍलर्जीच्या शक्यता ओळखण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे. अशा ऍलर्जीला क्रॉस रिऍक्टिव्हिटी असे म्हटले जाते.
अमेरिकेतील कृषी संशोधन संस्थेच्या न्यु ओरेलॉन्समधील अन्न प्रक्रिया आणि संवेदक दर्जा संशोधन केंद्रातील रसायनतज्ज्ञ सोहेला मलेकी यांनी टेक्सास विद्यापीठातील कॅथरीन श्चेन आणि सहकाऱ्यांसह हे संशोधन केले आहे. हे स्ट्रक्चरल डेटाबेस ऑफ ऍलर्जेनिक प्रोटिन्स SDAP या विषयीचे निष्कर्ष ऍलर्जी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
का होते ऍलर्जी ?
- अन्नामध्ये असलेल्या प्रथिनांना सूक्ष्म अशा पेपटाईडमध्ये रुपातंरीत करून त्याचे पचन केले जाते. रक्ताच्या प्रवाहातील प्रतिकारक यंत्रणेच्या प्रतिपिंडाकडून त्यांची ओळख पटविली जाते. अशा प्रतिकारक यंत्रणेमध्ये इम्यनोग्लोबिन इ (IgE) हे प्रतिपिंड अधिक प्रमाणात असल्यास ऍलर्जीचे प्रमाण वाढते. हे IgE अन्नातील प्रथिनांना बाह्य घटक समजून त्यावर अधिक प्रतिक्रिया देतात.
- शेंगदाणे आणि अन्य दाण्यातील प्रथिने यांच्याही बाह्य घटकामध्ये समावेश केला जातो. पर्यायाने शेंगदाणे खाल्याने काही लोकांना ऍलर्जी होते. नक्की कोणत्या दोन घटकांच्या एकत्रित वापरातून ऍलर्जी निर्माण होते, याचा अंदाज मिळविण्यासाठी माहितीचा साठा उपयुक्त ठरणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा