पुर परिस्थितीनंतर सुपीकतेसाठी
सायनोबॅक्टेरिया ठरतात कारणीभूत
सेजेस आणि विलो झाडाना त्यांच्या गरजेपुरते नत्र पुरातून वाहून आलेल्या गाळ आणि अन्य घटकामध्ये वाढणाऱ्या सायनोबॅक्टेरिया या सूक्ष्म जिवांकडून उपलब्ध होते. (स्रोत ः टी डिल्युका, वॉशिंग्टन विद्यापीठ) |
केवळ गाळाची माती नसते पुरेशी
पुरामुळे गाळाची माती जमा होऊन परिसरातील शेत जमिनीची सुपीकता वाढली जाते, असे आजवर मानले जात होते. मात्र, पृथ्वीच्या उत्तर भागातील जंगल परिसरामध्ये नेमकी त्याच्या विपरीत स्थिती असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. या परिसरामध्ये वाहत्या पाण्यामुळे जमिनीतील नत्राचे प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी झाले असून जिवाणूंची संख्या कमी असल्यास नत्र स्थिरीकरणही कमी झाल्याचे आढळले आहे. हे संशोधन प्लॉसवन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित झाले आहे.
रशिया आणि कॅनडाच्या हार्डी नॉर्समन आणि अन्य नव्या वसाहतींच्या परिसरामध्ये असलेल्या गवताच्या विपूलतेमुळे सायनो बॅक्टेरिया (नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू) मोठ्या प्रमाणात आहेत. या परिसरातील जंगलामध्ये गवतावर जगणाऱ्या प्राण्यांची संख्याही मोठी आहे. या परिसरामध्ये सातत्याने पूर येतात. नदीच्या पाण्यासोबत येणाऱ्या मातीमध्ये नत्राचे प्रमाण अधिक असल्याचे मानले जात होते. वॉशिंग्टन विद्यापीठातील पर्यावरण आणि वन शास्त्र विभागातील संशोधक थॉमस डेल्युका यांनी सांगितले, की अभ्यासामध्ये या समजापेक्षा वेगळी स्थिती असल्याचे दिसून आले आहे. हवेतील नत्राचे स्थिरीकरण करण्यामध्ये मोलाची भुमिका निभावणारे सायनोबॅक्टेरिया जंगलाच्या वाढीमध्ये महत्त्वाची भुमिका निभावतात. त्यामुळे शतकानुशतके कोणत्याही खत व्यवस्थापनाशिवाय या जंगलाची वाढ झालेली आहे.
असे झाले संशोधन
- उत्तर फेनोस्कॅन्डिया भागातील दहा नद्या आणि 71 पुरग्रस्त प्रदेशांचा अभ्यास करण्यात आला. हा भाग स्कॅन्डीनेव्हिया आणि फिनलॅंड देशामध्ये येतो. या नद्या निवडताना नदीच्या काठाचा एक भाग हा प्रिस्टींन जंगलाचा व मानवाच्या संसर्गापासून दूर असलेला निवडण्यात आला. तसेच टूण्ड्रा प्रदेशाशी साधर्म्य असलेल्या बोरीयल रहिवासांचाही काही प्रमाणात समावेश होता.
- बोरीयल प्रांताच्या उत्तरेकडील भागामध्ये परिसरातील टेकड्यावरील माती नापीक असून नत्र स्थिरीकरण करणाऱ्या वनस्पतीचा अभाव आहे. या ठिकाणी मॉस आणि अन्य घटकांच्या साह्याने सायनोबॅक्टेरियाची वसाहत वाढविण्याचा प्रयत्न केला. त्यातील काही भाग हा पाण्याच्या प्रवाहापर्यंत जातो.
- पूर परिसरामध्ये सायनोबॅक्टेरियांच्या हंगामी वाढण्याचे अनेक पुरावे आढळून येतात. त्यामुळे झाडांच्या मुळांच्या परिसरामध्ये आवश्यक तो नत्र उपलब्ध होतो.
- काळ्या, थंड आणि बर्फाळ थंडी असलेल्या उत्तर स्वीडनमध्येही उष्ण आणि सजिवांसाठी योग्य वातावरण असलेल्या फ्लोरिडा भागाप्रमाणे सायनोबॅक्टेरिया नत्राचे स्थिरीकरण समान दरामध्ये करत संशोधकांना असल्याचे दिसून आले आहे.
- सायनोबॅक्टेरिया विलो आणि सेजेसच्या जंगलातील भागामध्ये शेतामध्ये शेतकरी पुरवित असलेल्या प्रमाणाच्या एक चतुर्थांश ते एक षष्ठांश इतक्या नत्राचे स्थिरीकरण करत असल्याचे अभ्यासात दिसून आले. मात्र, दोन किलो रासायनिक नत्र तयार करण्यासाठी अनेक गॅलन डिझेलचा वापर करावा लागतो. त्यातुलनेत सायनोबॅक्टेरिया नैसर्गिक रित्या नत्राचे स्थिरीकरण करतो.
कृषी क्षेत्रात वापरण्यासाठी योग्य प्रारुपाची गरज
जंगलाच्या परिसरामध्ये नत्राचा पुरवठा करण्यामध्ये सायनोबॅक्टेरिया मोलाची भुमिका निभावतो. शेतीमध्ये त्यांचा उपयोग करणे शक्य झाल्यास कृषी क्षेत्रातील उत्पादकता वाढवणे शक्य होणार आहे. मात्र, शेतकरी शेतामध्ये या जिवाणूंचा वापर करून पिकांचे उत्पादन घेऊ शकतात का, या दिशेने विचार केल्यास प्रश्नांची मालिका उभी राहते. नदीतील नत्रांचे प्रमाण मोजण्यासाठी अचूक अशा प्रारुपांची निर्मिती करावी लागेल. सध्या असे प्रारुप उपलब्ध नाही.जर्नल संदर्भ ः Thomas H. DeLuca, Olle Zackrisson, Ingela Bergman, Beatriz Diez, Birgitta Bergman. Diazotrophy in Alluvial Meadows of Subarctic River Systems. PLoS ONE, 2013; 8 (11): e77342 DOI: 10.1371/journal.pone.0077342
----------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा