हरितगृहाचे ऊर्जा कार्यक्षम प्रारूप विकसनासाठी शोधले नवे गणिती साधन
चिली देशातील संशोधन
चिली येथील संशोधकांनी हरितगृहातील वातावरणांचे नियंत्रण करण्यासाठी नवे गणिती साधन विकसित केले आहे. या साधनामुळे हरितगृहातील तापमान, सूर्यकिरणांचे बदलते प्रमाण यांच्या सोबत गणिती पद्धतीने नियंत्रण करणे शक्य होणार आहे.
आपल्याकडे पुर्णपणे नियंत्रित स्वरुपांची हरितगृहे कमी प्रमाणात आहे. पुर्णपणे नियंत्रित पद्धतीच्या हरितगृहामध्ये वातवरणांच्या नियंत्रणावरच उत्पादनाचे गणित विसंबलेले असते. वातावरणातील बदलते घटक सातत्याने मोजत त्याचे विविध पद्धतीद्वारे नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यासाठी एक नवे साधन चिली येथील सॅण्टा मारिया तंत्रविद्यापीठातील ऊर्जा नवोन्मेषी संस्थेचे संचालक जैमी इस्पीनोझा आणि स्थापत्य आणि यांत्रिकी अभियांत्रिकीचे विद्यार्थी मॅक्सीमिलिनो रॅमीरेझ यांनी तयार केले आहे. त्याबाबत माहिती देताना इस्पीनोझा म्हणाले, की कृषी क्षेत्रामध्ये लागवड, उत्पादन, पॅकिंग आणि रेफ्रिजरेशन यासारख्या प्रत्येक विभागामध्ये नवेनवे तंत्रज्ञान सातत्याने उपलब्ध होत आहे. सद्यस्थितीतील हरितगृहामध्ये सुधारणा करण्यासाठी सध्या कोणत्या पद्धतीने कामकाज चालते आणि त्यामध्ये कोणत्या शास्त्रीय सुधारणा होऊ शकतात, यावर काम सुरू केले होते. ऊर्जा नवोन्मेषी संस्थेच्या वतीने ऊर्जेच्या कार्यक्षम वापराच्या दृष्टीने विविध प्रकारचे हरितगृह प्रारूप तयार करण्यात आली आहेत. या आधी झालेल्या अभ्यास आणि संशोधनातून गणितीय साधनांच्या साह्याने नवे प्रारूप तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. हे साधन सातत्याने बदलत राहणाऱ्या सौर किरणे, तापमान या सारख्या घटकांचे मापन करतानाच नियंत्रित करण्यासाठी आवश्यक ते पर्याय उपलब्ध करते.
सर्व शास्त्रांचा समन्वय शेतीसाठी आवश्यक
हरितगृह हे केवळ कृषी क्षेत्राशी संबंधित नसून त्यात यांत्रिकी, भौतिक शास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक शास्त्र यांचाही वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे शास्त्रीय प्रारूप तयार करताना या बाबी महत्त्वाच्या होत्या.- हरितगृहातील तापमानाचे मापन करताना दिवसातील तापमान एक मुख्य मुद्दा असतोच, त्यासोबत वर्षातील प्रत्येक दिवसांचे तापमान यांचाही अंदाज असणे आवश्यक असते. तोही दृष्टीकोन समोर ठेवावा लागतो.
- वातावरणातील सापेक्ष आर्द्रता आणि येणाऱ्या धुक्यांचा अंदाज मिळवणे आवश्यक असते. त्यासाठी विविध माहिती मिळवणे आणि त्यांचे विश्लेषण करत हरितगृह आणि प्रदेशातील वातावरणातील बदलत्या घटकांची सांगड घालण्याची आवश्यकता असते.
विविध वातावरणामध्ये होणार अधिक प्रयोग
- प्रयोगासाठी निवडण्यात आलेले हरितगृह पॉलीइथीलीन आच्छादनाचे व चॅपेल पद्धतीचे होते. विश्लेषणातून हरितगृहाच्या आतील वर्षभराचे तापमान मिळवण्यात आले. त्यातून पिकांना उपलब्ध केलेल्या वातावरणाची संपुर्ण प्रतिमा उभी राहण्यास मदत होते.
- भविष्यामध्ये वेगळ्या प्रदेशातील वेगळ्या वातावरण परिस्थितीमध्ये अभ्यास करण्यात येणार आहे. त्यानुसार या प्रारूपामध्ये बदल करण्यात येतील. त्यातून अधिक ऊर्जा कार्यक्षम हरितगृहे तायर करणे शक्य होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा