लाकडाच्या कुजण्याच्या प्रक्रियेवर हवामानापेक्षा वाळवी आणि बुरशींच्या संख्येचा अधिक प्रभाव पडत असल्याचे अमेरिकेत झालेल्या संशोधनातून पुढे आले आहे. हे संशोधन जर्नल नेचर क्लायमेट चेंज मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
आजवर लाकडाच्या कुजण्याच्या प्रक्रियेमध्ये तापमानाची भूमिका महत्त्वाची असल्याचे मानले जात होते. कुजण्याच्या प्रक्रियेतून मुक्त होणाऱ्या कार्बनच्या प्रभाव जंगलातील पर्यावरणावर होत असतो. हे कर्बवायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठी जागतिक पातळीवर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. जंगलातील विविध अवशेषांच्या कुजण्याच्या प्रक्रियेवर सेंट्रल फ्लोरीडा युनिव्हर्सिटी आणि बफेलो स्टेट युनिव्हर्सिटी येथील संशोधकांनी अधिक अभ्यास केला. त्यांना लाकडाच्या कुजवण्याच्या प्रक्रियेमध्ये बुरशी आणि वाळवी या तापमानापेक्षा मुख्य भुमिका निभावत असल्याचे दिसून आले आहे.
असे झाले प्रयोग ः
- स्थाननिहाय सरासरी कुजवण दर हा प्रामुख्याने त्या स्थानाच्या हवामानाशी जोडला गेला. मात्र, या संशोधनामध्ये त्या स्थानावरील बुरशी आणि वाळवीच्या संख्येचा प्रभाव अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
- सुमारे 13 महिने 160 पाईन वृक्षाच्या लाकडावर पूर्व अमेरिकेतील पाच वन विभागामध्ये प्रयोग करण्यात आले. कुजवण प्रक्रियेचा अभ्यास व विश्लेषण करण्यात आले. त्या बाबत माहिती देताना जीवशास्त्रज्ञ जोशुआ किंग यांनी सांगितले, की हवामानाच्या बदलाचा कुजवण्याच्या प्रक्रियेमध्ये मोलाचा वाटा असल्याचे मानले जात होते. मात्र, छोट्या किटकांनी आणि बुरशीनी कुजवण प्रक्रियेवर आपले नियंत्रण अधिक असल्याचे दाखवून दिले आहे. अर्थात, स्थाननिहाय बुरशी आणि वाळवीच्या कुजवण प्रक्रियेचा दर वेगवेगळा आढळला आहे.
--------
सेंट्रल फ्लोरीडा विद्यापीठातील वाळवी आणि मुंग्यावरील तज्ज्ञ जोशुआ किंग.
जर्नल संदर्भ ः
Mark A. Bradford, Robert J. Warren II, Petr Baldrian, Thomas W. Crowther, Daniel S. Maynard, Emily E. Oldfield, William R. Wieder, Stephen A. Wood, Joshua R. King. Climate fails to predict wood decomposition at regional scales. Nature Climate Change, 2014; DOI: 10.1038/nclimate2251
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा