मातीतील सूक्ष्मजीवांची विविधता प्रदूषकांच्या विघटनामध्ये ठरते मोलाची
मातीतील सूक्ष्मजीवांच्या विविधतेमध्ये पाच टक्क्यांनी घट झाल्यास पर्यावरणातील विषारी घटकांच्या विघटणाच्या प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असल्याचे ऑस्ट्रेलियातील संशोधनात आढळले आहे. हे संशोधन एन्व्हायर्नमेंटल मायक्रोबायोलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित केले आहे.
शेतीतील माती जिवंत व सुपीक असण्यासाठी मातीतील सुक्ष्मजीव महत्त्वाची भुमिका निभावतात. अनेक वेळा सूक्ष्मजिवाच्या जैवविविधतेचा काय लाभ होतो, या विषयी अधिक माहिती नसल्याने सवंर्धनासाठी फारसे प्रयत्न केले जात नाहीत. शेतीच्या मातीमध्ये हजारो सूक्ष्म जीव आढळून येतात. त्यांचा लाभ पिकांच्या उत्पादनासाठी होत असतो. तसेच मातीमध्ये मिसळल्या जाणाऱ्या विषारी घटकांचा प्रभाव कमी करून प्रदूषण आटोक्यात ठेवण्यामध्ये या सूक्ष्म जीवांचा मोलाचा वाटा असतो. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न सिडनी येथील संशोधक डॉ. ब्रजेश सिंग यांनी सांगितले,की पर्यावरणातील विषारी घटकांचे विघटन होण्याच्या प्रक्रियेमध्ये घट झाल्यास त्याचे विपरीत परिणाम एकूणच पर्यावरणावर होणार आहे. पृष्ठभाग आणि भूजलामध्ये रासायनिक घटकांचे प्रदुषण वाढत जाणार आहे. त्यामुळे मातीतील सूक्ष्मजीवाविषयी विषारी घटकांच्या विघटनाच्या दृष्टीने अधिक माहिती मिळवली जात आहे.
मातीतील प्रदुषण वाढण्याची कारणे ः
- शेतीतील मातीमधील सूक्ष्मजीवांच्या विविधतेमध्ये घट होण्याची कारणे गुंतागुंतीची आहेत. संशोधकांच्या गटाने दीर्घकालीन प्रदुषणामध्ये जड धातूंच्या ( कॅडमिअम, जस्त आणि तांबे) प्रमाणामध्ये औद्योगिक कारणामुळे वाढ होत असल्याचे दिसून आले.
- शेतीमध्ये सेंद्रिय खत म्हणून वापरला जाणारा टाकाऊ कचऱ्याच्या माध्यमातून मातीमध्ये विषारी घटकांचे प्रमाण वाढत आहे. तसेच किडनाशके व तणनाशकांचा अनियंत्रित होत असलेला वापर ही विषारी घटकांचे प्रमाण वाढवत आहे.
- युरोपीय संघाने निर्धारीत केलेल्या पातळीच्या कितीतरी पट अधिक प्रमाण जड धातूंचे मातीच्या तपासणीमध्ये दिसून आले आहे. या मातीतील सूक्ष्मजीवांच्या विविधतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचेही या अभ्यासात आढळले आहे. त्यामुळे विषारीपणा कमी करण्यामध्ये मोलाची भुमिका निभावणाऱ्या सूक्ष्मजीवांची विविधता वाढविण्यासंदर्भात प्रयत्न केले जात आहेत.
जर्नल संदर्भ ः
Brajesh K. Singh, Christopher Quince, Catriona A. Macdonald, Amit Khachane, Nadine Thomas, Waleed Abu Al-Soud, Søren J. Sørensen, Zhili He, Duncan White, Alex Sinclair, Bill Crooks, Jizhong Zhou, Colin D. Campbell. Loss of microbial diversity in soils is coincident with reductions in some specialized functions. Environmental Microbiology, 2014; DOI: 10.1111/1462-2920.12353

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा