शरीरात योग्य ठिकाणी होणार औषधांचे वहन,
पेनसिल्व्हिया विद्यापीठातील संशोधन
अमेरिकेतील पेनसिल्व्हिया विद्यापीठातील संशोधकांनी औषधाच्या वहनासाठी वापरल्या जाणाऱ्या कॅपसूल (व्हेसिकल्स) आणि त्यांच्या आकाराविषयी संशोधन केले असून सूर्यफूल आणि तीळापासून मिळवलेल्या प्रथिनांचा वापर केला आहे. या संशोधनाचा फायदा विविध रोगासाठी औषधे शरिरात योग्य ठिकाणी पोचविण्यासाठी चांगल्या प्रकारे वापर करता येणार आहे. त्यामुळे रोगावरील उपचारातील औषधांची परीणामकारकता वाढण्यास मदत मिळणार आहे. हे संशोधन राष्ट्रीय शास्त्र ऍकेडमी च्या वार्षिक अहवालात प्रकाशित करण्यात आले आहे.
अत्यंत कटवट औषधे घेण्यासाठी विविध प्रकारच्या कॅपसूलचा वापर केला जातो. शरीरामध्ये योग्य ठिकाणी औषधाचे रसायन पोचविण्यासाठी योग्य मुलद्रव्यांचा शोध सातत्याने घेतला जातो. ही मुलद्रव्ये विकसित करणे, त्यात औषधे भरणे हे महत्त्वाचे आणि अवघड काम असते. मानवी शरीराच्या किंवा अन्ननलिकेचा विचार करून दुहेरी आवरणांच्या पोकळ कॅपसुल आदर्श मानल्या जातात. कारण नैसर्गिकरित्या शरीर रसायने पाठविण्यासाठी अशाच प्रकारच्या संरचना तयार करते. नवीन दृष्टीकोन स्विकारला असून वनस्पतीच्या प्रथिनांचा त्यासाठी वापर करण्यात येत आहे. सूर्यफूलांच्या बियांमध्ये मिळालेल्या प्रथिनांचा उपयोग जनुकिय अभियांत्रिकीच्या साह्याने मुलद्रव्य बांधणीसाठी योग्य संरचना वापरली.
संशोधनाविषयी माहिती देताना संशोधक डॅनियल हॅमर यांनी सांगितले की, प्रथमच नैसर्गिक प्रथिनांचा वापर व्हेसिकल साठी करण्यात आला आहे. त्यांचा आकार औषधांच्या वहनासाठी त्यात योग्य ते बदल करून घेण्यात आले आहे. कर्करोगांच्या गाठीमध्ये आम्लता अधिक असून त्या वातावरणात वरील आवरण गळून पडते. औषधांचा योग्य ठिकाणींच वापर होतो.
पेनसिल्व्हिया विद्यापीठातील रसायन आणि जौव मुलद्रव्यीय अभियांत्रिकी विभागातील संशोधक रंगनाथ पार्थसारथी यांच्या मार्गदर्शऩाखाली हे संशोधन करण्यात आले आहे.
संशोधनातील महत्त्वाचे...
- रिकॉम्बिनंट प्रोटिन्स ही सुधारीत प्रथिने असून यजमान घटकापासून जनुकिय संरचना घेऊन सुधारणा केली जाते.
- या संशोधनात सूर्यफूल आणि तीळांच्या बियातून एक प्रथिन वेगळे करण्यात यश आले आहे. त्या मुलद्रव्याचे नाव ओलेसिन असे आहे. ओलेसिनचे जनुकिय विश्लेषण केले आहे. त्यात इ.कोलाय सारख्या जिवाणूंच्या साह्याने योग्य ते बदल करून घेतले आहे.
- हे ओलेसिन हे साबणासारखे रसायन असून ती एका बाजूला पाण्याकडे आकर्षित होते, तर दुसऱ्या बाजूने दूर ढकलली जाते. अशा पदार्थांना इंग्रजीत सरफॅक्टन्ट असे म्हणतात. त्यांचा वापर अनेक ठिकाणी केला जात असला तरी व्हेसिकल्स मध्ये प्रथमच करण्यात आला आहे.
- व्हेसिकल्स मध्ये दोन्ही बाजू या पाण्याला दूर ठेवणाऱ्या असतात. मात्र पाण्यामध्ये विरघळू शकणाऱ्या व्हेसिकल्स चे आपले फायदे आहेत. त्यांचा वापर औषधांच्या वहनासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.
--------
जर्नल संदर्भ- K. B. Vargo, R. Parthasarathy, D. A. Hammer. Self-assembly of tunable protein suprastructures from recombinant oleosin. Proceedings of the National Academy of Sciences, 2012.
------
फोटोओळ- रिकॉम्बिनंट तंत्रज्ञानातून संशोधकांनी वनस्पतीच्या प्रथिन ओलेसिनचे विविध प्रकार विकसित केले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा