अमेरिकन कृषी संशोधन संस्थेचे संशोधन,
सुत्रकृमी प्रतिकारक जाती विकसनासाठी होणार मदत
कपाशी हे जगभरातील नगदी पिक म्हणून ओळखले जाते. या पिकामध्ये मुळांवर गाठी करणारे (root-knot nematode) तसेच मूत्रपिंडी सूत्रकृमी (reniform nematode.)यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. त्यांच्यामुळे पिकाची वाढ खुंटते. उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येते. त्यामुळे सूत्रकृमींना प्रतिकारक जाती विकसित करण्यासाठी गेल्या काही वर्षापासून प्रयत्न केले जात आहेत. त्यातील महत्त्वाचा टप्पा अमेरिकेतील कृषी संशोधन संस्थेच्या मिसिसिपी राज्यातील जेनेटिक्स ऍण्ड प्रिसिजन ऍग्रीकल्चर रिसर्च युनिट च्या जॉनी जेन्किनस आणि सहकाऱ्यांनी पार केले आहे. त्यांनी कपासीतील मुळावर गाठी करणाऱ्या सूत्रकृमींना प्रतिकार करण्यासाठी कारणीभूत असलल्या जनुकांच्या गट ओळखला आहे. हा गट कपाशीच्या 11 आणि 14 गुणसूत्रांवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. या संशोधनाचा सूत्रकृमी प्रतिकारक जाती विकसित करण्यासाठी उपयोग होणार आहे.
कपाशीवरील मुळांवर आढळणाऱ्या सुत्रकृमीबरोबर मुत्रपिंडी सुत्रकृमी (रेनिफार्म निमॅटोड, Rotylenchulus reniformis) मुळे अमेरिकेतील कपाशी आणि वस्त्रोद्योगाचे सुमारे130 दशलक्ष डॉलरचे नुकसान होते. तसेच या सुत्रकृमीमुळे कपाशीतील मुळावर गाठी करणाऱ्या मुख्य सूत्रकृमीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून आले आहे.
या सुत्रकृमीसंदर्भातही जेन्किन्स आणि सहकाऱ्यांनी संशोधन केले आहे. त्यांनी कपाशीची जंगली प्रजाती गॉसिपिअम बार्बेडेन्स (Gossypium barbadense ) मध्ये एकापेक्षा अधिक गुणसुत्रे आढळली आहेत. त्यांची निश्चिती करण्यात आली असून त्यांचा गट गुणसूत्र 21 आणि 18 वर आढळून आला आहे.
व्यावसायिकरित्या कपाशीच्या सूत्रकृमी प्रतिकारक जाती विकसित करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असले तरी एकापेक्षा अधिक जनुकांशी संबंधित हा विषय असल्याने संशोधन अधिक वेळखाऊ आणि महागडे ठरत आले आहे. मात्र या संशोधनामुळे कपाशींच्या नव्या जाती विकसित करण्यामध्ये सुलभता येणार आहे.
सुमारे 100 वर्षापुर्वी कपाशीवर सूत्रकृमीचा प्रादुर्भाव होत असल्याचे प्रथम आढळले होते. त्यानंतर 1930 पासून सातत्याने सूत्रकृमीच्या प्रादुर्भाव कमी करण्यासंदर्बात , नवीन प्रतिकारक जाती विकसित करण्यासाठी संशोधन होत आले आहे. 1960 पासून अमेरिकेतील कृषी संशोधन संस्थेने कपाशीतील मुळांवर गाठी करणाऱ्या सूत्रकृमीसंदर्भात संशोधनाला सुरवात झाली. निवृत्त संशोधक रेमंड शेपर्ड यांनी मेकसिकोतील जंगली मानल्या जाणाऱ्या कपाशीतील सुत्रकृमी प्रतिकारक गुणधर्म ओळखले होते. त्याचा वापर नव्या जाती विकसित करण्यासाठी केला होता.
हे संशोधन थेरॉटिकल ऍण्ड ऍप्लाईड जेनेटिक्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. या संशोधनात उस्मान गुटिइरेझ, जॅक मॅककर्टी, मार्टिन वूबेन आणि फ्रॅंकलिन कलाहान यांच्यासह निवृत्त संशोधक फॉरेस्ट रॉबिन्सन या संशोधकांचा सहभाग होता.
--
तज्ज्ञ म्हणतात...

राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठातील सुत्रकृमी तज्ज्ञ डॉ. नानासाहेब म्हसे यांनी सांगितले की महाराष्ट्रात कपाशीच्या मुळावर मुत्रपिंडी सुत्रकृमीचा प्रादुर्भाव आढळून येतो. या सुत्रकृमीमुळे साधारणपणे कपाशींच्या उत्पादनात 12 ते 15 टक्के घट होते. या नवीन संशोधनामुळे कपाशीच्या सुत्रकृमी प्रतिकारक जाती विकसित होण्यास मदत मिळणार असून कपाशींच्या उत्पादनात वाढ मिळू शकेल. सध्या या सुत्रकृमींच्या जैविक नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिस ल्युनासिनस, स्युडोमोनस फ्लुरोसन्स या घटकांची सुत्रकृमींच्या प्रादुर्भावानुसार प्रति हेक्टरी 5 ते 20 किलो शेणखतात मिसळून वापरण्याची शिफारस केली जाते.
---------------
फोटोओळ- कपाशींच्या मुळावर गुलाबी रंगात दिसणारी रेनिफॉर्म सुत्रकृमीची मादी ( स्रोत- डॉ. मार्टिन वुबेन)
---------------
फोटोओळ- कपाशींच्या मुळावर गुलाबी रंगात दिसणारी रेनिफॉर्म सुत्रकृमीची मादी ( स्रोत- डॉ. मार्टिन वुबेन)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा