जर्मनीतील संशोधन,
कुंड्याचा आकार दुपटीने वाढवता रोपांच्या वाढीचा दर 44 टक्कयांनी वाढला.
रोपांच्या वाढीसाठी त्यांच्या मुळांची वाढ चांगल्या पद्धतीने होण्याची आवश्यकता असते. मुळांच्या वाढीसाठी योग्य ती जागा उपलब्ध झाल्यास रोपांची पर्यायाने पिकांची वाढ चांगली होते. या बाबत जर्मनी येथील शुंगझेन्ट्रम ज्युलिच संस्थेतील संशोधक डॉ. हेन्ड्रीक पुर्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी संशोधन केले असून मुळांच्या वाढीसाठी दुप्पट जागा उपलब्ध केल्यानंतर रोपांच्या वाढीचा दर 44 टक्क्यांनी वाढल्याचे आढळले आहे. या संशोधनात मुळांची वाढ तपासण्यासाठी त्यांनी त्रिमितीय स्कॅनिंगचा वापर केला होता. हे संशोधन नुकत्याच झालेल्या सोसायटी फॉर एक्सपेरिमेंटल बायोलॉजी च्या बैठकीमध्ये सादर करण्यात आले.
रोपवाटिकेमध्ये किंवा शेतातही रोपांचे अंतर ठरविण्यासाठी रोपांच्या वाढीचा, त्यांच्या पानांच्या घेरांचा अभ्यास केला जातो. मात्र त्यांच्या मुळांच्या वाढीचा, मुळांना आवश्यक असलेल्या जागेचा प्रथमच अभ्यास करण्यात आला आहे. जर्मनी येथील संशोधक डॉ. हेन्ड्रिक पुर्टर यांच्या नेतृत्वाखाली 65 स्वतंत्र संशोधनामध्ये विविध पिकांच्या मुळांच्या वाढीचा अभ्यास केला असून त्यांच्या त्रिमितीय स्कॅनिंग तंत्रज्ञानाने प्रतिमा घेण्यात आल्या आहेत . याबाबत माहिती देताना पुर्टर यांनी सांगितले, की खर्च कमी करण्याच्या दृष्टीने रोपवाटिकेमध्ये लहान कुंड्याचा वापर केला जातो. मात्र त्यामध्ये वाढणाऱ्या रोपांच्या वाढीचा विचार केला तर ते अंतिमतः नुकसानीचे ठरते. शेतकऱ्यांनी रोपे तयार करताना मोठ्या आकारांच्या पिशव्यांच्या वापर केला पाहिजे. त्यामुळे त्यांची रोपे सशक्त आणि अधिक वेगाने वाढतील. पर्यायाने उत्पादनात काही प्रमाणात वाढ होऊ शकते.
असे झाले प्रयोग
- मुख्य पिकातील टोमॅटो, बार्ली, मका, शुगर बीट यांच्यासह निवडूंग वर्गातील वनस्पतीच्या मुळांच्या वाढीचा अभ्यास केला. त्यासाठी कुंड्यांच्या विविध आकाराचा वापर केला. साधारण कुंडीच्या आकारात दुपटीने वाढ केल्यानंतर रोपांच्या वाढीत 43 टक्केने वाढ झाल्याचे आढळले. त्यासाठी त्यांनी विविध व्यासाच्या गोलाकार आकाराच्या उभ्या कुंड्याचा वापर केला. टोमॅटो, शुगरबीटच्या लागवडीनंतर 44 दिवसांनी एमआरआय तंत्राने प्रतिमा घेतली.
- कुंड्याच्या आकाराचा परिणामाबाबत समजून घेण्यासाठी रोपांच्या वाढीचा विविध घटकांवर लक्ष केंद्रित केले. लहान कुंड्यातील रोपांच्या वाढीचा दर हा कमी असून पानांच्या जाडीमध्ये कोणताही फरक दिसून आला नाही.
- कुंड्यांच्या आकारात वाढ झाल्याचे पिकांच्या मुळांना जाणिव होताच त्यांची वाढ त्या दिशेने सुरू होते. मुळांना ही जाणिव कशा प्रकारे होते, याविषयी अधिक माहिती मिळाली नाही.
बार्ली |
----
फोटोओळ-
पिकाच्या लागवडीनंतर 44 दिवसाने घेतलेल्या प्रतिमेमध्ये लहान आकाराच्या कुंडीतील मुळे पिवळ्या रंगात दर्शवली आहेत, तर वाढीनंतरची मुळे लाल रंगात दर्शवली आहेत पहिल्या छायाचित्रामध्ये बार्ली तर दुसऱ्यामध्ये शुगर बीट दिसत आहे. (स्रोत- जोनास बुहलर)
फोटोओळ-
पिकाच्या लागवडीनंतर 44 दिवसाने घेतलेल्या प्रतिमेमध्ये लहान आकाराच्या कुंडीतील मुळे पिवळ्या रंगात दर्शवली आहेत, तर वाढीनंतरची मुळे लाल रंगात दर्शवली आहेत पहिल्या छायाचित्रामध्ये बार्ली तर दुसऱ्यामध्ये शुगर बीट दिसत आहे. (स्रोत- जोनास बुहलर)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा