बुरशींच्या अभ्यासातून उलगडेल माहितीचा खजिना
आंतरराष्ट्रिय प्रकल्पात 12 देश व 71 संशोधकांचा समावेश
आजवर केवळ पाच टक्के बुरशींची माहिती उपलब्ध
कोळसा आणि खनिज तेल ही माणसासाठी महत्त्वाची ऊर्जा साधने आहेत. सहा कोटी वर्षापासून विविध बुरशी प्रजाती या जमिनीमध्ये गाडल्या गेलेल्या घटकांचे कोळशामध्ये रुपांतर करतात. या रुपांतरासाठी काऱणीभूत असलेल्या बुरशींचा आंतरराष्ट्रिय संशोधक गटाकडून अभ्यास केला जात आहे. या गटामध्ये 12 देशातील 71 संशोधकांचा समावेश आहे. तसेच भविष्यातील अभ्यासासाठी त्यांचे वर्गीकरणही करण्यात येत असून जनुकिय माहिती या प्रकल्पामध्ये गोळा करण्यात येत आहे. त्यामुळे बुरशीच्या अनेक प्रजातींची माहिती उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे. त्यांच्या लाभदायक आणि हानीकारक दोन्ही प्रकारच्या गुणधर्माची माहिती झाल्यास त्याचा फायदा मानव जातीसाठी होणार आहे. कृषी क्षेत्र व अन्य क्षेत्रासाठी ही माहिती बहुमोल ठरणार आहे.
पृथ्वीवर सुमारे 1.5 दशलक्ष बुरशींच्या प्रजाती आहेत. पर्यावरणातील कुजवण्याच्या प्रक्रियेमध्ये आणि अन्य अनेक कीटकांसाठी व प्राण्यासाठी आवश्यक ते खाद्य मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. मात्र यातील केवळ पाच टक्के प्रजातीचे वर्गीकरण पुर्ण झाले आहे. अन्य प्रजातीविषयी माहिती मिळविण्यासाठी व त्याचे योग्य ते वर्गीकरण करण्यासाठी अभ्यास प्रकल्प राबवला जात आहे. त्यासाठी राष्ट्रिय शास्त्र फौडेंशन ने अर्थसाह्य केले आहे.
कोळसा कसा बनतो
- गाडली गेलेल्या झाडांच्या लिग्निनचे रुपांतर कोळशामध्ये होते. वनस्पतीच्या पेशीभित्तिकातील लिग्निन हा महत्त्वाचा घटक असून त्यामुळे झाडाला ताकद मिळते. कार्बनीफेरस कालखंडांच्या अंताच्या वेळी व्हाईट रॉट बुरशी ही मुख्य बुरशी लिग्निनचे कोळशात रुपातंर करते. जिवाश्मत या बुरशीचे प्रमाण आढळून आले आहे. जर या बुरशी नसतील, तर कार्बनीफेरस कालखंडानंतरही त्याचे कोळशांत रुपांतरणाची प्रक्रिया चालू असल्याचे दिसून येते. या संदर्भात पांढऱ्या बुरशींची उत्क्रांती या विषयावर 1990 साली जेनिफर रॉबिनसन यांनी संशोधन प्रकाशित केले होते.
- पेशीभित्तिकेमध्ये असलेल्या लिग्निन पांढऱ्या बुरशींनी हल्ला केल्यानंतर त्यातील सेल्युलोज मुक्त होतो. हा सेल्युलोज हा त्या पांढऱ्या बुरशींचे खाद्य असते. सध्या गुणधर्माचा वापर जैवइंधन बनविण्याच्या प्रक्रियेमध्ये करून घेतला जातो.
जनुकिय तुलना
- या संशोधनाचे मुख्य आणि अमेरिकेतील क्लार्क विद्यापीठातील संशोधक डेव्हिड हिबेट म्हणाले की, लिग्निनच्या कुजवणातील बुरशीमध्ये झालेल्या उत्क्रांतीचा अभ्यास करून त्याचे विश्लेषण आणि प्रसारण शोधण्यात येत आहे. तसेच त्यांचे जनुकिय विश्लेषण करण्यात येत आहे.
- हिबेट आणि सहकाऱ्यांनी आगरीकोमायसेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मोठ्या बुरशी गटावर लक्ष केंद्रित केले असून त्यात पांढरी बुरशी, काही अलिंबीच्या प्रजाती यांचा समावेश होतो. त्यामध्येच सेल्युलोज आणि हेमी सेल्युलोजचे तुकडे करत लाकूड नष्ट करणाऱ्या तपकिरी बुरशींचाही समावेश होतो. या बुरशी लिग्निनचे विघटन करत नाहीत.
- संशोधकांनी 31 बुरशींच्या जनुकिय माहितीची तुलना केली असून 26 बुरशींचा जनुकिय नकाशा तयार करण्यात आला आहे. त्यातील 12 बुरशी या जैवइंधन व अन्य जैवघटकांच्या विकसनामध्ये मोलाची भुमिका बजावत असल्याचे हेविट यांनी सांगितले.
पांढऱ्या बुरशीतील उत्क्रांती
- लिग्निन घटकांचे विघटन करणाऱ्या बुरशी-विकरांच्या उत्क्रांतीचा अभ्यास मुलद्रव्यीय घड्याळांच्या विश्लेषणातून करण्यात आला आहे. घड्याळातील काट्याप्रमाणे ठराविक अंतराने, ठराविक दराने त्यांच्यात बदल झाल्याचे गृहित धरून अंदाज केले जातात. ऍगरीकोमायसेट बुरशीमध्ये मोठ्या प्रमाणात फरक आहेत. काही प्रजाती या मुळांच्या सान्निध्यात आपले पोषक अन्न शोधतात. त्यासाठी झाडाचे विघटन केले जात नाही. म्हणजेच काही बुरशींनी त्यांची लिग्निन विघटन करण्याची क्षमता गमावली असल्याचे हेविट यांनी सांगितले.
बुरशींचे महत्त्व
- बुरशी अनेक प्रकारची कामे करत असतात. त्याचा वापर कृषी क्षेत्र, औषधे यासारख्या अनेक शाखामध्ये होत असतो. त्याचे प्रमाण खुप मोठे असल्याने त्यांच्या कामाचे मुल्यमापन करणे शक्य नाही.
- या संशोधनातून मिळालेल्या माहितीचा उपयोग बुरशींचा अधिक वापर करण्यासोबतच त्यांच्यापासून होणारी हानी रोखण्यासाठी करता येणार आहे. या घटकांचे पर्यावरण, मानवी जीवन यावर परीणाम होतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा