ढाल्या कीटकांनाही आवडते सेंद्रिय खाद्य
शेतामधील ढाल्या कीटक ( लेडी बर्ड बीटल) पिकावरील मावा या कीडीचा फडशा पाडतात. हे कीटक त्यांच्या अळी अवस्थेपासून मावा कीडी खाण्यास सुरवात करतात. मात्र रासायनिक कीडनाशकांच्या फवारणीमुळे कीडीसोबतच मित्रकीटकांची संख्याही वेगाने कमी होते. मात्र पुर्ण सेंद्रिय असलेल्या शेतातील लेडी बर्ड बीटल हे रासायनिक शेतीतील लेडी बर्ड बीटलपेक्षा अधिक वेगाने व अधिक काळ मावा कीडींना फस्त करत असल्याचे इंग्लंडमधील सेंटर फॉर इकॉलॉजी ऍण्ड हायड्रोलॉजी ने केलेल्या संशोधनात आढळले आहे. हे संशोधन बायोलॉजिकल कंट्रोल या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

माणसामध्ये सेंद्रिय खाद्याबाबत जागृती होत असून सेंद्रिय खाद्य मानवी आरोग्यासाठी चांगले मानले जाते. सेंद्रिय शेतातील मित्रकीटकांच्या संख्येतही वाढ होते. त्यातही त्यांच्या अळ्या या लवकर प्रौढ होत असल्याचे प्रयोगशाळेत केलेल्या संशोधनात दिसून आले आहे. प्रौढ ढाल्या कीटक अधिक वेगाने मावा कीड फस्त करत असल्याने त्यांच्या संख्येत वेगाने घट होते. जैविक पद्धतीने कीडीचे नियंत्रण करू इच्छिणाऱ्या सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यासाठी ही आनंदाची बाब आहे. या बाबत माहिती देताना सीइएच मधील संशोधक डॉ. जो स्टाले यांनी सांगितले की, भक्ष्य आणि भक्षक यांच्यातील संबंधाचा अभ्यास त्यांच्या मुळ प्रक्षेत्रामध्ये करण्यात आला. त्यांच्यातील संबंध हे अत्यंत गुंतागुंतीची असतात. एका पीकातील खताच्या वापराचा मित्रकीटकांच्या मरतुकीवर पडणाऱ्या फरकाचा अभ्यास करण्यात आला आहे.
असे झाले प्रयोग
- संशोधकांनी अमोनियम नायट्रेट या खताचा वापर केलेल्या पीकामध्ये व पोल्ट्री खत आणि हिरवळीच्या खतावर वाढलेली मावा कीड गोळा करून प्रयोगशाळेमध्ये लेडी बर्ड बीटलच्या अळीला खाद्य म्हणून देण्यात आले. या लेडी बर्ड बीटलच्या वाढीचा अभ्यास करण्यात आला.
- वनस्पती किंवा पीके मावा कीडीपासून बचाव करण्यासाठी प्रतिकारक प्रणालीचा वापर करतात. त्यातून तयार झालेली विषारी घटक ग्लुकोसायनोलेटस या नावाने ओळखली जातात. हे घटक मावा कीडीच्या शरीरात मोठ्या प्रमाणात साठवले जातात. रासायनिक खताचा वापर केलेल्या पीकामध्ये गे घटक अधिक प्रमाणात तयार होतात. म्हणजेच अशा रासायनिक खताचा वापर केलेल्या शेतात आढळणाऱ्या मावा कीडीच्या शरीरात अधिक प्रमाणात विषारी घटक आढळून येतात. अशा विषारी मावा कीडीना खाणाऱ्या लेडी ब्रड बीटलच्या मरतुकीमध्ये वाढ आढळून आली आहे.
- मात्र अधिक अभ्यासासाठी दोन्ही प्रकारातील मावा कीडीतील ग्लुकोसायनालेटसच्या पातळी तपासण्यात आली असून त्यात फारसा फरक आढळला नाही. म्हणजेच ग्लुकोसायनालेटस घटकांचा लेडी बर्ड बीटलच्या पचनसंस्थेतील परीणामाचा अधिक अभ्यास होण्याची आवश्यकता आहे.
- सध्या मित्रकीटकांचे प्रसारण करताना रासायनिक शेतीमध्ये सेंद्रिय शेतीच्या तुलनेत अधिक प्रमाणात प्रसारण करण्याची गरज या प्रयोगातून दिसून आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा