सध्या अमेरिकेत जमिनींचे वाळंवटीकरण वाढत असल्याने कुरणे आणि गवताळ प्रदेशात मोठ्या प्रमाणात घट होत आहे. त्याचा अप्रत्यक्ष परीणाम दुधाळ जनावरांच्या संख्येवर होत असून वाढत्या वाळवंटीकरणामुळे झुडपांच्या संख्येत वाढ होते. या सर्व प्रक्रियेत बदलत्या वातावरणाचा नेमका काय परीणाम होतो, यावर अमेरिकेतील कृषी संशोधन संस्थेच्या लास क्रुसेस येथील पर्यावरण तज्ज्ञ एन.एम. पीटर्स आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संशोधन केले आहे. जागतिक तापमान बदलामुळे गवताळ प्रदेशातील वाढत्या झुडूपीकरणांची समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे संशोधनात आढळले आहे.
गेल्या दिड शतकातील पावसाचे प्रमाण आणि कोरडी वर्षे यांचा अभ्यास अमेरिकेतील संशोधकांनी केला आहे. त्यासाठी त्यांनी वनस्पती आणि त्यांच्या विस्ताराचा आढावा नकाशांच्या साह्याने घेतला. त्यांची तुलना सध्याच्या वातावरणासी केली असून वाळवंटीकरणाच्या दिर्घकालीन बदलाविषयी अधिक माहिती गोळा करण्यात आली. 1989 सालापासून हा संशोधन प्रकल्प राबववला जात होता. गेल्या शतकातील जागतिक तापमान बदलाच्या प्रक्रियेचा वाळवंटाच्या निर्मितीमध्ये होणाऱ्या परीणामाविषयी अधिक माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच चराईचे नियोजन योग्य पद्धतीने केल्याने अमेरिकेच्या नैऋत्य प्रदेशातील वाळवंटीकरणाच्या प्रक्रियेला आळा घालणे शक्य होऊ शकेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा