काच नव्हे, बटाट्याचे चिप्स
कॅनडा येथील व्हॅनकोव्हर शहरातील हॉटेलात गेलात तर तेथील प्रसिध्द डिश तुमच्या समोर येईल, काचेच्या तुकड्यासारखे पुर्ण पारदर्शक दिसणारे बटाट्याचे वेफर्स.
येथील प्रसिद्ध शेफ हमिद सॅलिमियान यांनी बटाट्याचे पारदर्शक चिप्स किंवा वेफर्स बनविण्याची नवी पद्धत विकसित केली आहे. हे बटाट्याचे चिप्स चवीला नेहमीच्या बटाट्याच्या चिप्ससारखेच असले तरी त्यांचा कुरकुरीतपणा अधिक काळ टिकून राहतो. तसेच बटाट्यातील स्टार्चचे प्रमाण, बटाट्याची योग्य साठवण आणि त्यावर वापरण्याचे योग्य जेल यांचा विचार करून बटाट्याची निवड अत्यंत काळजीपुर्वक करावी लागते. काचेसारखे चिप्स तयार करण्यासाठी अधिक वेळ लागतो. या प्रक्रियेतील प्रत्येक पायरी ही अधिक शांत व संयमाने करावी लागते.
...अशी असते प्रक्रिया
- युकॉन गोल्ड जातीचे बटाटे थंड पाण्याच धुवून घेवून कोरडे केले जातात. त्याची एक सेंटीीटर पर्यंत साल काढावी. अर्धा कप ऑलिव्ह तेलामध्ये मिठासह परतून ४५० अंश फॅरनहिट तापमानाला बेक करावेत.
- बेक केलेले बटाटे भांड्यात घेवून ९५ अंश सेल्सियस तापानाच्या पाणी त्यावर टाकून दोन तास तसेच ठेवावे.
- मिक्सरच्या साह्याने बटाटे बारीक करून घेऊन त्याचा स्टॉक तयार करावा. हा स्टॉक थंड करण्यास ठेवावा.
- या तयार केलेल्या स्टॉक मधील दोन कप स्टॉकमध्ये चार चमचे बटाटा स्टार्च चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावा. हलवत असताना त्याला गरम करावे, त्यातून जेल तयार होईल.
-जेलचा ३ मीलीमीटर जाडीचा थर देऊन ओव्हनमध्ये १३५ अंश पॅरहिट तापामानाला दोन तासासाठी पुर्णपणे कोरडे करावे.
- हे कोरडे केलेले जेलचे योग्य आकाराचे तुकडे करून अधिक तेलामध्ये ३५० अंश फॅरनहिट तापमानाला तळून घ्यावेत. तळताना पुर्ण पारदर्शक होईपर्यंत तळावेत. तेल निथळण्यासाठी टिश्यू पेपरवर ठेवून मिठ भुरभुरावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा