कच्ची फळे आणि भाजीपाल्याचा आहारात योग्य प्रमाणात वापर केल्यास धुम्रपानाची सवय सोडवणे शक्य असल्याचे संशोधन अमेरिकेतील बुफॅलो विद्यापीठातील संशोधकांनी केले आहे. त्यांनी धुम्रपानाचे व्यसन असलेल्या सुमारे 1000 लोकांच्या सवयींचा अभ्यास केला आहे.
कच्च्या भाज्याचे सेवन आणि धुम्रपान यांच्यातील संबंधाचा अभ्यास करण्यात आला असून त्याचे निष्कर्ष आशादायक आहेत. संशोधकांनी 14 महिने केलेल्या अभ्यासामध्ये ज्या लोकांच्या आहारात फळे आणि भाजीपाला योग्य प्रमाणात असतो, ते तंबाकू आणि सिगारेटपासून अधिक काळपर्यंत दूर राहू शकतात. तसेच अधिक प्रमाणात कच्च्या भाज्या, फळे खाणाऱ्या लोकांना धुम्रपानाची सवयीपासून सुटका करून घेणे शक्य असल्याचे आढळले आहे.
त्याबाबत माहिती देताना सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रमुख गॅरी जिव्हानो म्हणाले, की निकोटिनवरील विसंबण्याचे प्रमाण आणि ताज्या भाजीपाला व फळे यांच्या सेवनातील नक्की संबंधाविषयी अद्याप माहिती मिळाली नसली तरी ज्या लोकांच्या आहारात ताज्या भाज्या व फळे यांचा समावेश असतो, ते धुम्रपानाच्या व्यसनापासून दूर राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही आहारासोबतच कॅफिन असलेल्या द्रव्य आणि मद्यासोबत धुम्रपानाचे प्रमाण वाढत असल्याचे सर्वेक्षणातून पुढे आले आहे. त्यामुळे आहारातून कच्च्या भाज्या व फळे यांचे योग्य प्रमाण असल्यास हा धुम्रपानाचे प्रमाण कमी राहत असल्याचेही आढळून आले आहे.
या अभ्यासाचे मुख्य संशोधक जेफ्री हायबॅक यांनी सांगितले, की आहारातील भाज्याचे सेवनाचे प्रमाण प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळे असले तरी धुम्रपानाची सवय सोडू इच्छिणाऱ्या लोकासाठी हे संशोधन आशादायक ठरणार आहे. त्याचे निश्चित प्रमाण ठरवण्यासाठी अधिक संशोधनाची आवश्यकता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा