ऊर्जेच्या बचतीबरोबरच अधिक मासे सापडतील मच्छिमारांना
तैवान येथील राष्ट्रीय चेंग कुंग विद्यापीठातील संशोधकांनी माशांना आकर्षित करण्यासाठी विशिष्ट प्रकारचा प्रकाशाचा पॅटर्न विकसित केला आहे. त्याचा वापर मासेमारीच्या वेळी केल्यास मासे प्रकाशाकडे आकर्षित होतील आणि त्यांना जाळ्यामध्ये पकडणे सोपे जाणार आहे. तसेच एलईडी दिव्यांचा वापर केल्याने ऊर्जेमध्ये बचत होणार आहे.
रात्रीच्या वेळी मासेमारी करताना बोटीवर असलेल्या प्रकाशामुळे अनेक मासे हे दूर जात असल्याने मासेमारी करण्यात अडथळे येतात. त्यावर तैवान येथील मिंग चुंग फांग आण शेंग चीह शेण यांनी संशोधन केले असून माशांच्या आकर्षित करणारा प्रकाशाचा पॅटर्न विकित केला आहे. त्यासाठी एलईडी प्रकारच्या उच्च दर्जाच्या प्रकाशांच्या दिव्यामध्ये वापर केला आहे. त्यामुळे वीजेची बचत होणार आहे.
असे आहेत या पॅटर्नचे फायदे
- या माशांना आकर्षित करणाऱ्या प्रकाशाचे पाण्याखाली वितरण किंवा प्रसारणाचे प्रारूप आणि ऊर्जा वापराचे मोजमाप करण्यात आले आहे. या उपकरणाचा वापर करताना माशांच्या सवयींचा अभ्यास करण्यात आला असून त्यांची रचना योग्य त्या कोनामध्ये केली जाते. त्यामुळे या प्रकाशांच्या टप्प्यामध्ये मासे आकर्षित होतात. अधिक मासे कमी खर्चामध्ये पकडणे शक्य होते. तसेच या एलईडी दिव्यांचा वापर केल्याने बोटीच्या इंधन वापरामध्ये 15 ते 20 टक्के घट होते.
- सध्या वापरात असलेल्या मासेमारीच्या दिव्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिनील किरणे बाहेर पडतात. त्याचा मच्छीमारांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. हे या एलईडी दिव्यामुळे टाळता येणे शक्य आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा