जागतिक पातळीवरील संशोधकांच्या गटाने केलेल्या संशोधनात पहिल्यांदाच टोमॅटोचा (Solanum lycopersicum ) जनुकिय नकाशा उलगडण्यात यश आले आहे. त्यातील सर्व खाचा खोचा माहिती झाल्याने भविष्यामध्ये टोमॅटो पिकाची उत्पादन वाढ,पोषकता वाढ , रोगासाठी प्रतिकारकता वाढवणे याबरोबरच विविध चवीचे आणि रंगाचे टोमॅटो उपलब्ध होण्यासाठी हे संशोधन मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरणार आहे. आगामी विविध संशोधनासाठी या संशोधनाचा फायदा होणार आहे. Solanum lycopersicum या जातीच्या टोमॅटोबरबोरच जंगली जातीच्या टोमॅटोचेही जनुकिय विश्लेषण करण्यात आले असून ते दोन्ही नेचर या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत. हे संशोधन आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने केला अशून त्यात अर्जेटिना, बेल्जिअम,चीन, फ्रान्स, जर्मनी, इस्राईल, इटली, जपान, नेदरलॅंड साऊथ कोरिया, स्पेन, इंग्लंड अमेरिका आणि भारत या देशातीलल संशोधकाचा समावेश होता. या संशोधनात दिल्ली येथील राष्ट्रीय वनस्पती जनुक संशोधन संस्थेतील संशोधक सरीता भुट्टी, पारूल चौधरी आणि देबाशिष चट्टोपाध्याय यांचाही समावेश होता.
विशेषतः हेन्झ 1706 या टोमॅटोचे जनुकिय विश्लेषण करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोल्ड स्परींग हार्बर लॅबोरेटरीमध्ये जंगली टोमॅटो (Solanum pimpinellifolium) चा जनुकिय नकाशा विकसित केला आहे.
टोमॅटोची जनुकिय माहिती
संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटोमध्ये 12 गुणसूत्रामध्ये सुमारे 35 हजार जनुके असतात. टोमॅटोच्या चव, रंग, नैसर्गिक रोग प्रतिकारकता , त्यातील पोषक घटक या सारख्या विविध गुणधर्मासाठी ही जनुके कारणीभूत असतात. या सर्व जनुकांची एकत्रीत संरचना मिळविण्यात संशोधकांना यश आले आहे.
त्यांची सुंसगतवार रचना, गुणसुत्रातील त्यांचे स्थान याविषयी नेचर या संशोधनपत्रिकेमध्ये देण्यात आली आहे.
जनुकिय नकाशामुळे काय होईल
-टोमॅटोच्या अंतरंगात डोकावण्याची संधी या संशोधनामुळे मिळाली असून टोमॅटो पिकामध्ये उत्पादन वाढीबरोबरच गरजेनुसार योग्य ते गुणधर्माचे टोमॅटो विकसित करणे सोपे होणार आहे.
- सध्या जरी या दोन जातीचा जनुकिय नकाशा उपलब्ध असला तरी भविष्यामध्ये गरजेनुसार अन्य टोमॅटो जातीचेही विश्लेषण करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे पैदासकार गरजेनुसार योग्य प्रकारच्या जाती विकसित करू शकणार आहेत. पहिल्या जनुकिय नकासा विकसित करण्यासाठी आलेल्या लाखो डॉलर खर्चाच्या खुप कमी खर्चामध्ये (सुमारे 10 हजार डॉलर) पुढील जातीचे जनुकिय नकाश तयार करता येतील.
- टोमॅटोच्या या संशोधनाचा उपयोग स्ट्रॉबेरी, सफरचंद, कलिंगडे, केळी आणि अन्य फळांमध्येही होऊ शकतो. कारण या साऱ्या फलातील फळे पिकण्याच्या अवस्थेसाठी कारणीभूत असणाऱी जनुके व त्यांची कार्यपद्धती सारखीच आहे. त्यामुळे या फळांच्या विकसणासाठी टोमॅटोच्या जनुकिय नकाशाचा चांगला उपयोग होऊ शकतो. त्यांच्या संशोधनासाठी होणाऱ्या खर्चामध्ये बचत करणे शक्य होईल.
- टोमॅटो हे महत्त्वाचे भाजीपाला पिक आहे. त्याची बाजारपेठ ही एकट्या अमेरिकेत सुमारे 2 अब्ज डॉलरची आहे. प्रति वर्ष अमेरिकन माणूस सरासरी 72 पौंड टोमॅटो आहारात वापरतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा