सोमवार, २८ मे, २०१२

जैविक घड्याळावर केलीय स्कॅन्डिनेव्हियन बार्लीने मात



प्रत्येक सजीवाच्या शरीरात एक जैविक घड्याळ असते. त्यानुसार त्यांच्या खाण्याच्या, झोपेच्या वेळा ठरविण्यात येतात. तसेच ते वनस्पतीमध्येही असते. स्कॅंन्डिनेव्हियन देशामध्ये अधिक कालावधीचे दिवस असल्याने या देशांना मध्यरात्रीच्या सूर्याचे देश अशी ओळख आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये आढळणाऱ्या वनस्पती आणि दक्षिण प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पती याच्या जीवनक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात फरक असतो. मात्र बार्लिच्या काही स्कॅन्डिनेव्हीयन जातींनी या दिवसाच्या लांबीशी जुळवून घेण्यासाठी जनुकिय बदल घडवून आणल्याचे इंग्लंडमधील जॉन इनस संस्था आणि जर्मनीतील मॅक्स पॅंन्क संस्थेच्या संयुक्त संशोधन गटाला आढळून आले आहे. तसेच या प्रदेशामध्ये वाढीसाठी कमी कालावधी उपलब्ध असल्याने त्याच्याही बार्लिने जुळवून घेतले आहे.

वनस्पतीच्या वाढीच्या आणि तग घरण्याच्या क्षमतेमध्ये वनस्पतीच्या फुले येण्याच्या कालावधीला खुप महत्त्व असते. यावरच उत्पादनाचे गणित अवलंबून असते. बार्लिच्या काही जंगली जाती आणि आधूनिक हिवाळ्यातील जाती वसंतामध्ये अंकुरत असल्या तरी त्यांना फुले हिवाळा संपल्यानंतरच येतात. अधिक कालावधीच्या दिवसांशी याचा संबंध जोडला जातो. 24 तासातील किती मोठा दिवस असला की झाडे फुलावर येतात, याचा अभ्यास करण्यासाठी जॉन इनस संस्था आमि मॅक्स प्लॅंक संस्थेच्या संशोधकांनी स्कॅन्डिनेव्हियन बार्लि जातीची निवड केली. कारण या वनस्पतींनी जैविक घड्याळाच्या कार्यपद्धतीला जनुकिय बदलाच्या साह्याने बदलून टाकल्याचे आढळून आले . बार्लीमध्ये फुलावर येण्यासाठी फोटोपिरीयड-1 हे जनुक कारणीभूत ठरते. या जाती दिवसाच्या कालावधीचे गणित बाजूला ठेवून फुलावर येत असल्याचे आढळले आहे. अन्य दक्षिणेतील जातीपेक्षा त्या लवकर फुलावर येतात.

या संशोधनाचा उपयोग इंग्लंड आणि पश्चिम युरोपमध्ये असलेल्या अधिक थंडीचा हिवाळा आणि त्यानंतर येणाऱ्या गरम उन्हाळ्यामधील पिकांच्या हंगामाचा कालावधी कमी करण्यासाठी वापरता येऊ शकतो.

 हे संशोधन प्रोसिडींगस ऑफ नॅशनल अँकेडमी ऑफ सायन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

कापलेली पपईही टिकेल 9 दिवस

नैसर्गिक घटकांचा वापर ठरेल उपयुक्त, ब्राझीलमध्ये झाला अभ्यास

ब्राझील येथील कृषी क्षेत्रासाठी अणू ऊर्जा संशोधन संस्थेने पपईच्या साठवणीचा कालावधी वाढवण्यासाठी एक अभ्यास प्रकल्प राबवला होता. त्यामध्ये विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया, खाण्यायोग्य आवरण आणि किरणोत्साराचा वापर करण्यासंदर्भात अभ्यास करण्यात आला. त्यामुळे पपईचे आयुष्यकाळ 9 ते 15  दिवसापर्यंत वाढविणे शक्य होणार असून शेतापासून ग्राहकांपर्यंत चांगल्या दर्जाचे फळ उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.

अमेरिकेमध्ये कमीत कमी प्रक्रिया केलेल्या पपईच्या फळांचे काप, कट आणि विविध प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र त्यांचा साठवण कालावधी हा सरासरी सहा दिवसापर्यंत असल्याने शेतकरी आणि ग्राहक दोघाच्या दृष्टीने ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचे राहत नाही. हा आयुष्यकाळ वाढविण्यासाठी अभ्यास करणारे संशोधक सिल्व्हाना अलर्बटीनी यांनी सांगितले, की रासायनिक प्रक्रियाच्या साह्याने फळाच्या अधिक लवचिक व्यापारासाठी साठवण कालावधी वाढवण्यात येतो. मात्र सध्या ग्राहकामध्ये दर्जा, पोषकता आणि नैसर्गिकता याबाबत जागरूकता वाढत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांचा वापर करण्यासंदर्भात या अभ्यासामध्ये भर देण्यात आला. कॅल्शियम क्लोराईड (मीठ) , सिनॅनम्क एलडिहाईड ( सिनॅनमिन तेलापासून मिळवलेला घटक) या सारख्या घरगुती वापरातील नैसर्गिक घटकांचा वापर करण्याकडे लक्ष देण्यात आले. त्याच बरोबर पपईला खाण्यायोग्य आवरण तसेच किरणोत्साराचा वापर करण्यासाठी अभ्यास करण्यात आला, त्यामुले कमीत कमी प्रक्रिया केलेल्या फळांची साठवण करतानाच त्याचा दर्जा, अंतर्गत गुणधर्मामध्ये कोणताही बदल होणाऱ नाही, यावर भर देण्यात आला.

असे आहेत अभ्यासाचे निष्कर्ष
-पपईच्या तुकड्यांना कॅल्शियम क्लोराईड आणि सिनॅनमिक अलडिहाईड यांच्या वेगळ्या आणि एकत्रित प्रक्रिया केली असता, एकत्रित प्रक्रियेच्या पपईच्या तुकड्यांची साठवण 12 दिवसापर्यंत करता येत असल्याचे आढळून आले आहे. हे एकत्रित प्रक्रियेमुळे सुक्ष्म जीवांच्या वाढीलाही आळा बसत असल्याचे दिसून आले तरी, चवीमध्ये फरक पडतो. त्यामुळे त्यांचे प्रमाण मर्यादित ठेवण्याच्या म्हणजेच 0.1 टक्के पर्यंत ठेवल्यास चवीमध्ये फरक पडत नाही. कॅल्शिअम क्लोराईडचे प्रमाण 0.75 टक्के ठेवले तरी पपई 9 दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे साठवता येते.

- पपईचे फळ कापल्यानंतर त्याची साठवण क्षमता वेगाने कमी होते. त्यासाठी नैसर्गिक खाण्यायोग्य आवरण वापरल्यास फळांतील पाण्याचे प्रमाण कायम राहून ऑक्सीजन, कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जनही रोखता येते. 

भूचरासारखी हाडाची रचना आढळली जलचर ईलच्या जिवाश्मात




उत्क्रांतीच्या विविध टप्प्यावर पडू शकतो प्रकाश

गेल्या काही दशकापर्यंत जमिनीवर चालणाऱ्या किंवा रहिवास करणाऱ्या प्राण्याचे मणके आणि फासळ्या हे वैशिष्ट मानले जात असत. त्याचा उपयोग त्याला चालण्यासाठी व शरीराला स्थिरता मिळवण्यासाठी होतो. मात्र 345 दशलक्ष वर्षापुर्वीचे इल या माशाचे जिवाष्म मिळाले असून त्यामध्ये मानवासारखे मणके आणि फासळ्या असल्याचे आढळले आहे.  अर्थात ही गुंतागुंतीची संरचना असून पाण्यातून जमिनीवर येण्यापुर्वीच्या प्राण्यातील असणाची शक्यता असल्याने महत्त्वाची आहे.

359 दशलक्ष ते 318 दशलक्ष वर्षापुर्वीच्या ( कार्बोनिफेरस पिरीयड) कालावधीमध्ये आता स्कॉटलॅंडमध्ये असलेल्या सागरात उल माशासारखा टॅरासियस प्रोब्लेमॅटिकस (Tarrasius problematicus ) हा प्राणी राहत होता. अन्य पृष्टवंशीय माशाप्रमाणे त्यांची शरीर आणि शेपटी अशी रचना असायला पाहिजे होती. मात्र त्याची रचना ही जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यासारखी असल्याचे प्रोसिडींग ऑफ रॉयल सोसायटी बी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

सॅलन यांनी टॅरासियस प्राण्याची उत्क्रांती रे पिन माशामध्ये विकसित झाली असल्याच्या शक्यतेने संशोधनाला सुरूवात केली होती.  त्यासाठी एडिंनबर्ग राष्ट्रीय संग्रहालयातील ज्यांची ओळख पटली नव्हती अशा जिवाश्मांचा अभ्यास केला. त्यामध्ये प्राचीन काळच्या माशांच्या जिवाश्मामध्ये टॅरासियस माशांच्या हाडाची रचना ही वेगळी असल्याचे दिसून आले. हि रचना चालण्याऐवडी पोहण्यासाठी विकसित झाली असावी. जमिनीवरील प्राणी विकसित झाल्यानंतरच्या काळातही हा प्राणी अस्तित्वात होता. आताच्या टेटपोल या उभयचर प्राण्याप्रमाणे किंवा रे फिश प्रमाणे हि रचना असून शेपटीच्या साह्याने हा प्राणी पोहताना स्थिरता मिळवत असावा. हि गोष्ट पुर्वीच्या अभ्यासकाकडून दुर्लक्ष झाले असण्याची शक्यता आहे.

चिमण्यांच्या घटत्या संख्येला मोबाईल टॉवर कारणीभूत


आसाममध्ये झाले सर्वेक्षण व संशोधन

 गेल्या काही वर्षापासून चिमण्याची चिवचिव कमी ऐकायला मिळत असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी सातत्याने करत होते. देशाच्या पर्यावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या आसाममध्येही चिमण्याची संख्या वेगाने कमी होत असल्याचे दिसून आले आहे. त्या मागील कारणांचा शोध घेण्यासाठी आसाममधील लखीमपूर येथील प्रादेशिक कृषी संशोधन संस्थेने अभ्यास प्रकल्प राबवला होता. संपर्क यंत्रणेसाठी मोबाईल टॉवरच्या वाढत्या संख्येमुळे प्रसारीत होणाऱ्या विद्यूत चुंबकीय किरणांचा, वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या शिसेयुक्त पेट्रोलच्या प्रदुषणाचा आणि कृषी क्षेत्रामध्ये वाढत अशलेल्या रसायने आणि कीडनाशकांचा हा विपरीत परिणाम असल्याचे दिसून आले आहे.

याबाबत माहिती देताना लखीमपूर येथील प्रादेशिक कृषी संशोधन संस्थेतील मुख्य संशोधक डॉ. प्रबळ सायकिया यांनी सांगितले, की  पुर्वी दिखोमुख या ब्रम्हपूत्रा नदीच्या दिखॉव आणि मिटॉंग परिसरामध्ये चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसली असली तरी सर्वेक्षण केलेल्या गुवाहाटी, लखिमपू, ढेमजी, सोनितपूर, जोरहाट आणि टिनसुकिया जिल्ह्यामध्ये मात्र अत्यंत कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्याचे कारण शोधताना दिखॉवमुख परिसरामध्ये प्रदुषण अत्यंत कमी असल्याने त्यांची संख्या जास्त आहे.

र्यावरणवादी हिरेन दत्ता यांच्या नेचर्स बेकन या संस्थेने या पुर्वी केलेल्या सर्वेक्षणात वेरांदाह येथील क्रिस्नसिगा गावामध्ये चिमण्यांनी मोठी वसाहत केली असल्याचे दिसून आले आहे. दत्ता यांना चिमण्यांची पाच घरट्यामध्ये आठ चिमण्यांच्या जोड्या मोबाईल टॉवरच्या जवळ राहताना आढळल्या आहेत.

चिमण्यांची घटती संख्या आणि संशोधने
- पर्यावरण आणि वन मंत्रालयाने या विषयावर स्थापन केलेल्या समितीचे मुख्य व बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. असाद रहमनी यांनी मोबाईल टॉवरच्या किरणांचे वन्य प्राणी, पक्षी आणि मधमाशा यांच्यावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला होता. त्यांच्या अहवालानुसार, चिमण्या आणि मधमाशांच्या घटत्या संख्येसाठी मोबाईल टॉवर द्वारा प्रसारीत विद्यूतचुंबकिय किरणे जबाबदार आहेत.
-  पंजाब विद्यापीठाने केलेल्या संशोधनामध्ये पक्ष्यांची 50 नवजात पिल्ले केवळ साडेपाच मिनिटांच्या विद्यातचुंबकिय किरणांच्या सान्निध्यात राहिल्याने नष्ट झाली असल्याचे आढळले होते. या किरणांमुळे चिमण्यांच्या पुनरुत्पादन क्षमतेवर परिणाम होत असून त्यांच्या दिशा समजण्याच्या क्षमतेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
( वृत्तसंस्था )

शनिवार, २६ मे, २०१२

मीठामुळे होईल गढूळ पाणी स्वच्छ

मिशीगन विद्यापीठातील संशोधन

गढूळ पाण्यातून माती व अन्य घटक दूर करण्यासाठी अमेरिकेतील मिशीगन विद्यापीठातील संशोधकांनी सोपी, स्वस्त पद्धत शोधून काढलेली आहे. त्यामध्ये घरगुती मीठामुळे पाण्यातील तरंगते मातीचे कण एकत्र होऊन तळाशी लवकर बसत असल्याचे आढळून आले आहे. या पद्धतीने ग्रामीण भागामध्ये गढूळ पाण्यापासून स्वच्छ पाणी मिळवणे सोपे होणार आहे. तसेच सुर्यप्रकाश निर्जंतुकिकरण पद्धतीतील अडचणी दूर होऊन निर्जंतूक पाणी उपलब्ध होणार आहे. दुषित पाण्यातून पसरणाऱ्या आजारांना दूर ठेवणे शक्य होणार आहे.


शुद्ध पाणी दुर्गम आणि ग्रामीण भागामध्ये पोचवणे हे विसनशील देशामध्ये आर्थिकदृष्ट्या शक्य नाही. शुद्ध पाण्याच्या अभावामुळे विविध प्रकारचे रोग पसरतात. ग्रामीण भागामध्ये पावसाळ्यात विहिरीचें किवा नद्याचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. पाण्यामध्ये वाहून येत असलेल्या मातीमुळे अत्यंत गढूळ असते. आफ्रिकेच्या ग्रामीण भागामध्ये सुर्यप्रकाशांच्या साह्याने निर्जंतुकिकरण करण्याची पद्धत वापरली जाते. मात्र गढूळ पाण्याचे सुर्यप्रकाशाच्या साह्याने शुद्धीकरण करण्यातही अडचणी येतात. त्याबाबत बोलताना संशोधक जोशूआ पीअर्स यांनी सांगितले, की पाणी गढूळ असल्यास, रोगकारक जिवाणू मातीच्या कणांच्या आड दडल्याने वाचू शकतात. त्यांच्यावर सुर्यप्रकाशांतील अतिनिल किरणांचा प्रभाव पडत नाही. त्यासाठी गढूळ पाण्यातील मातीचे कण खाली बसणे आवश्यक असते. या प्रक्रियेला निवळणे असे म्हणतात. ओन्तरिओ येथील क्विन्स विद्यापीठातील विद्यार्थ्यासह संशोधन करताना पिअर्स यांनी निवळण्याच्या प्रक्रियेसाठी सोडीअम क्लोराईड ( साधे मीठ ) यांचा वापर करणे शक्य असल्याचे आढळले आहे.

मीठ सर्वसामान्यासह सर्वाकडे उपलब्ध असते. त्यामुळे पाणी शुद्धीकरणासाठी त्याचा वापर अत्यंत स्वस्त आणि सोपा आहे. विशेषतः गढूळ पाण्यासाठी बेन्टोनाईट आणि मीठाचे मिश्रण वापरले असता अनेक मातीचे कण एकत्र होऊन तळाशी बसतात. त्यामुले पाणी निवळण्याची प्रक्रिया वेगाने होते. हे स्वच्छ पाणी सुर्यप्रकाशांच्या साह्याने निर्जंतुक करून वापरल्यास पाण्यातून पसरणाऱ्या आजाराना अटकाव करणे  शक्य होते.

 पीएर्स आणि डावनी हे संशोधक गढूळ पाण्यातील विविध प्रकारच्या चिकण मातीसाठी प्रयोग करत आहेत. आफ्रिकेमध्ये आढळून येणाऱ्या सर्व प्रकराच्या मातीवर होणाऱ्या मीठ आणि बेन्टोनाईटच्या मिश्रणाचे परिणाम तपासण्यात येत आहे.  हे संशोधन जर्नल ऑफ वॉटर, सॅनिटेशन अँण्ड हायजिन फॉर डेव्हलपमेंट मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.


जर्नल संदर्भ-
Brittney Dawney and Joshua M. Pearce. Optimizing the solar water disinfection (SODIS) method by decreasing turbidity with NaCl. Journal of Water, Sanitation, and Hygiene for Development, June 2012 DOI: 

निसर्गाशी दुरावा, अँलर्जीचा फटका


निसर्गापासून दूर राहिल्याने श्वासाशी संबंधित रोग आणि त्वचेवर अँलर्जी यांचे प्रमाण वाढत आहे.

पर्यावरणातील जैवविविधता कमी होत असल्याचा होतोय शहरी माणसांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम,

फिनलॅंडमधील सर्वेक्षण

 जगभरातील शहरातील लोकांच्या आरोग्याच्या समस्यामध्ये दमा,  अन्य अँलर्जी यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. विविध प्रकारच्या सूक्ष्म जीवांची वाढ श्वासनलिका, त्वचा व आतड्यामध्ये होत असल्याचे पुरावे दिसून आले आहेत. याचा संबंध पर्यावरणातील  जैवविविधता कमी होण्याशी असल्याचे फिनलॅंड येथील हेलसिन्कि विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनात दिसून आले आहे.

जीवनाच्या धावपळीत शहरातील लोकांचा निसर्गाशी संबंध वेगाने कमी होत आहे. निसर्गाशी असलेली जवळिक माणूस विसरत चालला आहे. त्याचे  विपरित परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे फिनलॅंड येथील हेलसिन्कि विद्यापीठातील संशोधक डॉ. हन्स्की यांनी केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. त्वचा रोग आणि अँलर्जी यांच्या निसर्ग आमण जैवविविधतेशी असलेल्या संबंधाचे विश्लेषण करण्यासाठी पुर्व फिनलॅंडमधील 118 पौगंडावस्थेतील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. शहरातील मुलांसोबतच ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांमध्येही त्वचा रोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले. फार्म हाऊस किंवा जंगलांच्या जवळ राहणाऱ्या मुलांच्या त्वचेवर ही विविध प्रकारचे जिवाणू आढळून येतात. मात्र त्याचा त्वचेवर फारसा परिणाम होत नाही. मात्र तेच जिवाणू शहरातील मुलांच्या त्वचेवर आढळल्यास त्याचे विपरित परिणाम संवेदनशील त्वचेवर प्रामुख्याने दिसून येतात. ग्रामीण भागातही पर्यावरणातील जैवविविधता घटत असल्याचे परिणाम जाणवू लागले असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले.
हे संशोधन प्रोसिंडींग्स ऑफ नॅशनल अँकेडमी ऑफ सायन्सेस या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

अँसिनटोबॅक्टर

सर्वेक्षणातील महत्त्वाचे...
-अँलर्जी साठी संवेदनशील लोकांच्या त्वचेवर गॅमाप्रोटिओबॅक्टेरिया (gammaproteobacteria) या कुळातील जिवाणूंची विविधता कमी अशल्याचे आढळून आले आहे. याच कुळातील अँसिनटोबॅक्टर (Acinetobacter) हा जिवाणू त्वचेवर रक्तवर्णीय चट्ट्याशी (IL-10 , आयएल 10 शी ) संबंधीत आहे.

-  गॅमाप्रोटिओबॅक्टेरिया या त्वचेवर आढळणाऱ्या जिवाणूमुळे प्रतिकारकक सहनशीलता वाढते. त्यामुळे या जिवाणूंच्या जैवविविधतेमध्ये होणारी घट ही लक्षणीयरित्या त्वचा रोग व श्वासाशी संबंधीत रोगांमध्ये वाढ करत असल्याचे दिसून येते.

- पर्यावरणातील जैवविविधता कमी होत असल्याचा फटका मानवाला विविध आजाराद्वारे बसत असल्याचे स्पष्ट होत आहे.

जर्नल संदर्भ-
Environmental biodiversity, human microbiota, and allergy are interrelated. Ilkka Hanski, Leena von Hertzen, Nanna Fyhrquist, Kaisa Koskinen, Kaisa Torppa, Tiina Laatikainen, Piia Karisola, Petri Auvinen, Lars Paulin, Mika J. Mdkeld, Erkki Vartiainen, Timo U. Kosunen, Harr. Proceedings of the National Academy of Sciences, May 7, 2012 DOI: 

निसर्गाशी दुरावा, अँलर्जीचा फटका

पर्यावरणातील जैवविविधता कमी होत असल्याचा होतोय शहरी माणसावर विपरीत परिणाम,
फिनलॅंडमधील सर्वेक्षण

 जगभरातील शहरातील लोकांच्या आरोग्याच्या समस्यामध्ये दमा,  अन्य अँलर्जी यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. विविध प्रकारच्या सूक्ष्म जीवांची वाढ श्वासनलिका, त्वचा व आतड्यामध्ये होत असल्याचे पुरावे दिसून आले आहेत. याचा संबंध पर्यावरणातील  जैवविविधता कमी होण्याशी असल्याचे फिनलॅंड येथील हेलसिन्कि विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनात दिसून आले आहे.

जीवनाच्या धावपळीत शहरातील लोकांचा निसर्गाशी संबंध वेगाने कमी होत आहे. निसर्गाशी असलेली जवळिक माणूस विसरत चालला आहे. त्याचे  विपरित परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे फिनलॅंड येथील हेलसिन्कि विद्यापीठातील संशोधक डॉ. हन्स्की यांनी केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. त्वचा रोग आणि अँलर्जी यांच्या निसर्ग आमण जैवविविधतेशी असलेल्या संबंधाचे विश्लेषण करण्यासाठी पुर्व फिनलॅंडमधील 118 पौगंडावस्थेतील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. शहरातील मुलांसोबतच ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांमध्येही त्वचा रोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले. फार्म हाऊस किंवा जंगलांच्या जवळ राहणाऱ्या मुलांच्या त्वचेवर ही विविध प्रकारचे जिवाणू आढळून येतात. मात्र त्याचा त्वचेवर फारसा परिणाम होत नाही. मात्र तेच जिवाणू शहरातील मुलांच्या त्वचेवर आढळल्यास त्याचे विपरित परिणाम संवेदनशील त्वचेवर प्रामुख्याने दिसून येतात. ग्रामीण भागातही पर्यावरणातील जैवविविधता घटत असल्याचे परिणाम जाणवू लागले असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले.

हे संशोधन प्रोसिंडींग्स ऑफ नॅशनल अँकेडमी ऑफ सायन्सेस या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.


सर्वेक्षणातील महत्त्वाचे...
अँसिनटोबॅक्टर


-अँलर्जी साठी संवेदनशील लोकांच्या त्वचेवर गॅमाप्रोटिओबॅक्टेरिया (gammaproteobacteria) या कुळातील जिवाणूंची विविधता कमी अशल्याचे आढळून आले आहे. याच कुळातील अँसिनटोबॅक्टर (Acinetobacter) हा जिवाणू त्वचेवर रक्तवर्णीय चट्ट्याशी (IL-10 , आयएल 10 शी ) संबंधीत आहे.

-  गॅमाप्रोटिओबॅक्टेरिया या त्वचेवर आढळणाऱ्या जिवाणूमुळे प्रतिकारकक सहनशीलता वाढते. त्यामुळे या जिवाणूंच्या जैवविविधतेमध्ये होणारी घट ही लक्षणीयरित्या त्वचा रोग व श्वासाशी संबंधीत रोगांमध्ये वाढ करत असल्याचे दिसून येते.

- पर्यावरणातील जैवविविधता कमी होत असल्याचा फटका मानवाला विविध आजाराद्वारे बसत असल्याचे स्पष्ट होत आहे.

जर्नल संदर्भ-
Environmental biodiversity, human microbiota, and allergy are interrelated. Ilkka Hanski, Leena von Hertzen, Nanna Fyhrquist, Kaisa Koskinen, Kaisa Torppa, Tiina Laatikainen, Piia Karisola, Petri Auvinen, Lars Paulin, Mika J. Mdkeld, Erkki Vartiainen, Timo U. Kosunen, Harr. Proceedings of the National Academy of Sciences, May 7, 2012 DOI: 

बुधवार, २३ मे, २०१२

जैविक घड्याळावर केलीय स्कॅन्डिनेव्हियन बार्लीने मात



----
प्रत्येक सजीवाच्या शरीरात एक जैविक घड्याळ असते. त्यानुसार त्यांच्या खाण्याच्या, झोपेच्या वेळा ठरविण्यात येतात. तसेच ते वनस्पतीमध्येही असते. स्कॅंन्डिनेव्हियन देशामध्ये अधिक कालावधीचे दिवस असल्याने या देशांना मध्यरात्रीच्या सूर्याचे देश अशी ओळख आहे. त्यामुळे या प्रदेशामध्ये आढळणाऱ्या वनस्पती आणि दक्षिण प्रदेशात आढळणाऱ्या वनस्पती याच्या जीवनक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात फरक असतो. मात्र बार्लिच्या काही स्कॅन्डिनेव्हीयन जातींनी या दिवसाच्या लांबीशी जुळवून घेण्यासाठी जनुकिय बदल घडवून आणल्याचे इंग्लंडमधील जॉन इनस संस्था आणि जर्मनीतील मॅक्स पॅंन्क संस्थेच्या संयुक्त संशोधन गटाला आढळून आले आहे. तसेच या प्रदेशामध्ये वाढीसाठी कमी कालावधी उपलब्ध असल्याने त्याच्याही बार्लिने जुळवून घेतले आहे.

वनस्पतीच्या वाढीच्या आणि तग घरण्याच्या क्षमतेमध्ये वनस्पतीच्या फुले येण्याच्या कालावधीला खुप महत्त्व असते. यावरच उत्पादनाचे गणित अवलंबून असते. बार्लिच्या काही जंगली जाती आणि आधूनिक हिवाळ्यातील जाती वसंतामध्ये अंकुरत असल्या तरी त्यांना फुले हिवाळा संपल्यानंतरच येतात. अधिक कालावधीच्या दिवसांशी याचा संबंध जोडला जातो. 24 तासातील किती मोठा दिवस असला की झाडे फुलावर येतात, याचा अभ्यास करण्यासाठी जॉन इनस संस्था आमि मॅक्स प्लॅंक संस्थेच्या संशोधकांनी स्कॅन्डिनेव्हियन बार्लि जातीची निवड केली. कारण या वनस्पतींनी जैविक घड्याळाच्या कार्यपद्धतीला जनुकिय बदलाच्या साह्याने बदलून टाकल्याचे आढळून आले . बार्लीमध्ये फुलावर येण्यासाठी फोटोपिरीयड-1 हे जनुक कारणीभूत ठरते. या जाती दिवसाच्या कालावधीचे गणित बाजूला ठेवून फुलावर येत असल्याचे आढळले आहे. अन्य दक्षिणेतील जातीपेक्षा त्या लवकर फुलावर येतात.

या संशोधनाचा उपयोग इंग्लंड आणि पश्चिम युरोपमध्ये असलेल्या अधिक थंडीचा हिवाळा आणि त्यानंतर येणाऱ्या गरम उन्हाळ्यामधील पिकांच्या हंगामाचा कालावधी कमी करण्यासाठी वापरता येऊ शकतो.

 हे संशोधन प्रोसिडींगस ऑफ नॅशनल अँकेडमी ऑफ सायन्स मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

रविवार, २० मे, २०१२

फळे वाढतील उत्पादकांच्या नावासहित


जागतिकीकरणाच्या आजच्या काळात ब्रॅंड आणि त्याचे नाव महत्त्वाचे असते. हि पदार्थाची एक प्रकारे स्वतंत्र ओळख असते. जाहीरातीसाठी शेतीमाल आणि फळे यांच्या बॉक्सवर हे ब्रँडनेम टाकले जाते. फळावर स्टिकर चिटकवले जातात. त्यातून बाजारात आपल्या मालाची वेगळी ओळख मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र झाडावरील फळावर जर कंपनीचा किंवा ब्रॅंडनेमचा लोगो उमटवता येण्यासाठी ब्राझीलमधील एज आयसोबार या जाहिरात कंपनीने तंत्र विकसित केले आहे. त्यामुळे प्रत्येक फळावर उठावदार लोगो तयार करणे शक्य होणार आहे.

 झाडावर असतानाच फळांना प्लॅस्टिक मोल्ड लावण्यात येतात. त्या मोल्डवर कंपनीचे नाव किंवा उत्पादकाचा लोगो असतो. फळ वाढताना फळावरही तो लोगो विकसित होतो.



सोबतच्या छायाचित्रामध्ये अमेरिकेतील कॅम्प या फळरसाच्या ब्रॅंडींगसाठी फळाला ज्युसबॉक्ससारखा आकार आणि त्यावर कंपनीचे नाव देण्यात येत आहे. फळासोबत एक स्ट्रॉ दिला की झाला ज्युस बॉक्स तयार.

शनिवार, १९ मे, २०१२

येतोय गुगलचा चमत्कारी चष्मा



पुर्वी चष्मा हा चाळीशीनंतर लागायचा, त्यामुळे त्याला चाळीशी असा प्रतिशब्द मराठीमध्ये प्रचलित होता. नंतर च्या काळात लहान मुलापासून सर्व वयागटातील लोकांना चष्म्याची गरज पडत असते. त्यातच आता फॅशनसाठी गॉगल वापरणाऱ्यांची संख्याही काही कमी राहिली नाही. मात्र गुगल या विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये पुढारलेल्या कंपनीने नुकतीच एका नव्या अत्याधुनिक चष्म्याची झलक सर्वाना दाखवली. या चष्म्याचा उपयोग सुऱक्षा, व्यक्तीगत, फॅशन अशा अनेक कारणासाठी करता येणार आहे. त्यामुळे भविष्यातील या चष्म्यांनी अश्ररशः डोळे दिपतील अशा अनेक नव्या शक्यता आपल्यासमोर उघडल्या आहेत.

गुगल कंपनीने विकसित केलेल्या या अत्याधुनिक चष्म्यामुळे अनेक गोष्टी एकाचवेळी करता येणार आहेत.  हा चष्मा एकाचवेळी आपल्याला ज्या ठिकाणी जायचे. त्याचे अंतर दाखवील, त्याचवेळी त्याचा फोनसारखा वापर करून आपण आपल्या मित्राशी बोलूही शकणार आहोत. आपल्याला एखाद्या गोष्टीचा फोटो घ्यायलाही हा चष्मा मदत करणार आहे. किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदीही करू शकणार आहे. किंवा आज संगणकाचे मॉनिटर ज्या गोष्टी करू शकते, त्या सर्व गोष्टी आपण चालता बोलता करू शकणार आहोत. याला गुगल कंपनीने प्रोजेक्ट ग्लास असे नाव दिले आहे. हे चष्मे थ्रीडी चष्म्यासारखे दिसत असले तरी स्वयंचलित कार पाठोपाठ येणारे गुगलचे नवे उत्पादन  विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एक चमत्कारच असेल.

मोबाईलमध्येच असेल सूक्ष्मदर्शक

मोबाईलमध्येच सूक्ष्म दर्शक उपलब्ध झाल्याने ग्राणी भागातील वैद्यकीय कर्मचारी आणि सर्वासमान्य शेतकऱ्यांचा फायदा होईल. 




आपण शेतकरी लोक शेतामध्ये फिरत असतो. फिरताना आपल्याला पानावर काही लक्षणे दिसतात, त्यांचे निरीक्षण करण्यासाठी भिंग अथवा सूक्ष्मदर्शक असता तर किती बरे झाले असते असे वाटून जाते. कारण सूक्ष्म अशा जिवाणू आणि विषाणूमुळे पानावर लक्षणे दिसेपर्यंत उशीर  होऊ शकतो. मात्र फिनलॅंड येथील तंत्रज्ञानी मोबाईल सूक्ष्मदर्शकाचे कार्य करू शकेल, असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या मोबाईल सबक्ष्मदर्शकाच्या साह्याने एक मिलिमीटरच्या 100 व्या भागाइतके सूक्ष्म पाहता येऊ शकेल. तसेच त्याच्या प्रतिमा त्या मोबाईलमध्ये असलेल्या कॅमेराच्या साह्याने घेता येतील.

मोबाईल सूक्ष्मदर्शकातून अत्यंत सूक्ष्म पेशीपर्यत पाहता येईल. 
 फिनलॅंड येथील व्हीटीटी टेक्नीकल रिसर्च संस्थेतील संशोधकांनी साध्या कॅमेरा फोनमध्ये बसवता येईल, अशी भिंगाची जोड तयार केली आहे. त्यामुळे साध्या फोनचे रुपांतर उच्च दर्जाच्या सूक्ष्म दर्शकामध्ये (मायक्रोस्कोप) होणार आहे. एलईडी लाईट आणि ऑप्टिकल लेन्स यांच्या एकत्रित प्रयत्नातून चांगल्या दर्जाच्या प्रतिमा घेता येणार आहे.  या प्रतिमा एमएमएस च्या माध्यमातून पाठवता येणे शक्य होईल. म्हणजे शेतात आढळलेल्या रोगांच्या लक्षणांची प्रतिमा लगेच एमएमएस द्वारे तज्ज्ञापर्यंत पोचवता येणार आहे. त्यामुळे त्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवणे सोपे जाणार आहे.
या प्रकारचे पहिले व्यावसायिक उपकरण किपलूप ओवाय आणि व्हीटीटी यांच्या संयुक्त कंपनी मार्फत 2012 च्या मध्यापर्यंत बाजारात आणण्याचा मानस आहे. 


असे होतील मोबाईल सूक्ष्मदर्शकाचे फायदे
- एक लहान, पातळ चुंबकिय सूक्ष्मदर्शक मोबाईलसोबत असणार आहे. हा अत्यंत हलका असल्याने खिशामध्ये सहजतेने नेता येऊ शकेल. या उपकरणामुळे मोबाईलच्या लेन्समधून वस्तू मोठ्या दिसू शकतील. कॅमेराची फिल्ड ही 2 बाय 3 मिलीमीटर इतकी असेल. उपकरणामध्ये असलेल्या एलइडी प्रकाशामुळे विविध कोनातून प्रकाश घेता येऊन प्रतिमा अत्यंत सुस्पष्ट मिळवता येईल.

- केवळ एक सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये टाकल्यास गरजेनुसार त्रिमितीय प्रतिमाही या माध्यमातून मिळवता येतील. त्रिमितीय नकाशेही अत्यंत अचूकपणे मिळतील.

कॅलिफोर्निया विद्यापीठातही मोबाईल सूक्ष्मदर्शकावर संशोधन केले जात असून कोणत्याही अँटेचमेंटशिवाय सूक्ष्मदर्शक उपलब्ध करण्यात येत आहे.
-पिकावरील किडी रोगाचे निरीक्षण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे अचूकपणे रोग व किडीची ओळख झाल्याने नियंत्रण करण्यामध्ये मदत मिळणार आहे. पर्यावरण तज्ज्ञ, कृषी संशोधक, वस्त्रोद्योगातील तज्ज्ञ यांच्यासाठी हे उपकरण अत्यंत उपयोगाचे राहणार आहे. या संशोधनाचे फायदे शेतकरी, आरोग्य कर्मचारी, मुद्रण व्यवसायातील लोक यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे.

जिवंत माशांच्या पेशीय अभ्यासासाठी नवी सूक्ष्मदर्शकिय पद्धती विकसित



सूक्ष्म दर्शकाचा वापर केल्यामुळे सजीवाच्या अत्यंत लहान मानल्या जाणाऱ्या पेशींच्या अंतर्गत अभ्यास सोपा झाला आहे. मात्र त्यासाठी ते सजीव हे त्यांच्या नैसर्गिक रहिवासापासून प्रयोगशाळेत आणावे लागतात. मोठ्या सजीवाच्या बाबत हे अवघड असे काम ठरते. त्यावर जर्मनीतील कार्लश्रुहे तंत्रज्ञान संस्था, मॅक्स प्लॅंक पॉलिमर रिसर्च इन्स्टिट्ट आणि अमेरिकन राष्ट्रीय आरोग्य संस्थेतील संशोधकांनी जिवंत माशांच्या पेशींची रचना पाहण्यासाठी नवी पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीला मल्टीफोकल स्ट्रक्चरर्ड इल्युमिनेशन मायक्रोस्कोपी असे म्हणतात. त्याचा वापर एका मिलीमीटरच्या आठव्या भागाएवढ्या लहान माशाच्या पिल्लांच्या पेशीची रचना पाहण्यासाठी केला आहे. हे संशोधन नेचर मेथडस या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

झेब्राफिश या माशांची पिल्ले ही अत्यंत लहान आणि पारदर्शी असल्याने पेशींच्या जनुकिय रचनेचा अभ्यास करण्यासाठी  उपयुक्त ठत असल्याची माहिती  कार्लश्रुबे तंत्रज्ञान संस्थेतील संशोधिका मारिना मियॉन यांनी दिली. त्या माशांच्या त्वचेच्या पेशीतील मायक्रोट्यूबूली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घटकावर संशोधन करत आहेत. या मायक्रोट्यूबूलींची लांबी 100 मायक्रोमीटर असून व्यास 20 नॅनोमीटर इतकी सूक्ष्म असते. ( मानवी केसांच्या जाडीच्या लाखाव्या भागाइतकी सूक्ष्म असते. ) या मायक्रोट्युबूली पेशीमध्ये सर्वत्र आढळतात. त्यांची आवश्यकता ही पेशीविभाजनासाठी आणि गतीसाठी असते.

अशी आहे नवी मल्टीफोकल स्ट्रक्चरर्ड इल्युमिनेशन मायक्रोस्कोपी
नवीन सूक्ष्म दर्शकिय (मायक्रोस्कोपी) तंत्रज्ञानामध्ये संपुर्ण पदार्थावर प्रकाश न टाकता, त्यातील आवश्यक अशा भागावर विशिष्ट प्रकाशाची सोय केलेली असते. प्रकाशाचे पारवर्तन कमी करून योग्य ते भाग प्रकाशात आल्यानंतर त्यांच्या अनेक प्रतिमा घेतल्या जातात. विविध प्रकारच्या प्रकाशांची तीव्रता मिळविण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो. संपुर्ण प्रतिमा एकत्रीकरणातून मिळवली जाते. 
- या प्रकाशांच्या पद्धतीमुळे विविध खोलीपर्यंतच्या प्रतिमा मिळवता येतात. अशा अनेक प्रतिमांचा वापर करून संगणकाच्या साह्याने त्रिमीतीय प्रतिमा मिळू शकतात.

- प्रतिमा घेताना 145 नॅनोमीटर पर्यंत द्वीमीतीय आणि 400 नॅनोमीटर पर्यंत त्रिमितीय प्रतिमा मिळू शकतात.

- या प्रतिमा घेण्यासाठी काही सेकंदाचा कालावधी लागत असल्याने ब्लर इमेज येत नाही.
- एकामागून एक घेतलेल्या प्रतिमाच्या माध्यमातून मायक्रोट्युबूलीच्या हालचालीचा व्हिडीओ मिळवता येतो.

माशांच्या त्वचेखाली 45  मायक्रोमीटर खाली लॅटरल लाईन तयार होण्याच्या सुरवातीच्या काळातील 60 मिनिटांची छायाचित्रे प्रयोगाच्या दरम्यान मिळवण्यात आली. या लॅटरल लाईनमुळे माशांना पाण्यातील प्रवाहामध्ये होणाऱ्या बदलांचा जाणिव होते. आगामी काळात माशांतील व्हर्टाब्रेटच्या विकासाच्या माशांच्या जिवंत अवस्थेतच प्रतिमा मिळू शकतील. त्यातून संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल.

- या संशोधकांच्या गटामध्ये सपून पारेख, अजय चिटणिस आणि हरी श्रॉफ या भारतीय वंशाच्या संशोधकासह अॅण्ड्रू यॉर्क, डॅमियन दल्ले नोगार, रॉबर्ट फिशर, क्रिस्टियन कोम्ब यांचा समावेश होता.


गिनीपीग म्हणून वाढतोय झेब्रा फिशचा वापर
गोड्या पाण्यात वाढणाऱ्या झेब्रा फिश हे लहान तरिही  त्यांच्यामधील प्रत्येक अवयव हा व्यवस्थितपणे वेगळे दिसून शकतील, एवढे मोठे आहेत. झेब्रा फिश अधिक पुनरुत्पादनक्षम असून प्रयोगशाळेत वाढवणे शक्य आहे. त्यांचा आयुष्यकाळ कमी असून अधिक पिल्लांना जन्म देतात. पृष्टवंशीय प्राण्यामध्ये मानवासारखेच काही घटक समान असल्याने त्यांचा वापर प्रयोगशाळेत प्रयोगासाठी केला जातो.
----------

हिरव्या रंगाच्या चमकदार प्रकाशामध्ये जिवंत माशाच्या पेशीतील मायक्रोट्यूबूलीचा अभ्यास करता येतो.(स्रोत- एनआयएच आणि केआयटी )

मेटाजिनोमिक्स तंत्रज्ञानाने उलगडतील पोल्ट्री विषाणूंची रहस्ये




पोल्ट्रीतील रोगांचे निदान करण्यासाठी महत्त्वाचे अमेरिकी कृषी विभागाचे संशोधन
मेटाजिनोमिक्स तंत्रज्ञानाने सापडलेल्या नव्या विषाणूचा प्रतिजैविक म्हणून होऊ शकेल वापर

 टर्की जातीच्या कोबड्यांचे मांस परदेशामध्ये आवडीने खाल्ले जाते. आपल्याकडे असलेल्या पोल्ट्री फार्मप्रमाणे त्यांचे मोठे फार्मही आहेत. मात्र पोल्ट्रीमध्ये येणाऱ्या विषाणूजन्य रोगांमुळे पक्ष्यांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असते. त्यांचे नियंत्रण करण्याचे आव्हान संशोधकांच्या समोर कायम राहिलेले आहे. अमेरिकन कृषि विभागाच्या संशोधकांनी पोल्ट्रीमधील विषाणूंच्या नियंत्रणासाठी मेटाजिनॉमिक्स या मुलद्रव्यीय साधनाचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो हे आढळून आले आहे.

कोंबड्या आणि टर्की पक्ष्यामध्ये दरवर्षी विविध प्रकारच्या विषाणूजन्य रोगामुळे मोठ्या प्रमाणात मरतूक होत असते. तसेच त्यांच्यामध्ये वाढ थांबणे, हगवण, वजन कमी होणे या प्रकारामुळे उत्पादन खर्चात वाढ होत असूनही उत्पादनात घट होते. या विषाणूजन्य रोगातील बहुतांश रोग हे आतड्याशी आणि पचन संस्थेशी संबंधित आहेत. मात्र त्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्म जीवांचा नक्की ओळख स्पष्ट होत नसल्याने उपचार करणे अवघड ठरत होते. त्यासाठी पारंपरिक पद्धतीने जनुकांची सुसंगतवार व गुणधर्मासह प्रत्येक विषाणूची ओळख पटविण्यामध्ये अधिक वेळ आणि परिश्रम लागत असत. हे कमी करण्यासाठी अमेरिकेतील कृषि विभागाचे संशोधक लासझ्लो सॅक यांनी मेटाजिनोमिक्स पद्धतीचा वापर करून एकाच वेळी संपुर्ण विषाणूंच्या गणाची ओळख पटविता येते. या पद्धतीत हजारो सुक्ष्म जीवांच्या न्युक्लीईक आम्लाची ओळख पटवता येते. या पद्धतीच्या वापरातून लासझ्लो सॅक यांना भविष्यामध्ये उपयुक्त ठरू शकेल, अशा नवीन विषाणू शोधणे शक्य झाले आहे.

असा आहे नवा विषाणू
सॅक आणि अमेरिकी कृषि संशोधन संस्थेतील सुक्ष्म जीवशास्त्रज्ञ मायकेल डे यांनी नव्याने आढळून आलेल्या विषाणूचे डीएनए सिक्वेन्सिंग केले आहे. या विषाणूला पीएचआय सीए82 (phiCA82) असे नाव देण्यात आले आहे. हा विषाणू नैसर्गिकरित्या जिवाणूंना नष्ट करत असून मायक्रोफेजेस किंवा फेजेस या गटामध्ये मोडतो. त्यांच्यामध्ये प्रतिजैविकांना पर्याय होण्याची क्षमता असून विविध प्रकारच्या औषधांना प्रतिकारक ठरलेल्या सूक्ष्म जीवांशी लढण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.

असे झाले  संशोधन
- अमेरिकतेली व्यावसायिक पोल्ट्रीमधून विषाणूजन्य रोगग्रस्त पक्ष्याच्या आतड्याचे नमुने गोळा करून त्यातून मिळवलेल्या न्युक्लेईक आम्लाचे विश्लेषण करण्यात आले. त्यामध्ये सर्वसामान्यपणे आढळणारे Picornaviridae या कुळातील अॅस्ट्रोव्हायरस, रिओव्हायरस आणि रोटाव्हायरस आढळून आले. त्याबरोबर टर्कीमध्ये आजव माहित नसलेल्या मात्र picobirnavirus,सारखे असलेले काही विषाणू मिळून आले. picobirnavirus, हे जिवाणू शेतीमधील पाळीव प्राण्यात आढळतात. तर मानवामध्ये  calicivirus या प्रकारचे विषाणू आढळून येतात.

- मेटाजिनोमिक्सच्या साह्याने सॅक आणि डे यांनी या विषाणूची संपुर्ण जनुकिय साखळीचे विश्लेषण केले आहे. पक्ष्यामधील अत्यंत संवेदनशील आणि विशिष्ट विषाणूच्या ओळखीसाठी पीसीआर पद्धतीचाही वापर त्यांनी या पुर्वीच्या संशोधनात केला आहे.

- संशोधनाबाबतची अधिक माहिती अॅग्रीकल्चरल रिसर्च मॅगेजीनच्या एप्रिलच्या अंकात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

शुक्रवार, १८ मे, २०१२

मक्याची वाढ रोखून उत्पादन वाढवणे होणार शक्य


मक्याच्या वाढीसाठी कारणीभूत स्टेरॉईडला रोखण्यासाठी बुरशीनाशक ठरले उपयुक्त
-------------------
मका पिकामधील स्टेरॉईड या घटकामुळे पिकाच्या बुटक्या आणि अधिक मादी रोपे असलेल्या जाती तयार होऊ शकतील, असे अमेरिकेतील पुरदेई विद्यापीठ आणि दक्षिण कोरियातील सेऊल राष्ट्रीय विद्यापीठात झालेल्या संशोधनात पुढे आले आहे. तसेच स्टेरॉईड घटकांना रोखण्याचे कार्य ही नेहमीच्या वापरात असलेल्या स्वस्थ बुरशीनाशकांच्या साह्याने करता येणे शक्य असल्याचे अधिक संशोधनात आढळून आले आहे. त्यामुळे कमीत कमी निविष्ठामध्ये अधिक उत्पादन मिळविता येणे शक्य होणार आहे.

डोक्याएवढे उंच वाढलेली मक्याची शेते आगामी काळामध्ये दृष्टीस पडणार नाहीत. मक्यांची वाढ ठरवणाऱ्या स्टेरॉई ड घटकांवर नियंत्रण ठेवण्याचे संशोधन पुरदेई विद्यापीठातील जैवरसायनिक आणि मुलद्रव्यीय जनुकशास्त्र विभागातील संशोधक बुरखार्ड शल्झ यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या आधी झालेल्या संशोधनात मका पिकातील स्टेरॉईड घटकाच्या कार्यपद्धतीविषयी काही महत्त्वाची बाबी आढळल्या होत्या. त्यामध्ये मका पिकांच्या बुटक्या आणि मादीचे गुणधर्म असलेली रोपे तयार होत अशल्याचे दिसून आले होते.  मात्र पिकामध्ये जैविक क्रिया रोखण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन (ब्रासिनाझोल) हे अत्यंत महागडे आहे. ( 25 हजार डॉलर प्रती ग्रॅम) .त्यामुळे त्याला पर्याय शोधण्याचे काम शुल्झ गेल्या काही वर्षापासून करत होते. त्यांना अधिक अभ्यासामध्ये प्रोपीकोनॅझोल या बुरशीनाशकामध्ये या स्टेरॉईड घटकांना रोखण्याचे गुणधर्म असल्याचे आढळून आले आहे. त्याची किंमतही तुलनेने कमी (10 सेंट प्रती ग्रॅम ) असल्याने प्रयोग करणे शक्य झाले आहे. मक्यामध्ये शुल्झ यांनी केलेल्या मागील संशोधनामध्ये मक्यामध्ये स्टेरॉईडचे प्रमाण कमी झाल्याने मक्यांची बुटक्या आणि  मादी रोपांची संख्या अधिक प्रमाणात मिळते. त्यामुळे अधिक कणसे उपलब्ध होऊन उत्पादनात वाढ मिळते. या संशोधनासाठी काही रसायने वापरून  मक्यातील स्टेरॉईडच्या उत्पादन प्रक्रियेत बदल घडवणाऱ्या जनुकीय सुधारणा करण्यात आल्या होत्या.

त्यांच्या नव्या संशोधनानुसार अधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या बुरशीनाशकाचाही असाच परिणाम होत असल्याचे आढळले आहे. या बाबत माहिती देताना शुल्झ यांनी सांगितले की, आतापर्यंत केवळ पैदास प्रक्रियेतून वनस्पतीच्या अंतर्गत बाबीमध्ये बदल घडवता येत असत. तसेच बदल बाह्य रसायनाच्या परीणामातून घडवता येणे शक्य असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आपण वनस्पतीच्या आयुष्यामध्ये कधीही ही प्रक्रिया करून स्टेरॉईड तयार होण्याची प्रक्रिया रोखता येईल.
सध्या या शेतकऱ्याना पिकातील नर भाग वेगळा करण्यासाठी मनुष्यबळाची गरज पडते. मात्र पिकातच मादी रोपाचे प्रमाण अधकि असल्याने मनुष्यबळ वाचणार आहे. याचा फायदा बीजउत्पादक शेतकरी व कंपन्यांना होणार आहे. या बुटक्या प्रजातीही तेवढेच उत्पादन देणार असल्याने उत्पादनामध्ये घट न होता कमी निविष्ठाचा वापर करावा लागल्याने उत्पादन खर्चामध्ये बदल होणार आहे. हे संशोधन प्लॉसवन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

गोल्फच्या मैदानासाठी संशोधन ठरले उपयुक्त
गोल्फ या खेळाच्या मैदानावर मोठ्या प्रमाणात हिरवळीच्या गवताची लागवड करण्यात येते. त्यांची वाढही वेगाने होत असल्याने एक दिवसाआड कापणी करावी लागते. त्यासाठी अधिक मनुष्यबळाची गरज असते. सध्या प्रोपेकोनॅझोल या बुरशीनाशकांचा वापर गोल्फ कोर्सच्या मैदानावरील गवताची वाढ रोखण्यासाठी करण्यात येत आहे. त्यामुळे आठवड्यांच्या अंतराने कापणी कारावी लागत असल्याने कापणीच्या खर्चात बचत झाली आहे.


होतेय अधिक संशोधन
शुल्झ यांना मका पिकामध्ये चांगले निष्कर्ष मिळाले असल्याने ते या रसायनाचे अन्य धान्य पिकावर होणारे परिणाम तपासत आहेत. तसेच या बुरशीनाशकाचा ज्या जनुकांवर परिणाम होतो, त्याचे विश्लेषण करण्यात येत आहे. हे संशोधन शुल्झ यांच्या नेतृत्वाखाली पुरदेई विद्यापीठातील व दक्षिण कोरियातील सेऊल राष्ट्रीय विद्यापीठातील संशोधकांचा गट संयुक्तरित्या करत आहे.
-
जर्नल संदर्भ-
Thomas Hartwig, Claudia Corvalan, Norman B. Best, Joshua S. Budka, Jia-Ying Zhu, Sunghwa Choe, Burkhard Schulz. Propiconazole Is a Specific and Accessible Brassinosteroid (BR) Biosynthesis Inhibitor for Arabidopsis and Maize. PLoS ONE, 2012; 7 (5): e36625 DOI: 

गुरुवार, १७ मे, २०१२

चुंबकिय जीवाणू ठरतील जैविक संगणकाचे आधार



मानवी सर्जरीमध्येही जीवाणूंचा होईल उपयोग

संगणकांच्या हार्ड ड्राईव्ह मध्ये ज्या प्रकारे चुंबकिय क्षेत्र तयार होते, तसेच चुंबकिय क्षेत्र काही जिवाणू लोखंडामध्ये शिरल्यानंतर स्वतःमध्ये तयार करतात. त्यांचा उपयोग भविष्यामध्ये वेगवान जैविक संगणक तयार करण्यासाठी होऊ शकतो, असे इंग्लंडमधील लिडस विद्यापीठ आणि जपानमधील टोकियो कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधनात पुढे आले आहे.  सध्या या दोन्ही विद्यापीठामध्ये लोखंड खाऊ शकतील अशा सुक्ष्म जीवावर संशोधन करण्यात येत आहे. 

जसे तंत्रज्ञान विकसित होत जाते, तसा उपकरणांचा आकार कमी होत जातो. संगणकांच्या घटकांचा आकारही कमी कमी होत गेला आहे. मात्र नॅनो तंत्रज्ञानामध्ये इलेक्ट्रॉनिक्स घटक विकसित करण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. त्यामुळे संशोधक पुन्हा निसर्गाकडे वळत आहेत. नैसर्गिक सूक्ष्म जीवांचा वापर करून वेगवान व अत्यंत कमी आकाराचे संगणक विकसित करणे शक्य असल्याचे दिसून आले आहे.

असे आहे संशोधन
- या संशोधनासाठी मॅग्नेटोस्पीरीलियम मॅग्नेटिकम (Magnetospirilllum magneticum) या जिवाणूंचा वापर करण्यात आला आहे. हे जिवाणू डबके, तळे या सारख्या पाण्याच्या परिसरामध्ये, ऑक्सिजन कमी असलेल्या ठिकाणी जमिनीच्या खाली आढळतात. ते पाण्यामध्ये वावरत असताना पृथ्वीच्या चुंबकिय क्षेत्राच्या रेषेमध्ये पोहत असतात. होकायंत्राच्या सुईच्या दिशेत अधिक ऑक्सिजन मिळविण्याचा प्रयत्न करतात.

- जेव्हा या जिवाणूंना लोखंडामध्ये घुसवण्यात आल्यानंतर त्यांच्या शरीरातील प्रथिनांची प्रतिक्रिया ही लहान व कमी ताकदीच्या चुंबकासारखी झाली. पृथ्वीच्या चुंबकिय मुलद्रव्यासारखीच त्यांची अवस्था झाली. या जिवाणूंना एकत्र करून आकार देण्यासह त्यांची जागा ठरवण्यासाठी अभ्यास करण्यात आला. कारण हे अतिसुक्ष्म असे चुंबकच असल्याने त्यांची वाढ करणे, त्यांच्या अधिक प्रती तयार करणे आणि त्यांचा वापर जिवाणूंच्या शरीराबाहेर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  या वाढत्या चुंबकांचा वापर भविष्यामध्ये हार्ड ड्राईव्ह विकसित करण्यासाठी होणार आहे.

- हे संशोधन स्मॉल या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

संशोधनाचे फायदे
- लिडस विद्यापीठातील संशोधिका डॉ. साराह स्टॅनिलॅंड यांनी सांगितले, की सध्या प्रचलित संगणकामध्ये लहान घटक विकसित करताना इलेक्ट्रॉनिकच्या लघुत्तम सिमेपर्यंत माणूस पोचला आहे. यापेक्षा लहान प्रमाणात घटक विकसित करण्यामध्ये अनेक अडचणी आहेत. मात्र निसर्गानेच या प्रश्नाचे उत्तर य जिवाणूंच्या माध्यमातून दिले आहे.

-  जिवाणूंच्या वापरातून केवळ सूक्ष्म चुंबकच न बनवता त्यातून जिवंत अशा इलेक्ट्रीकल वायर तयार करता येऊ शकतील.

- टोकियो कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठातील संशोधक डॉ. मासायोशी टनाका यांनी सांगितले, की या जिवाणूंद्वारे मानवातील लिपिड मुलद्रव्यांच्या पेशीच्या संपर्क यंत्रणेसारख्या अतिसूक्ष्म नलिका प्रयोगशाळेमध्ये तयार करता येतील. या नलिकाचा वापर संगणकामध्ये करणे शक्य होणार आहे.  तसेच मानवी सर्जरीमध्ये या नलिकाचा वापर चांगल्या प्रकारे करता येऊ शकेल.

मंगळवार, १५ मे, २०१२

कृषि पर्यटनात अमेरिकेतील महिलेची भरारी


जेन एकेर्ट यांच्या कृषि पर्यटन केंद्राला प्रति वर्ष पाच लाख पर्यंटक देतात भेट

अनेक उच्च शिक्षीत लोक शेतीमध्ये उतरत आहेत. त्यांच्या बरोबर त्यांचा त्यांच्या क्षेत्रातील अनुभवही शेतीमध्ये येत आहे. आपल्या मार्केटींगच्या कौशल्यावर एक महिलेने सुरू केलेल्या कृषि पर्यटन केंद्राला प्रती वर्ष पाच लाख पर्यटक भेट देतात. पर्यटकांना त्यांच्या धावपळीच्या आयुष्यात शेतीच्या, निसर्गाच्या सान्निध्यात येण्याची ओढ असते. त्या ओढीला विक्री कौशल्यातून व्यवसायाचे रुप देणाऱ्या अमेरिकेतील महिलेच्या कर्तूत्वातून महाराष्ट्रातील कृषि पर्यटनाला प्रेरणा मिळेल. 

शेतीमध्ये वर्षाच्या श्रमावर विपरित हवामानामुळे पाणी फेरलेलं पाहत मोठ्या झालेल्या जेन एकेर्ट यांनी व्यावसायिक पदवी मिळवल्यानंतर नोकरीच्या निमित्ताने घर सोडले. मात्र त्यांच्या कुटूंबाच्या सेंट लिईस मिसूरी या बेल्टव्हिले येथील फळशेती व्यवसायात त्यांचे मन गुंतलेले होते. शेतीकडे परत तर जायचे होते, मात्र केवळ शेतीतील उत्पादने विकण्याऐवजी कृषी पर्यटन हा नाविन्यपुर्ण व्यवसाय करायचे ठरवले. त्यांनी एकेर्ट अॅग्रीमार्केटिंग या नावाचे कृषी पर्यटन केंद्राची स्थापना केली. त्या दृष्टीने त्यांनी आपल्या शेतामध्येच छोटेसे स्टोअर चालून करून विविध पिकांचे, फळाचे,  मांस, वाईन, बेकरी, दुध यांच्या विक्रिला सुरवात केली. त्यात लोणची, बकव्हीटचे केक बनवण्यासाठी तयार पिठे यांचे उत्पादन व विक्री सुरू केली. त्यांच्याकडे असलेल्या या पदार्थांच्या ताजेपणामुळे, दर्जेदारपणामुळे त्यांच्या शेतास भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत गेली. पुढे जाऊन त्यांच्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी 320 खुर्च्यांचे रेस्टॉरंटही सुरू केले. 2001 मध्ये सुरू केलेल्या या कृषि पर्यटन केंद्रास भेट देणाऱ्या पर्यटकांची प्रती वर्ष 5 लाख असून हा सर्व व्याप त्या कुटूंबातील अन्य पाच सदस्यांच्या साह्याने चालवतात. आज जेन एकेर्ट या कृषि पर्यटन या विषयामध्ये नावाजलेल्या सल्लागार असून त्या निमित्ताने त्या जगभर मार्गदर्शन करत असतात.

कृषि पर्यटनाच्या वाढीसाठी...
-वर्षाभरामध्ये कृषि पर्यटनाचे विविध कार्यक्रमही त्या राबवतात. या कृषि पर्यन केंद्राची जाहीरात करण्यासाठी,  कार्यक्रमाची माहीती ग्राहकापर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी त्यांच्या फार्मची वेबसाईटही तयार केली आहे. त्यातून 24 बाय7 याकालावधीत त्यांच्या कार्यक्रमाचे नियोजन आणि महत्त्वाची माहिती सादर केली जाते.

-  केवळ स्वतःची वेबसाईट करून जेन थांबल्या नाहीत, तर त्यांनी अन्य कृषि व्यावसायिकांना वेबसाईट बनवून देण्याचाही व्यवसाय सुरू केला आहे. त्या आज अनेक त्यांच्या व्यवसायाच्या वेबसाईट डिझाईन करून देतात.

- जेन यांनी कृषि पर्यटनावर सहा पुस्तके लिहिली आहेत. विविध लघुपट विकसित केले असून त्या माध्यमातून कृषि पर्यटन व्यवसायाचा विकास करण्यात येत आहे.

- सध्या त्या कृषि पर्यटन केंद्राच्या माहितीचा एकत्रित कोश तयार करण्याचे काम सुरू केले आहे. त्यातून शेतकऱ्यांना त्याच्या कृषि पर्यटन केंद्राची जाहीरत होणार असून, ग्राहक मिळवण्यात मदत होणार आहे. कृषि पर्यटनाची ही एक प्रकारे बॅंकच तयार होणार आहे.

- 2008 साली जेन यांना हॉल ऑफ फेम या पुरस्कार मिळाला आहे.

सोमवार, १४ मे, २०१२

जैवविविधतेमुळे वाढते जमिनीची सुपीकता




पिकासोबतच जंगले, गवताळ प्रदेश यांचे नियोजन करणे महत्त्वाचे
वनस्पती आणि त्यांची जैवविविधता यांचा शेतीला काय उपयोग, असा प्रश्न काही शेतकरी उपस्थित करत असतात. त्यांच्या या खोचक प्रश्नाला  अमेरिकेतील मिनिसोटा विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या दिर्घकालिन संशोधनातून उत्तर मिळाले आहे. त्यांनी 14 वर्षे विविध ठिकाणी घेतलेल्या प्रक्षेत्रीय चाचण्यातून एखाद्या जमिनीमध्ये असलेल्या वनस्पतीच्या जैवविविधतेचा फायदा जमिनीसाठी होत असल्याचे दिसून आले आहे.  जमिनीच्या सुपीकतेबरोबरच बायोमास उत्पादनातही भर पडत असल्याचे आढळले आहे.  

एखाद्या परिसरामध्ये असलेल्या गवताळ प्रदेश, जंगले आणि पिके यांच्या विविधतेचे महत्त्व पर्यावरणासाठी अधिक असते. वनस्पतीची जैवविविधता ही पिकांच्या उत्पादनासाठीही महत्त्वाची ठरू शकते. प्रत्येक जादा वनस्पतीची प्रजात ही जमिनीच्या सुपीकतेमध्ये वाढ करते. याबाबत गेल्या 14 वर्षापासून मिनीसोटा विद्यापीठामध्ये संशोधन प्रकल्प राबवण्यात येत आहे..मिनिसोटा विद्यापीठातील संशोधक डेव्हिड तिलमन, पॉरेस्ट इसबेल, साराह हॉबी, निको आयसेनहॉवर यांच्यासह झुरिच विद्यापीठातील डॅन फ्लायन यांच्या संशोधक गटाने हे संशोधन केले असून सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

या संशोधनाविषयी माहिती देताना संशोधन प्रकल्पाचे संचालक मॅट केन यांनी सांगितले, की कमी कालावधीसाठी केलेल्या प्रयोगाचे निष्कर्ष अधिक गुंतागुंतीचे होते. त्यातून जैवविविधतेच्या पर्यावरणातील उपयुक्तेबाबत कोणताही निष्कर्ष काढता येत नव्हता. मात्र दिर्घकालिन अभ्यासानंतर जैवविविधतेचे महत्त्व समोर येत गेले. पर्यावरणाच्या आरोग्य आणि शाश्वततेबाबात प्रथमच निष्कर्ष मिळाले आहेत. जैवविविधता आणि उत्पादकता यांचा जवळचा संबंध आहे. दिर्घकालिन विचार केला असता पिकासोबत प्रदेशातील जंगले, गवताळ प्रदेश यांच्याही नियोजनाची गरज आहे.

असे झाले संशोधन
-राष्ट्रीय शास्त्र फाऊंडेशनच्या मिनीसोटा येथील 26 विविध प्रक्षेत्रावर प्रयोग करण्यात आले. या 26 पैकी विविध प्रक्षेत्रवरील परिस्थिती ही जंगले, गवताळ प्रदेश यांच्या प्रमाणानुसार भिन्न होती.

- 16 प्रकारच्या प्रजातीनी युक्त असलेल्या प्रक्षेत्राच्या प्रति वर्ष घेण्यात आलेल्या चाचण्यातून जमिनीची सुपीकता आणि बायोमास वाढल्याचे आढळले.

-दोन वर्षाच्या कमी कालावधीच्या अभ्यासामध्ये जैवविविधतेमुळे उत्पादकता वाढली असली तरी 6ते 7 प्रजाती असलेल्या प्रक्षेत्रामध्ये फारसा फरक दिसून आला नाही.

- काही प्रक्षेत्रातील जैवविविधता कमी करून तिथे पाईन वृक्षाची, मक्याची किंवा लॉनची लागवड केली असता, नैसर्गिक सुपीकता वाढीचा फायदा मिळवण्यात अपयश आले.

वटवाघळांतील लिंगगुणोत्तर ठरते हंगामाच्या लांबीवर



तपकिरी वटवाघळांचा करण्यात आला दिर्घकालिन अभ्यास
----------
तपकिरी वटवाघळांच्या जन्म घेणाऱ्या पिल्लातील लिंग गुणोत्तर हे वर्षातील हंगामाच्या लांबीनुसार व त्यांच्या आगमणावरून ठरत असल्याचे अमेरिकेत झालेल्या संशोधनात पुढे आले आहे. ज्या वर्षी वसंताचे आगमन लवकर होते, त्यावेळी वटवाघळांच्या मादींनी जन्म दिलेल्या पिल्लामध्ये मादी पिल्लांची संख्या ही नरापेक्षा दुप्पट असल्याचे संशोधनात दिसून आले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष प्लॉसवन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

वटवाघळे ही कीड नियंत्रणामध्ये मोलाची भुमिका निभावत असतात. गेल्या काही वर्षापासून त्यांच्यामध्ये विविध रोगांचे प्रमाण वाढले असून त्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे वटवाघळांच्या संख्येत वाढ करण्याच्या दृष्टीने वटवाघळांच्या पुनरुत्पादनातील अनेक अज्ञात कडींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याअंतर्गत वटवाघळांच्या लिंग गुणोत्तराबाबत संशोधन करण्यात येत आहे.

संशोधनाबाबत माहिती देताना जैवशास्त्र विभागातील संशोधक हॉवर्ट बारक्ले यांनी सांगितले की, वसंताचे आगमण लवकर झाल्यास वटवाघळांचीमादी पिल्ले चांगल्या प्रकारे तग धरत असून एक वर्षानंतर त्यांचे पुनरुत्पादन सुरू होत असल्याने असे घडत असावे. ज्या मातांनी मादी पिल्लांना जन्म दिला आहे, त्यांचा वंश नर जन्माला घालणाऱ्या मादीपेक्षा अधिक काळ चालत असल्याने कठीण प्रसंगामध्ये नैसर्गिक निवड पद्धतीनुसार त्यांच्या शरीरांतर्गत व्यवस्था कार्यरत होऊन लिंग गुणोत्तर बदलत असावे.

जन्म घेतलेल्या मादी पिल्ले लेंगिक दृष्ट्या सक्षम होण्याचा काळ आणि वाढीसाठी उपलब्ध होणारा कालावधी यांचा परीणाम दिसून आला आहे. या संशोधनामधून लिंग गुणोत्तर हे वर्षातील हंगामानुसार आणि त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणानुसार बदलत असल्याचे आढळले आहे.

असे झाले संशोधन
बारक्ले यांनी उत्तर अमेरिकेत आढळणाऱ्या मोठ्या आकाराच्या तपकिरी वटवाघळांच्या (Eptesicus fuscus) पिल्लामधील नर-मादी गुणोत्तराचा दिर्घ काळासाठी अभ्यास केला. त्यामध्ये फलन होत असताना मादी भ्रूणाची जगण्यासाठी निवड होते आणि त्याचवेळी नर भ्रूण हे प्रसुतीच्या सुरवातीच्या काळातच नष्ट होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामागे कोणती जैवरसायनिक क्रिया घडते, याविषयी अधिक संशोधन करण्याची गरज आहे.  काही सस्तन प्राण्यामध्ये पिल्लातील लिंग गुणोत्तर ठरवण्याची क्षमता असल्याचे यावरून दिसून येते.
-------
फोटोओळ- तपकिरी वटवाघळांमध्ये हंगामानुसार पिल्लांचे लिंग गुणोत्तर ठरते. वसंताचे आगमन लवकर झाल्यास मादी पिल्लाची संख्या अधिक असते. ( स्रोत- केन बेन्डीकसेन)

शनिवार, १२ मे, २०१२

पेशीतील ऑक्सिजनची पातळी ठरवते कर्करोगाची वाढ



कर्करोग म्हणजे पेशींची अनियंत्रीत वाढ होणे. कर्करोगाच्या उपचारासाठी सातत्याने संशोधन केले जाते. जॉर्जिया विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनात, पेशीमध्ये ऑक्सीजनची पातळी कमी झाल्यास कर्करोगांच्या ट्यमुरची वाढ वेगाने होत असल्याचे आढळले आहे. पुर्वी कर्करोगांच्या वाढीसाठी जनुकिय म्युटेशन हे कर्करोगांच्या वाढीसाठी कारणीभूत मानले जात होते. त्याला या संशोधनाने छेद गेला आहे.

पुर्वी झालेल्या संशोधनामध्ये पेशीतील ऑक्सीजन आणि आणि कर्करोगांची वाढ यामध्ये संबंध आढळला होता. मात्र जनुकांचे म्युटेशन हाच प्रमुख कर्करोग वाढीचे कारण मानले जात होते. कर्करोगावरची औषधे त्याच्या मुळापर्यंत जाऊन कार्य करत असली तरी कर्करोगाच्या पेशी त्यांना काहीवेळा जुमानत नसल्याचे दिसत होते. त्यामुळे जनुकिय म्युटेशन हा महत्त्वाचा घटक नसला पाहिजे, या मतापर्यंत जॉर्जिया विद्यापीठातील संशोधक आले. या संशोधनाबाबत माहिती देताना
संशोधक यींग झू यांनी सांगितले, की पेशीतील ऑक्सीजनच्या पातळीमध्ये घट (त्यालाच शास्त्रीय भाषेमध्ये हायपॉक्सिया असे म्हटले जाते) झाल्यामुले कर्करोगांच्या उपचारामध्ये अडचणी येत असल्याचे दिसून आले होते. विशेषतः पेशींची अनिर्बंध वाढी नियंत्रण करताना कमी ऑक्सीजन हा महत्त्वाचा घटक असल्याचे संशोधनामध्ये आढळून आले आहे.

जॉर्जिया विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने सात प्रकारच्या कर्करोगांच्या नमुन्यातील आरएनए माहितीचे विश्लेषण केले असून अधिक काळापर्यंत पेशींना ऑक्सीजन कमी अथवा न मिळाल्यास कर्करोगांच्या पेशीमध्ये वेगाने वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष मॉलेक्युलर सेल बायोलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

असे होतात पेशीत बदल
पेशीमध्ये अन्नापासून ऊर्जा बनविण्यासाठी जी प्रक्रिया होत असते, ( ऑक्सीडेटिव्ह फॉस्फोरिलेशन प्रक्रिया) तिच्यावर ऑक्सिजनच्या कमी पातळीचा परिणाम होतो.जसजसा ऑक्सीजन कमी होत जातो., तसतसा पेशीतील ग्लायसोलिसिस घटकांचा वापर ऊर्जा उपलब्धीसाठी वाढतो.ग्लुकोज आणि अन्नद्रव्याची गरज कर्करोगांच्या पेशीनाही असते. त्यांचे प्रमाण कमी झाल्याने कर्करोगांच्या पेशींना अधिक परिश्रम घ्यावे लागतात.  त्यावेळी काही काळासाठी त्यांच्या वाढीचा वेग मंदावला तरी जेव्हा पुन्हा ऑक्सीजन रक्तातून उपलब्ध होतो, त्यावेळी त्यांच्या वाढीचा वेग हा साध्या पेशींपेक्षा वाढतो. शेवटी त्यांचा परीणाम कर्करोगाच्या वाढीमध्ये होतो.

 HIF1A हे जनुक पेशींतील ऑक्सीजनच्या प्रमाणाशी जोडलेले असते. स्तन, मुत्रपिंड, यकृत, फुफूस, गर्भाशय,आतड्याचा आणि पॅसक्रियटिक या सातही प्रकारच्या कर्करोगामध्ये  HIF1A यांचे प्रमाण वाढल्याचे आढळून येते.
-----

 जार्जिया विद्यापीठातील संशोधन यींग झू   प्रयोगशाळेत जनुकिय पदार्थ असलेल्या काचपट्ट्यांसह. ( स्रोत- जॉर्जिया विद्यापीठ)

गुरुवार, १० मे, २०१२

ऑस्ट्रेलियात केला जातोय मुळांच्या वाढीचा अभ्यास



नवीन जाती विकसनासाठी, पाणी व अन्नद्रव्यांच्या कार्यक्षम वापरासाठी उपयुक्त ठरेल संशोधन
---
वनस्पतीचे पोषण करण्यासाठी मुळांद्वारे अन्न द्र्व्य उपलब्ध केले जातात. त्यामुळे मुळांचीकार्यप्रणाली आणि त्यांच्या जागा व्यापण्याच्या पद्धतीवर ऑस्ट्रेलियातील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील संशोधकांनी संशोधन करत आहेत. स्क्रिनिंग तंत्रज्ञान आणि संगणकिय प्रणालीचा वापर करून ल्युपिन प्रजातीच्या मुळांच्या कार्यक्षमतेबाबत अभ्यास करण्यात आला आहे. वाढत्या तापमान बदलांच्या काळामध्ये वाढणाऱ्या दु्ष्काळाच्या काळामध्ये पिकांचे उत्पादन वाढ मिळविण्याच्या दृष्टीने हे संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे.

ऑस्ट्रेलियातील संशोधकांनी मुळांच्या पाणी ग्रहणक्षमतेचा तसेच अन्नद्रव्य घेण्याच्या क्षमतेबाबत संशोधन केले आहे. लहान पानाच्या ल्युपिन या वनस्पतीवर हे प्रयोग करण्यात आले आहेत. त्याचे निष्कर्ष प्लॅन्ट सॉईल या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

ऑस्ट्रेलियातील स्थानिक परिस्थीतीमध्ये मातीची सुपिकता कमी होत असून पावसाचे प्रमाणही कमी होत आहे. त्यासाठी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील झेड रेन्गेल आणि कद्मबोट सिद्दिकी यांनी नवीन स्क्रिनिंग तंत्रज्ञान आणि संगणकिय प्रणालीच्या साह्याने ल्युपिनच्या मुळांची वाढीच्या पद्धतीचा अभ्यास केला. त्याबाबत माहिती देताना रेन्गेल म्हणाले, की जगातील सर्वात मोठ्या असलेल्या ल्युपिन प्रजातीची जनुकिय माहिती गोळा करून, त्यातील योग्य त्या गुणधर्माचे स्क्रिनिंग करून त्यांच्यातील मुळांच्या वाढीच्या पद्धतीविषयी माहिती मिळवण्यात आली. त्यांचा उपयोग पिकांच्या नवीन जाती विकसित करण्यासाठी करता येईल. त्यातही गहू, बार्लि या सारख्या पिकांच्या मुळांसाठी या पद्धतीचा वापर करणे शक्य आहे. या संशोधनामुळे अन्नद्रव्य आणि पाण्याच्या कार्यक्षम वापरासाठी नव्या पद्धती विकसित करणे शक्य आहे.

 हे संशोधन वेस्ट्रन ऑस्ट्रेलियन कृषी आणि अन्न विभाग आणि तास्मानियन कृषी संशोधन संस्था, अमेरिकेतील पेनिसिल्व्हिया राज्य विद्यापीठ यांच्यासह संयुक्तपणे केले जात असून ऑस्ट्रेलियन संशोधन परिषदेने अर्थसाह्य केले आहे.

असे होतील या संशोधनाचे फायदे
पारंपरिक पिकांच्या मुळांची वाढ आणि त्यांची अन्नद्रव्य घेण्याची पद्धत ही बदलत्या वातावरणामध्ये पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे आगामी काळामध्ये उत्पादनात घट येणार आहे. त्याचबरोबर जमिनीत क्षाराचे प्रमाणही पिकाकडून खताची उचल न झाल्याने वाढत आहे. तसेच पाण्याच्या प्रवाहाबरोबर नत्र आणि स्फुरद वाहत जाऊन पाण्याच्या स्रोताच्या प्रदुषणामध्ये वाढ होत आहे. पिकांच्या मुळांची कार्यक्षमता वाढवणे शक्य होणार असून उत्पादनात वाढ मिळवता येईल.


जर्नल संदर्भ- Chen, Y.L., Dunbabin, V.M., Diggle, A.J., Siddique, K.H.M. and Rengel, Z. (2012). Assessing variability in root traits of wild Lupinus angustifolius gremplasm: basis for modelling root system structure. Plant and Soil 354: 141-155.

सिमेंटही झाले सजीव



इंग्लंडमध्ये झाले सिमेंटच्या इमारतीचे आयुष्य वाढविणारे संशोधन

इमारती जुन्या होत गेल्या, कि त्यामध्ये भेगा पडत जातात. त्यांची वजन पेलण्याची क्षमता कमी होते. उंच उंच इमारतीमध्ये या भेगा भरण्याचे काम अत्यंत अवघड, धोकादायक असते. विविध प्रकारच्या पाळण्याच्या साह्याने मजुर आपल्याला लटकून काम करत असलेले दिसून येतात. मात्र आता हे चित्र पुर्णपणे बदलणार असून इंग्लंडमधील नॉर्थ उम्ब्रिया विद्यापीठातील संशोधकांनी भेगा भरण्यासाठी नवीन पद्धतीचे सिमेंट विकसित केले आहे. हे सिमेंट स्वतः भेगांची जागा भरून काढत जाईल. एका अर्थाने सिमेंट सजीव होणार असून त्यामध्ये होणाऱ्या भेगा बूजवण्याचे काम करणार आहे.



बिल्ट अॅण्ड नॅचरल एन्व्हायर्नमेंट संस्थेतील संशोधक डॉ. अॅलन रिचर्डसन यांनी जमिनीत वाढणारया बॅसिली मेगाटेरियम (> bacilli megaterium) या जिवाणूंचा वापर करून नैसर्गिक कॅल्शियम कार्बोनेट (कॅलसाइट) तयार करण्यात यश आले आहे. त्यामुले सिमेंटच्या जोडाचे आयुष् वाढवणे शक्य होणार आहे. रिचर्डसन यांनी हे जिवाणू यीस्ट, मिनरल आणि युरीया यांच्या योग्य मिश्रणामध्ये जिवाणूंची वाढ करून ते कॉन्क्रिटमध्ये टाकण्यात येतात. कॉन्क्रियमध्ये त्यांच्या खाद्याची उपलब्धता असल्याने त्यांची वाढे वेगाने होते. ज्या वेळी भेगा पडतील, त्यावेळी हे जिवाणू वाढून त्या भेगा भरण्याचे काम करतील. तसेच सिमेंट कॉन्क्रिटच्या क्षयाचा प्रश्नही निकालात निघण्यास मदत होणार आहे.

 सिमेंटची ताकद कमी करणाऱ्या प्रकारास बांधकाम क्षेत्रामध्ये कॉन्क्रिट कॅन्सर या नावाने ओळखले जाते. या प्रकारामुळे बांधकाम व्यवसायामध्ये अब्जावधी रुपयांचे नुकसान होत असते. ते नुकसान या संसोधनामुळे टाळता येणे शक्य होणार आहे.

बुधवार, ९ मे, २०१२

पर्यटन व्यवसाय वाचवतील लहान मासे


वाढत्या सागरी तणे आणि शेवाळांना रोखण्यासाठी लहान मासेच ठरतील महत्त्वाचे
प्रवाळ आणि सागरी वनस्पतीमध्ये वेगाने वाढणाऱ्या तणामुळे प्रवाळ आणि वनस्पती यांचे जैवविविधता धोक्यात येत आहे. त्यामुळे सागरी पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पर्यावरणावर आधारीत पर्यटन व्यवसायही धोक्यात आला आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाळ बेटावरील प्रवाळाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी वनस्पती खाणारे लहान मासे. महत्त्वाचे असल्याने त्यांच्यावर लक्ष केद्रीत करण्याची आवश्यकता असल्याचे मत ऑस्ट्रेलियातील जेम्स कूक विद्यापीठातील प्रवाळ अभ्यास संस्थेतील संशोधक लॉईक थिबाउट यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष इकॉलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

लॉक थिबाऊट पुढे म्हणाले की, वेगाने वाढणाऱ्या सागरी तण किंवा शेवाळामुळे प्रवाळ आणि उपयुकत वनस्पतीच्या वाढीला मर्यादा येतात.  त्यांच्या वाढीच्या वेगाशी प्रवाळ हे स्पर्धा करू शकत नाही. एकदा ही प्रक्रिया घडली की पुन्हा प्रवाळ वाचवणे शक्य होत नाही. त्यामुळे शेवाळ आणि तणांच्या नियंत्रणासाठी शेवाळ खाणारे लहान मासे सागरी पर्यावरणामध्ये महत्त्वाचे आहेत.


लहान मासेच वाचवतील पर्यटन व्यवसाय
संशोधक सिन कॉनोली यांनी कॅरेबियन बेचावर 1980 पासून झालेल्या प्रवाळांच्या नुकसानीविषयी माहिती देताना सांगितले, की 1980 च्या दशकामध्ये झालेल्या बेसुमार मासेमारीमुळे शेवाळ खाणाऱ्या माशांची संख्या कमी झाली. त्याच बरोबर सी अर्चिनच्या संख्येत ही रोगामुले मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुले शेवाळ आणि सागरी तणांना नियंत्रित ठेवणारे घटक कम ीझाल्ाने त्याचा परीणाम प्रवाळांवर झाला. प्रवाळांच्या रंगीबेरंगी दुनियेवर आधारीत असलेले पर्यटनावर त्याचा परीणाम झाला आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेला मोठा रोजगारही कमी झाला आहे.

पर्यावरणासाठी हे मासे महत्त्वाचे
प्रवाळाच्या संरक्षणासाठी महत्त्वाच्या माशाविषयी माहिती देताना डाॅ. ह्यूज स्विटमॅन यांनी सांगितले, की गेल्या 15 वर्षापासून प्रवाळ आणि शेवाळांच्या संख्येबाबत ऑस्ट्रेलियन सागरी शास्त्र विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून माशांच्या जैवविविधतेचे सागरी पर्यावरणातील महत्त्व अधोरेखित झाले आहे. शेवाळ खाण्याऱ्या माशांचे तीन प्रमुख प्रकार आहेत. त्यातील टेरिटोरिअल ग्रेजर हे शेवाळ खाण्यासोबत प्रवाळाच्या बाजूने लहान पट्ट्यामध्ये संरक्षणाचे कार्य करतात. रोव्ही ग्रेजर हे मासे प्रवाळाच्या सर्व बाजूने शेवाळ खातात. तर स्क्रपर मासे शेवाळाचे लचके तोडत अगदी लाईमस्टोनच्या पृष्टभागापर्यंत स्वच्छता करतात, त्यामुळे नव्या प्रवाळांच्या वाढीसाठी जागा उपलब्ध होते.

मंगळवार, ८ मे, २०१२

सोयाबीनखाद्यावरील उष्णता प्रक्रियेमुळे वराहाची पचनशक्ती घटते


सोयाबीन खाद्यावर करण्यात असलेल्या उष्णता प्रक्रियेमुळे
अमिनो आम्लाच्या पचनशक्तीमध्ये घट होत असल्याचे आढळून
आले आहे.

सोयाबीनपासून परदेशामध्ये मोठ्या प्रमाणात पशुखाद्य बनवण्यात येते. त्यासाठी सोयाबीनच्या पीठावर उष्णतेची प्रक्रिया केली जाते. मात्र या उष्णतेच्या प्रक्रियेमुळे वराहामध्ये प्रथीनांच्या व अमिनो आम्लांच्या पचनामध्ये अडचणी येत असल्याचे इलिनॉईज विद्यापीठातील संशोधकांना आढळून आले आहे. तसेच या उष्णता देण्याच्या पद्धतीमुळे सोयाबीनमधील पोषकताही कमी होत असल्याचे आढळून आले आहे. 

वराहपालन हा परदेशामध्ये मोठा उद्योग आहे. वराहाच्या खाद्यासाठी विविध प्रकारचे खाद्य विकसित करण्यात येते. त्यामध्ये सोयाबीनपासून विकसित केलेल्या पशुखाद्यावर उष्णतेची प्रक्रिया केली जाते. या प्रक्रियेचा वराहाच्या पचनशक्तीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास अमेरिकेतील इलिनॉईज विद्यापीठामध्ये करण्यात आला. डॉ. हान्स स्टेन यांनी वराहासाठी सोयाबीनमध्ये असलेल्या अमिनो आम्लाच्या पाचकतेचा अभ्यास केला. त्यांनी त्यासाठी विविध प्रकारे व कालावधीसाठी उष्णता दिलेल्या सोयाबीन खाद्याचे चार प्रकार वापरले.  त्यात उष्णता न दिलेला, अॅटोक्लेव्ह पद्धतीने 125 अंश सेल्सियस 15 मिनिटे उष्णता दिलेला, अॅटोक्लेव्ह पद्धतीने 125 अंश सेल्सियस 30 मिनिटे उष्णता दिलेला आणि ओव्हनड्राईड 125 अंश सेल्सियस 30 मिनिटे उष्णता दिलेला असे चार प्रकार वाढत्या वयाच्या डुक्करांच्या पिलांना पाच वेळच्या खाद्यामघध्ये 40 टक्के या प्रमाणात देण्यात आले. त्याचे डुक्कराच्या वाढीवर होणारे परीणाम तपासण्यात आले.




असे आहेत निष्कर्ष
- अॅटोक्लेव्ह पद्धतीने 125 अंश सेल्सियस 15 मिनिटे उष्णता दिलेल्या सोयाबीन खाद्यामुळे लायसिन आणि अस्पार्टिक आम्लाच्या पाचकतेत घट झाली, मात्र अन्य प्रथिनांच्या, अमिनो आम्लांच्या पाचकतेत कोणताही फरक आढळला नाही.

- अॅटोक्लेव्ह पद्धतीने 125 अंश सेल्सियस 30 मिनिटे उष्णता दिलेल्या सोयाबीन खाद्यामुळे सर्व प्रकारच्या अमिनो आम्लाची पाचकतेत घट झाल्याचे आढळले.

- ओव्हन ड्राईड सोयाबीन खाद्यामुळे अमिनो आम्लाच्या पाचकतेत कोणताही फरक जाणवला नाही. म्हणजेच कोणत्याही क्रियेसाठी बाष्पाची आवश्यकता असते.

- या तिन्ही प्रकारे उष्णतेची प्रक्रिया केलेल्या सोयाबीन खाद्याची तुलना उष्णता न दिलेल्या खाद्याशी करण्यात आली आहे. त्याचे निष्कर्ष अॅनिमल सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

------------------
जर्नल संदर्भ-
González-Vega, J. C., B. G. Kim, J. K. Htoo, A. Lemme, and H. H. Stein. 2011. Amino acid digestibility in heated soybean meal fed to growing pigs. J. Anim. Sci. 89:3617-3625.


खरोखरच बाळाचे पाय दिसतील पाळण्यात


मानसशास्त्रीय, वर्तन व भावनिक प्रश्नांची बीजे लहाणपणीच्या वर्तनात

चार वर्षे वयापर्यंतच्या सवयी व वर्तनावरून मुलांच्या आगामी आयुष्यातील मानसिक, भावनिक आरोग्याविषयी माहिती मिळू शकणार आहे.  त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्यावर उपचार करणे शक्य होणार आहे.

मराठीमध्ये बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी एक म्हण आहे. लहानपणच्या वर्तनामध्ये मोठेपणी ते बाळ काय गुण उधळणार याचा अंदाज येतो, हे सांगण्यासाठी ही म्हण वापरली जाते. मात्र आता खरोखऱच लहाणपणी केलेल्या क्लिनीकल चाचण्यामध्ये बाळाचे आगामी आयुष्यामध्ये भावनिक आणि वर्तनाविषयीच्या अडचणी आणि प्रश्नाचा अंदाज येणार आहे. आगामी वर्तनविषयी कळल्यामुळे त्यावर उपाययोजना, उपचार करणेही शक्य होणार आहे. सध्या लवकर झोपणाऱ्या मुलांच्या आणि मुलींच्या बोलण्याशी संबंधित अडचणीचा संबंध हा भावनिक प्रश्नांशी जोडलेला असल्याचे नेदरलॅंड येथील संशोधकांना दिसून आले आहे.

लहाणपणीच्या वागण्याचा मोठेपणच्या वर्तनाशी असलेल्या संबंधाबात नेदरलॅंड येथील ग्रोनिन्जन वैद्यकीय विद्यापीठातील आरोग्यशास्त्र विभागामधील संशोधक सिजमेन रिज्नेवेल्ड आणि सहकाऱ्यांनी हे संशोधन करण्यात आले आहे. माहिती देताना रिज्नेवेल्ड यांनी सांगितले, की कमी बोलणे हे अनेक भावनिक प्रश्नांशी जोडलेले आढळले आहे. समाजामध्ये वागताना या व्यक्तींनी अनेक भावनिक प्रश्नांना सामोरे जावे लागेल. तसेच काही वेळा लहान मुले भितीमुळे अधिक काळ झोपून राहतात, त्यावरूनही त्यांच्या मनातील भिती आणि अन्य वर्तनाचा अंदाज लावता येऊ शकतो. या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल ऑफ अॅडोलसन्ट हेल्थ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

असे आहे  संशोधन
- जन्मापासून चार वर्षापर्यंतच्या मुलांच्या वागण्याच्या सवयीविषयी पालकांकडून माहिती मिळवण्यात आली. त्यांनंतर पौगंडावस्थेतील 11 ते 17 वयोगटातील 1816 मुलांमध्ये स्वमुल्यमापन पद्धतीचे सर्वेक्षण करण्यात आले. या मुलांच्या पालकांकडून मुलांच्या लहानपणीच्या वागण्याची माहिती भरून घेण्यात आली.

-गरोदपणाध्ये ज्या महिला धुम्रपान करतात, घटस्फोट झालेल्या किंवा एकल पालकांच्या मुलांमध्ये प्रौढपणी अनेक भावनिक व वर्तनाशी संबंधित प्रश्न निर्माण होऊ शकतात.

- ज्या मुलामध्ये रडण्याचे प्रमाण जास्त व अधिक वेळा असते, त्यांच्यामध्ये आक्रमकपणा आणि वस्तू फेकण्याचे, नष्ट करण्याचे प्रमाणही अधित आढळून आले आहे.

- निष्कर्षामध्ये मुलीमध्ये (8.6 टक्के) या मुलांपेक्षा (2.3 टक्के) अधिक भावनिक प्रश्न असल्याचे तर मुलामध्ये (8.6 टक्के) मुलीपेक्षा (4.2 टक्के) अधिक वर्तनविषयक प्रश्न निर्माण झाल्याचे आढळून आले आहे.

असा होईल संशोधनाचा फायदा
कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्र आणि वर्तनशआस्त्रातील संशोधिका मेरी ओकॉन्नोर यांनी सांगितले, की मानसशास्त्रीय प्रश्नाचे जेवढ्या लवकर आकलन होईल, तितके लवकर त्यावर उपचार सुरू करता येऊ शकतात. त्यामुळे मुलांच्या आगामी आयुष्यामध्ये येऊ घातलेल्या अडचणींवर उपाय मिळवणे शक्य होणार आहे. मुलांच्या पौगंडावस्थेतील, वैवाहिक, पालकत्वाचे ताण सहन करण्यासाठी दारू अथवा अन्य ड्रगस यांचा वापर रोखणे शक्य होईल.


जर्नल संदर्भ-
Merlijne Jaspers, Andrea F. de Winter, Mark Huisman, Frank C. Verhulst, Johan Ormel, Roy E. Stewart, Sijmen A. Reijneveld. Trajectories of Psychosocial Problems in Adolescents Predicted by Findings From Early Well-Child Assessments. Journal of Adolescent Health, 2012; DOI: 

सोमवार, ७ मे, २०१२

पाण्याशिवायही तग धरतात प्रथिने


प्रथिनांच्या वाढीसाठी पाण्याची गरज असल्याच्या समजुतीला बसला धक्का,
पाण्याशिवायही असू शकेल जीवन

----
रसायनशास्त्रामध्ये प्रथिनांच्या वाढीसाठी आणि तग धरण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, असे मानले जाते. मात्र इंग्लंडमधील ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या संशोधकांना हे गृहितक चुकिचे असल्याचे आढळून आले आहे. या संशोधनाचा फायदा विविध प्रकारची रासायनिक विकरे विकसित करण्यासाठी उद्योगांना होणार आहे. हे संशोधन केमिकल सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

प्रत्येक सजीवामध्ये प्रथिने हि मोलाची भुमिका बजावत असतात. अन्नाचे उर्जेमध्ये रुपांतर करण्यासाठी, रक्त व स्नायूंना ऑक्सीजन पुरवण्याच्या कार्यामध्ये हे सेंद्रिय घटक महत्त्वाचे असतात. तसेच सजीवांची प्रतिकारशक्ती वाढवितात. हि सर्व प्रथिने पाणी अधिक असलेल्या वातावरणामध्ये आढळत असल्याने आजवर जगण्यासाठी आणि काम करण्यासाठी ती पाण्यावर अवलंबून असल्याचे मानले जात होते. मात्र ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधक डॉ. अॅडम पेरीमॅन यांना स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर ऑक्सीजन वाहणारी मायोग्लोबिन प्रथिने ही पाण्याच्या कणांना दूर ठेवत कार्य करत असल्याचे आढळून आले आहे.

पाण्याचे तापमान आणि प्रथिनांची बांधणी
प्रथिनामध्ये अमिनो आम्लाची साखळी ही एक किंवा अनेक पेपटाईडच्या साह्याने बांधलेली असतात. हि पाण्यामध्ये असलेली प्रथिने उकळलेल्या पाण्यामध्ये सुटी होतात आणि त्यांची बांधणी विस्कळित होते.  तापमान कमी केल्यानंतर हि प्रक्रिया माघारी फिरवून पुन्हा बांधणी मिळवता येते. अंड्यातील प्रथिनामध्ये उकळल्यानंतर ही प्रथिने विस्कळित होऊन एकमेंकाना घट्ट पकडून त्यांचा घन तयार होतो. मात्र पाणी थंड केल्यानंतर ही प्रक्रिया माघारी नेता येत नाही. 

असे होतील या संशोधनाचे फायदे
- अनेक उद्योगामध्ये उष्णता प्रतिबंधकता हि महत्त्वाची असल्याने नवीन प्रकारची विकरे विकसित करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होऊ शकतो.
- इंधनाच्या ज्वलनातून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठी जैविक सेन्सर विकसित करण्यासाठी हे संशोधन फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे प्रदुषण कमी करणे शक्य होईल.


जर्नल संदर्भ-
Alex Brogan, Giuliano Siligardi, Rohanah Hussain, Adam Periman, Stephen Mann. Hyper-thermal stability and unprecedented re-folding of solvent-free liquid myoglobin. Chemical Science, 2012; DOI: 
  

सेर्स तंत्रज्ञानाचा वापर रोखेल विषबाधा


विषबाधेला कारणीभूत जिवाणूचा प्रादुर्भाव ओळखणे शक्य

फळे आणि भाजीपाल्यामध्ये आढळून येणाऱ्या सॅलमोनेला या जीवाणूंच्या प्रादु्र्भावामुळे विषबाधेचे प्रमाण वाढत आहे. या जिवाणूचा प्रादुर्भाव लवकर ओळखण्यासाठी अमेरिकेतील कृषी विभगाच्या संशोधकांनी प्रथमच सरफेस एनहान्सड रॅमन स्कॅटरींग (SERS) या अत्याधुनिक पद्धतीचा वापर केला आहे.  सॅलमोनेला आणि अन्य हानीकारक जिवाणूची ओळख पटवण्यासाठी ही पद्धत सहज, सोपी आणि विश्वासार्ह असल्याचे संशोधकांचे मत आहे. 
अमेरिकेतील रोग प्रतिबंधक व नियंत्रण संस्थेच्या अहवालानुसार, प्रति वर्ष सॅलमोनेला या जिवाणूमुळे होणाऱ्या विषबाधेने एक दशलक्ष लोक आजारी पडतात. त्यामुळे सॅलमोनेलाचा प्रादुर्भाव लवकरात लवकर ओळखण्याच्या दृष्टीने जगभरातील प्रयोगशाळा संशोधन करत आहेत. या जिवाणूंचा प्रादुर्भाव लवकरात लवकर ओळखण्यासाठी सेर्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानामध्ये अमेरिकेतील संशोधक बोसून पार्क यांनी काही सुधारणा केल्या आहेत. सेर्स ही अत्याधुनिक पद्धत अत्यंत सोपी व विश्वासार्ह आहे. या पद्धतीमुळे अन्न प्रक्रिया उद्योग त्यांच्या प्रयोगशाळेतही या जिवाणूचा प्रादु्र्भाव ओळखणे शक्य होणार आहे.
असे आहे सेर्स तंत्रज्ञान
सेर्स विश्लेषणासाठी पदार्थ हा स्टेनलेस स्टीलच्या प्लेटमध्ये ठेवण्यात येतो. या प्लेटचा मऊपणा कमी करण्यासाठी त्याच्या पृष्ठभागावर चांदीच्या अतिसुक्ष्म कणांचे गोलाकार थर देण्यात आले. या प्रकारचे पृष्ठभाग प्रकाशाच्या परावर्तनासाठी उपयुक्त ठरतात. या पृष्ठभागावर ठेवलेले पदार्थाची छाननी रॅमन स्पेक्ट्रोमीटरच्या लेसर झोताने केली जाते. पदार्थावर आपटून माघारी स्पेक्ट्रोमीटरमध्ये येणाऱ्या झोताला रॅमन स्पेक्ट्रल सिग्नेचर किंवा सिग्नल असे म्हटले जाते. सॅलमोनेला यांच्या सह अन्य सुक्ष्म जीवांचाही विसिष्ट असा सिग्नल उपलब्ध होतो.   कमी प्रमाणात असलेल्या किंवा प्रादु्रभावाच्या सुरवातीच्या अवस्थेतही सुक्ष्म जीवांचा प्रादुर्भाव ओळखता येणे  शक्य असल्याचे या संदर्भात झालेल्या प्रयोगात आढळून आलेले आहे.
 या संशोधनाचे निष्कर्ष अॅग्रीकल्चरल रिसर्च मॅगेझीन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
----

फोटोओळ- सेर्स या पद्धतीमध्ये चांदीच्या अतिसु्क्षम कणांच्या थरामुळे सॅलमोनेला सारख्या जीवाणूंची ओळख सहजतेने होण्यास मदत झाली आहे.

कॅनसह प्या सूप



खाण्यायोग्य पॅकेंजिग झाले विकसित,
हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधन
-----
सध्या अन्न पदार्थाच्या पॅकेजिंगसाठी प्लॅस्टीकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुऴे प्लॅस्टीकच्या प्रदूषणात वाढ होत आहे. मात्र आता खाता येईल, अशा प्रकारचे पॅकेंजिंग हारवर्ड विद्यापीठातील संशोधकानी विकसित केले आहे.  त्याचे नाव विकिसेल्स असे ठेवण्यात आले असून अन्न पदार्थांसाठी पॅकेजिंग आणि वाहतूकीसाठी प्लॅस्टीकचा वापर कमी करणे शक्य होणार आहे. येत्या वर्षाअखेरीपर्यंत लिंबाचा रस आता आपल्याला लिंबाच्या, पंपकिनचे सूप स्पिनॅचच्या किंवा वितळलेले चाॅकलेट चेरीचपासून विकसित केलेल्या पॅकेजिंगमध्ये उपलब्ध होऊ शकतील.
 प्लॅस्टीक आणि अन्य पॅकेंजिग मटेरियलमुळे पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी विघटन होऊ शकतील, किंवा खाता येतील अशा प्रकारची पॅकेजिंग तयार करण्यासाठी हाॅरव्ड विद्यापीठातील संशोधक डेव्हिड एडवर्ड यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या गटाने संशोधन केले आहे. त्यामुळे सफरचंदाला बाहेरून पातळ असा संरक्षक थर दिलेला असणार आहे. त्यामुळे फळांचे संरक्षण होण्यास मदत मिळणार आहे. म्हणजेच एखादा खाद्यपदार्थ खाता खाता त्याच्याबरोबर त्याचे पॅकेजिंग किंवा त्याचा कॅनही आपण खाऊ शकणार आहोत. याबाबत माहिती देताना डेव्हिड एडवर्ड यांनी सांगितले, की खाण्यायोग्य पदार्थाचे इलेक्ट्रोस्टॅटिक बलाच्या साह्याने भारीत कण पदार्थांच्या भोवती तयार करण्यात येतील. घन, द्रव या दोन्ही प्रकारच्या पदार्थांसाठी पॅकेजिंग वापरता येतील. हे पदार्थापासून वेगळे करता येतील किंवा त्यांच्यासह पदार्थ खाता येईल.

भविष्यातील पॅकेजिंगसाठी संशोधन व प्रसार
- पदार्थाची चव आणि खाण्याच्या अनुभवामध्ये बदल होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. पॅरीस येथील फुड लॅबमध्ये यावर संशोधन करण्यात येत आहे.
-सध्या कमी कालावधीसाठी ही पॅकेजिंग विकसित करण्यात आली असली तरी मध्यम आणि दिर्घ काळासाठी साठवण करण्यायोग्य पॅकेजिंग विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहेत.  तसेच सध्या दिवसाच्या वातारणामध्ये आणि फ्रिझमध्ये दिर्घ काळ साठवण शक्य आहे. मात्र त्यामध्येही काही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे एडवर्ड यांनी सांगितले.
- सध्या या पॅकेंजिगमधील खाद्यपदार्थाची विक्री पॅरीस येथील इन्व्हेन्शन बार येथे करण्यात येत आहे.
-या प्रकारच्या पॅकेजिंगचा प्रसार करण्यासाठी फ्रेंच डिझायनर फ्रान्कोइस अॅझमबोर्ग यांच्यासह या पॅकेंजिगचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

आता कीड व्यवस्थापनातही उपयुक्त ठरेल बारकोडींग



बार कोडींग म्हटले की आपल्याला सुपर मार्केट किंवा माॅलमध्ये विविध पॅकेटवर असणाऱ्या उभ्या कमी अधिक जाडीच्या रेषा डोळ्यासमोर येतात. मात्र अमेरिकेतील कृषी विभागातील संशोधकांनी गहू , बार्ली, बटाटे या पिकांवर येणाऱ्या किडीच्या मोजमापासाठी, निरीक्षणासाठी या डीएनए बार कोडचा वापर केला आहे. त्यामुळे किडीच्या नियंत्रण, व्यवस्थापन, व नियोजन करण्यासाठी या पद्धतीचा वापर करणे शक्य होणार आहे.

 किडीचे अनेक प्रकार हे त्यांच्यामध्ये असलेल्या साम्यामुळे ओळखताना शेतकऱ्यांना, तसेच निरीक्षण करणाऱ्या व्यक्तीला अडचणी येतात. त्यामुळे त्यांचे नियंत्रण करण्यासाठी नियोजन करता येत नाही. यावर अमेरिकेतील कृषी विभागाच्या संशोधकांनी डिएनए बारकोडींगचा उपाय शोधला आहे. या मध्ये किडीच्या जनुकांचे सुसंगतवार विश्लेषण केले असून त्यावर आधारीत बार कोड विकसित केले आहेत. पृथ्वीवर आढळून येणाऱ्या विविध प्रकारच्या वनस्पती, पिके आणि प्राण्याचे जनुकीय विश्लेषण सातत्याने केले जात असते. त्यामुळे पृथ्वीवरील जैवविविधतेची समग्र सूची विकसित करण्यात येत आहे. त्याचाच उपयोग हे बार कोड तयार करण्यासाठी करण्यात येत आहे.

कोलरॅडो पोटॅटो बीटल या बटाट्यावरील प्रमुख किडीचे बारकोडींग करण्यात आले आहे.

बेल्टव्हीले येथील हानीकारक कीड जैविक नियंत्रण आणि वर्तन प्रयोगशाळेतील कीटकशास्त्रज्ञ मॅथ्यू ग्रीनस्टोन यांनी डिएनए बारकोडींगचा वापर प्रथम कोलोरॅडो पोटॅटो बीटल या भुंग्यांच्या नियंत्रणासाठी केला आहे. ही कीड या विभागामधील बटाट्यावरील प्रमुख कीड मानली जाते. जैविक कीड नियंत्रणामध्ये विविध मित्रकीटकांचा हानीकराक किडी फस्त करण्याचा दर हा वेगळा असल्याने त्यांच्यामध्ये तुलना करण्यासाठी त्यांनी डिएनए बारकोडींग पद्धतीचा वापर केला आहे. 
ग्रीनस्टोन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बटाट्यावरील भुंग्यांच्या भक्षक किटकांच्या चार प्रजातीचा अभ्यास केला. हे चार ही प्रजातीचे कीटक गोळा करून प्रयोगशाळेमध्ये त्यांना खाद्य म्हणून बटाट्यावरील भुंगे देण्यात आले.  भक्षकांच्या पोटात गेल्यानंतरही किती काळापर्यंत त्यांची ओळख पटविता येते, याचा अभ्यास केला. मित्रकीटकांची कार्यक्षमता तपासण्यामध्ये बार कोडींगचा चांगला उपयोग होत असल्याचे त्यांच्या संशोधनात आढळले आहे.  त्यामुळे जैविक पद्धतीने कीडीच्या व्यवस्थापनाची कार्यक्षमता वाढविणे शक्य असून कीडींच्या नियंत्रणासाठी ही पद्धत उपयुक्त ठरली आहे. 

असे होते डिएनए बारकोडिंग
असे होते डिएनए बारकोडींग
या संशोधनाचे निष्कर्ष एन्टोमोलाॅजिया एक्सपेरीमेंटलीस इट अॅप्लीसिटा या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

लसूण रोखेल जिवाणूजन्य विषबाधा



लसणातील सल्फाईड घटकामध्ये जिवाणूजन्य रोगाना रोखण्याची क्षमता आहे.

चिकनच्या मांसातील कॉप्लीबॅक्टर जेजूनी जिवाणूमुळे डायरिया, पोटाचे विकार आणि ताप दिसून येतो.
लोकप्रिय प्रतिजैविकापेक्षा लसूण 100 पट अधिक कार्यक्षम

वॉशिग्टन राज्य विद्यापीठाच्या संशोधकांना लसणातील घटक हे लोकप्रिय असलेल्या दोन प्रतिजैविकापेक्षा 100 पट अधिक कार्यक्षम असल्याचे आढळून आले आहे. पोटाच्या विकारासाठी कॉम्पलोबॅक्टर हा जीवाणू कारणीभूत मानला जातो. त्याच्यावरील उपचारासाठी लसणातील घटकांचा वापर करणे शक्य आहे. हे संशोधन अन्न आणि मांसावर प्रक्रिया करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरणार आहे. या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल ऑफ अॅण्टीमायक्रोबीयल किमयोथेरपी मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

अन्नातून होणाऱ्या विषबाधेसाठी कॉम्पलोबॅक्टर जेजूनी (Campylobacter jejuni) हा जिवाणू कारणीभूत असतो. त्याला रोखण्यासाठी गेल्या 25 वर्षापासून संशोधन करणारे मायकेल कोन्केल यांनी सांगितले, की पर्यावरणामध्ये व अन्नामध्ये आढळणाऱ्या या रोगकारक जिवाणूमुळे रोगाचे प्रमाण वाढत आहे. सुमारे 2.4 दशलक्ष अमेरिकन लोकांच्या अनारोग्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या जिवाणूंना रोखण्यामध्ये लसणातील डायअॅलील सल्फाईड महत्त्वाची भुमिका निभावणार आहे.

असे आहे संशोधन
कॉम्पलोबॅक्टर जेजूनी हा जिवाणू स्वतःभोवती पातळ अशा जैविक फिल्म तयार करत असल्याने अन्य प्रतिजैविकांसाठी 1000 पट अधिक प्रतिकारक्षम आहे. मात्र लसणातील सल्फाईड हे घटक हे आवरण भेदून त्यांचा नाश करत असल्याचे झिओनान लू, मायकेल कोन्केल आणि अन्य संशोधकांच्या गटाने केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. अन्नातील विषबाधेसाठी कारणीभूत ठरणाऱ्या लिस्टेरिया मोनोसायटोजिन आणि ई. कोलाय सारख्या अन्य सुक्ष्म जीवांच्या बाबतीतही लसणातील सल्फाईड घटक अधिक चांगल्या प्रकारे कार्य करत असल्याचे आढळले आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगातून सुरक्षित अन्न तयार करण्यासाठी, त्यांची साठवण करण्यासाठी लसणाच्या या गुणधर्माचा फायदा होणार आहे.
-----
जर्नल संदर्भ-
 Xiaonan Lu, Derrick R. Samuelson, Barbara A. Rasco, and Michael E. Konkel. Antimicrobial effect of diallyl sulphide on Campylobacter jejuni biofilms. J. Antimicrob. Chemother., May 1, 2012

गुरुवार, ३ मे, २०१२

कलिंगडाच्या रसामुळे होतील स्नायूंच्या वेदना कमी



कलिंगडाच्या सालामध्ये असलेल्या अमिनो आम्लाचा वापर करून कलिंगडाच्या रसाची पोषकता वाढवण्यात स्पेनमधील संशोधकांना यश आले आहे. या कलिंगडाच्या रसाचा उपयोग स्नायूतील वेदना कमी करण्यासाठी होऊ शकत असल्याचे संशोधनात आढळले आहे.

प्रक्रिया उद्योगामध्ये कलिंगडाच्या गर आणि रस काढून घेतल्यानंतर साली टाकून दिल्या जातात. सालीमध्ये अमिनो आम्ले असतात, ही पोषक द्रव्ये वाया जातात. या पोषक द्रव्याचा रसासोबत वापर करून स्पेन येथील कार्टाजिना पाॅलिटेक्निक विद्यापीठातील संशोधकांनी कलिंगडाच्या रसामध्ये अमिनो आम्लाचे प्रमाण वाढवले आहे. त्याचा उपयोग स्नायूमधील वेदना कमी करण्यासाठी होऊ शकतो. विशेषतः खेळाडूंना खेळताना स्नायूनध्ये मोठ्या प्रमाणात जखमा होतात. या जखमामुळे होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी संशोधन करण्यात आले आहे. संस्थेतील पॅट्रीसिया मार्था टाराझोना यांनी त्यांच्या पीएचडीसाठी हे संशोधन केले आहे.


कलिंगडाच्या रसामध्ये एएसएल सीट्रूलिन सारखी अमिनो आम्ले असतात. त्यांचा वापर स्नायूंच्या वेदना कमी करण्यासाठी , त्यांना विश्रांती देण्यासाठी वापर केला जातो.याबाबत माहिती देताना टाराझोना यांनी सांगितले, की प्रयोगामध्ये हि अमिनो आम्ले औषधापेक्षा फळांच्या रसामधून पेशीमध्ये चांगल्या प्रकारे शोषली जातात.

बदलत्या तापमानात बदलला चिमण्यांचा स्थलांतर मार्ग

सोनेरी डोक्याची चिमणी मादी.  प्रजननासाठी पुर्वीपेक्षा दुप्पट अंतर कापून दक्षिणेकडे स्थलांतर करत असल्याचे आढळले आहे.

गोल्डन क्राऊन स्पॅरोचा नर



 खाद्य मिळवणे, प्रजनन यासारख्या विविध कारणासाठी पक्षी स्थलांतर करतात. विविध पक्ष्यांच्या स्थलांतराचा अभ्यास सातत्याने पक्षीतज्ज्ञ करत असतात. कॅलिफोर्नियातील सोनेरी डोक्याच्या चिमण्या वसंतामध्ये प्रजननासाठी स्थलांतर करतात. त्यांच्या शरीरावर टॅगींग करून त्यांच्या प्रवासाच्या मार्गाचा अभ्यास प्रथमच पीआरबीओ संवर्धन केंद्राने केला आहे. बदलत्या हवामानामध्ये त्यांच्या स्थलांतराच्या मार्गामध्ये होत असलेल्या बदलाचा अभ्यास या निमित्ताने करण्यात आलाल. सुरेल गाण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या चिमण्या वसंतामध्ये  पुर्वी या चिमण्या उत्तरेकडे प्रवास करत असत. मात्र या अभ्यासात दक्षिणेतील अलास्काच्या समुद्रकिनाऱ्यांच्या भागामध्ये प्रजननासाठी स्थलांतर करत असल्याचे आढळले आहे. या संशोधनाचे निष्कर्ष प्लॉसवन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.

जागतिक तापमान वाढीमुळे पशुपक्ष्यांवर विपरीत परीणाम होत आहेत. त्यांच्या प्रजनन आणि अन्य वर्तनामध्येही फरक होत आहेत. सोनेरी डोक्याच्या चिमण्या या वसंतामध्ये प्रजननासाठी उत्तरेकडे स्थलांतर करत असत. त्याबाबत अभ्यास करण्यासाठी पीआर बीओच्या संशोधकांनी चिमण्यांना टॅंगीग केले होते. संशोधिका डायना हंपल यांनी सांगितले, की हिवाळ्यामध्ये सुमारे 30 ग्रॅम वजनाच्या या चिमण्या 1600 ते 2400 मैलाचे अंतर कापून अलास्काच्या किनाऱ्यावर पोचतात. तिथे सुमारे 750 मैलांच्या परीघामध्ये त्यांचे वास्तव्य असते.   उत्तरेकडील स्थलांतरासाठी सरासरी 29 दिवस लागत असत, तर या दक्षिणेकडील प्रवासासाठी त्यांना दुप्पट म्हणजेच 53 दिवसापर्यंत कालावधी लागतो. प्रजननासाठी योग्य तापमान मिळविण्यासाठी सोनेरी डोक्याच्या चिमण्यांना अधिक प्रवास करत दुप्पट अंतर पार करावे लागत असल्याचे आढळले आहे.
स्थलांतराचा नकाशा

 

बुधवार, २ मे, २०१२

अल निनो वाढीचा आंध्रच्या उत्पादकतेवर होतो परीणाम


भारतीय मौसमी पावसाच्या प्रमाणावर अल निनो या घटकाचा परीणाम होत असतो. त्यामुळे आंध्र प्रदेशातील पावसाचे प्रमाण कमी होऊन शेतीच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परीणाम होतो. या परीणामाचा अभ्यास हैद्राबाद येथील केंद्रिय कोरडवाहू कृषी संशोधन संस्थेच्या (Crida) संशोधकांनी केला आहे. या संशोधकांच्या गटामध्ये व्ही. यू. एम. राव, ए. व्ही.एम. सुब्बाराव, बी. बापूजी राव, बी. व्ही. रामण्णा राव, सी. सर्वणी आणि बी. वेंकटस्वरलू यांचा समावेश होता. त्यांनी केलेल्या संशोधनामध्ये भारतातील अल निनो आणि नैऋत्य मोसमी पावसाचे संबंध हे एकमेंकाच्या विरोधी असल्याचे आढळले आहे.


असे आहे संशोधन
 - आंध्र प्रदेशाच्या रायल सीमा भागामध्ये अल निनोचा प्रभाव हा तेलंगणांच्या किनाऱ्याच्या भागापेक्षा अधिक प्रमाणात दिसून येतो. अनंतपूर आणि कुरनुल या जिल्ह्यामध्ये सरासरी नैऋत्य मोसमी पावसाच्या 20 टक्के अधिक विपरित परीणाम दिसून येतो. त्यामुळे भात, भूइमुग, बाजरी व दाळींच्या उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होते.
-ज्या वर्षी अल निनोचा प्रभाव कमी असतो, त्यावेळी नैऋत्य मोसमी पाऊस हा सरासरीएवढा होतो. आंध्रच्या किनाऱ्यांच्या भागामध्ये ईशान्य मोसमी पावसाचे प्रमाण त्यामुळे वाढते.
- ज्या वर्षी अल निनोच्या प्रभाव अधिक असतो, त्यावेळी राज्याच्या उत्पादनामध्ये घट येते. ही घट काही जिल्ह्यामध्ये 10 टक्क्यापेक्षा अधिक नोंदवली गेली आहे. खरीपात भुईमुगामध्ये 10 टक्के, भातामध्ये 12 टक्के एवढी घट होते. तर भात वगळता अन्य पिकांची उत्पादन आणि उत्पादकतेतील एकूण घट ही 25 टक्क्यापेक्षा अधिक भरते.

अल निनोबाबत अधिक माहिती
अल निनो आणि ल निना हे दोन्ही दक्षिण पॅसिफिक सागरातील पृठभागावरील तापमानापेक्षा अधिक किंवा कमी तापमानाचे प्रवाह आहेत. त्यांचे मोठे परिणाम हवामानावर दिसून येतात. अल निनोच्या गरम प्रवाहामुळे अन्नद्रव्ययुक्त खोल पाणी पृष्टभागावर येत नाही, त्यामुळे माशांच्या संख्येवर मोठ्या प्रमाणात परीणाम होतो. तसेच किनाऱ्यांच्या प्रदेशामध्ये पडणाऱ्या पावसावरही याचे परीणाम होतात.