वाढत्या सागरी तणे आणि शेवाळांना रोखण्यासाठी लहान मासेच ठरतील महत्त्वाचे
प्रवाळ आणि सागरी वनस्पतीमध्ये वेगाने वाढणाऱ्या तणामुळे प्रवाळ आणि वनस्पती यांचे जैवविविधता धोक्यात येत आहे. त्यामुळे सागरी पर्यावरणाचा ऱ्हास होत असून पर्यावरणावर आधारीत पर्यटन व्यवसायही धोक्यात आला आहे. पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेक लोकांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रवाळ बेटावरील प्रवाळाचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी वनस्पती खाणारे लहान मासे. महत्त्वाचे असल्याने त्यांच्यावर लक्ष केद्रीत करण्याची आवश्यकता असल्याचे मत ऑस्ट्रेलियातील जेम्स कूक विद्यापीठातील प्रवाळ अभ्यास संस्थेतील संशोधक लॉईक थिबाउट यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष इकॉलॉजी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
लॉक थिबाऊट पुढे म्हणाले की, वेगाने वाढणाऱ्या सागरी तण किंवा शेवाळामुळे प्रवाळ आणि उपयुकत वनस्पतीच्या वाढीला मर्यादा येतात. त्यांच्या वाढीच्या वेगाशी प्रवाळ हे स्पर्धा करू शकत नाही. एकदा ही प्रक्रिया घडली की पुन्हा प्रवाळ वाचवणे शक्य होत नाही. त्यामुळे शेवाळ आणि तणांच्या नियंत्रणासाठी शेवाळ खाणारे लहान मासे सागरी पर्यावरणामध्ये महत्त्वाचे आहेत.
लहान मासेच वाचवतील पर्यटन व्यवसाय
संशोधक सिन कॉनोली यांनी कॅरेबियन बेचावर 1980 पासून झालेल्या प्रवाळांच्या नुकसानीविषयी माहिती देताना सांगितले, की 1980 च्या दशकामध्ये झालेल्या बेसुमार मासेमारीमुळे शेवाळ खाणाऱ्या माशांची संख्या कमी झाली. त्याच बरोबर सी अर्चिनच्या संख्येत ही रोगामुले मोठ्या प्रमाणात घट झाली. त्यामुले शेवाळ आणि सागरी तणांना नियंत्रित ठेवणारे घटक कम ीझाल्ाने त्याचा परीणाम प्रवाळांवर झाला. प्रवाळांच्या रंगीबेरंगी दुनियेवर आधारीत असलेले पर्यटनावर त्याचा परीणाम झाला आहे. त्यामुळे या व्यवसायावर अवलंबून असलेला मोठा रोजगारही कमी झाला आहे.
पर्यावरणासाठी हे मासे महत्त्वाचे
प्रवाळाच्या संरक्षणासाठी महत्त्वाच्या माशाविषयी माहिती देताना डाॅ. ह्यूज स्विटमॅन यांनी सांगितले, की गेल्या 15 वर्षापासून प्रवाळ आणि शेवाळांच्या संख्येबाबत ऑस्ट्रेलियन सागरी शास्त्र विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून माशांच्या जैवविविधतेचे सागरी पर्यावरणातील महत्त्व अधोरेखित झाले आहे. शेवाळ खाण्याऱ्या माशांचे तीन प्रमुख प्रकार आहेत. त्यातील टेरिटोरिअल ग्रेजर हे शेवाळ खाण्यासोबत प्रवाळाच्या बाजूने लहान पट्ट्यामध्ये संरक्षणाचे कार्य करतात. रोव्ही ग्रेजर हे मासे प्रवाळाच्या सर्व बाजूने शेवाळ खातात. तर स्क्रपर मासे शेवाळाचे लचके तोडत अगदी लाईमस्टोनच्या पृष्टभागापर्यंत स्वच्छता करतात, त्यामुळे नव्या प्रवाळांच्या वाढीसाठी जागा उपलब्ध होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा