आसाममध्ये झाले सर्वेक्षण व संशोधन
गेल्या काही वर्षापासून चिमण्याची चिवचिव कमी ऐकायला मिळत असल्याची तक्रार पर्यावरणप्रेमी सातत्याने करत होते. देशाच्या पर्यावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या आसाममध्येही चिमण्याची संख्या वेगाने कमी होत असल्याचे दिसून आले आहे. त्या मागील कारणांचा शोध घेण्यासाठी आसाममधील लखीमपूर येथील प्रादेशिक कृषी संशोधन संस्थेने अभ्यास प्रकल्प राबवला होता. संपर्क यंत्रणेसाठी मोबाईल टॉवरच्या वाढत्या संख्येमुळे प्रसारीत होणाऱ्या विद्यूत चुंबकीय किरणांचा, वाहनामध्ये वापरल्या जाणाऱ्या शिसेयुक्त पेट्रोलच्या प्रदुषणाचा आणि कृषी क्षेत्रामध्ये वाढत अशलेल्या रसायने आणि कीडनाशकांचा हा विपरीत परिणाम असल्याचे दिसून आले आहे.
याबाबत माहिती देताना लखीमपूर येथील प्रादेशिक कृषी संशोधन संस्थेतील मुख्य संशोधक डॉ. प्रबळ सायकिया यांनी सांगितले, की पुर्वी दिखोमुख या ब्रम्हपूत्रा नदीच्या दिखॉव आणि मिटॉंग परिसरामध्ये चिमण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसली असली तरी सर्वेक्षण केलेल्या गुवाहाटी, लखिमपू, ढेमजी, सोनितपूर, जोरहाट आणि टिनसुकिया जिल्ह्यामध्ये मात्र अत्यंत कमी झाल्याचे दिसून आले आहे. त्याचे कारण शोधताना दिखॉवमुख परिसरामध्ये प्रदुषण अत्यंत कमी असल्याने त्यांची संख्या जास्त आहे.
र्यावरणवादी हिरेन दत्ता यांच्या नेचर्स बेकन या संस्थेने या पुर्वी केलेल्या सर्वेक्षणात वेरांदाह येथील क्रिस्नसिगा गावामध्ये चिमण्यांनी मोठी वसाहत केली असल्याचे दिसून आले आहे. दत्ता यांना चिमण्यांची पाच घरट्यामध्ये आठ चिमण्यांच्या जोड्या मोबाईल टॉवरच्या जवळ राहताना आढळल्या आहेत.
चिमण्यांची घटती संख्या आणि संशोधने
- पर्यावरण आणि वन मंत्रालयाने या विषयावर स्थापन केलेल्या समितीचे मुख्य व बॉम्बे नेचरल हिस्ट्री सोसायटीचे संचालक डॉ. असाद रहमनी यांनी मोबाईल टॉवरच्या किरणांचे वन्य प्राणी, पक्षी आणि मधमाशा यांच्यावर होणाऱ्या परिणामाचा अभ्यास केला होता. त्यांच्या अहवालानुसार, चिमण्या आणि मधमाशांच्या घटत्या संख्येसाठी मोबाईल टॉवर द्वारा प्रसारीत विद्यूतचुंबकिय किरणे जबाबदार आहेत.
- पंजाब विद्यापीठाने केलेल्या संशोधनामध्ये पक्ष्यांची 50 नवजात पिल्ले केवळ साडेपाच मिनिटांच्या विद्यातचुंबकिय किरणांच्या सान्निध्यात राहिल्याने नष्ट झाली असल्याचे आढळले होते. या किरणांमुळे चिमण्यांच्या पुनरुत्पादन क्षमतेवर परिणाम होत असून त्यांच्या दिशा समजण्याच्या क्षमतेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून आले आहे.
( वृत्तसंस्था )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा