पर्यावरणातील जैवविविधता कमी होत असल्याचा होतोय शहरी माणसावर विपरीत परिणाम,
फिनलॅंडमधील सर्वेक्षण
जीवनाच्या धावपळीत शहरातील लोकांचा निसर्गाशी संबंध वेगाने कमी होत आहे. निसर्गाशी असलेली जवळिक माणूस विसरत चालला आहे. त्याचे विपरित परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे फिनलॅंड येथील हेलसिन्कि विद्यापीठातील संशोधक डॉ. हन्स्की यांनी केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. त्वचा रोग आणि अँलर्जी यांच्या निसर्ग आमण जैवविविधतेशी असलेल्या संबंधाचे विश्लेषण करण्यासाठी पुर्व फिनलॅंडमधील 118 पौगंडावस्थेतील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. शहरातील मुलांसोबतच ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांमध्येही त्वचा रोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले. फार्म हाऊस किंवा जंगलांच्या जवळ राहणाऱ्या मुलांच्या त्वचेवर ही विविध प्रकारचे जिवाणू आढळून येतात. मात्र त्याचा त्वचेवर फारसा परिणाम होत नाही. मात्र तेच जिवाणू शहरातील मुलांच्या त्वचेवर आढळल्यास त्याचे विपरित परिणाम संवेदनशील त्वचेवर प्रामुख्याने दिसून येतात. ग्रामीण भागातही पर्यावरणातील जैवविविधता घटत असल्याचे परिणाम जाणवू लागले असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले.
हे संशोधन प्रोसिंडींग्स ऑफ नॅशनल अँकेडमी ऑफ सायन्सेस या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
सर्वेक्षणातील महत्त्वाचे...
-अँलर्जी साठी संवेदनशील लोकांच्या त्वचेवर गॅमाप्रोटिओबॅक्टेरिया (gammaproteobacteria) या कुळातील जिवाणूंची विविधता कमी अशल्याचे आढळून आले आहे. याच कुळातील अँसिनटोबॅक्टर (Acinetobacter) हा जिवाणू त्वचेवर रक्तवर्णीय चट्ट्याशी (IL-10 , आयएल 10 शी ) संबंधीत आहे.
- गॅमाप्रोटिओबॅक्टेरिया या त्वचेवर आढळणाऱ्या जिवाणूमुळे प्रतिकारकक सहनशीलता वाढते. त्यामुळे या जिवाणूंच्या जैवविविधतेमध्ये होणारी घट ही लक्षणीयरित्या त्वचा रोग व श्वासाशी संबंधीत रोगांमध्ये वाढ करत असल्याचे दिसून येते.
- पर्यावरणातील जैवविविधता कमी होत असल्याचा फटका मानवाला विविध आजाराद्वारे बसत असल्याचे स्पष्ट होत आहे.
जर्नल संदर्भ-
Environmental biodiversity, human microbiota, and allergy are interrelated. Ilkka Hanski, Leena von Hertzen, Nanna Fyhrquist, Kaisa Koskinen, Kaisa Torppa, Tiina Laatikainen, Piia Karisola, Petri Auvinen, Lars Paulin, Mika J. Mdkeld, Erkki Vartiainen, Timo U. Kosunen, Harr. Proceedings of the National Academy of Sciences, May 7, 2012 DOI:
फिनलॅंडमधील सर्वेक्षण
जगभरातील शहरातील लोकांच्या आरोग्याच्या समस्यामध्ये दमा, अन्य अँलर्जी यांचे प्रमाण वेगाने वाढत आहे. विविध प्रकारच्या सूक्ष्म जीवांची वाढ श्वासनलिका, त्वचा व आतड्यामध्ये होत असल्याचे पुरावे दिसून आले आहेत. याचा संबंध पर्यावरणातील जैवविविधता कमी होण्याशी असल्याचे फिनलॅंड येथील हेलसिन्कि विद्यापीठामध्ये झालेल्या संशोधनात दिसून आले आहे.
जीवनाच्या धावपळीत शहरातील लोकांचा निसर्गाशी संबंध वेगाने कमी होत आहे. निसर्गाशी असलेली जवळिक माणूस विसरत चालला आहे. त्याचे विपरित परिणाम मानवी आरोग्यावर होत असल्याचे फिनलॅंड येथील हेलसिन्कि विद्यापीठातील संशोधक डॉ. हन्स्की यांनी केलेल्या सर्वेक्षणात उघड झाले आहे. त्वचा रोग आणि अँलर्जी यांच्या निसर्ग आमण जैवविविधतेशी असलेल्या संबंधाचे विश्लेषण करण्यासाठी पुर्व फिनलॅंडमधील 118 पौगंडावस्थेतील मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले. शहरातील मुलांसोबतच ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलांमध्येही त्वचा रोगाचे प्रमाण वाढत असल्याचे आढळून आले. फार्म हाऊस किंवा जंगलांच्या जवळ राहणाऱ्या मुलांच्या त्वचेवर ही विविध प्रकारचे जिवाणू आढळून येतात. मात्र त्याचा त्वचेवर फारसा परिणाम होत नाही. मात्र तेच जिवाणू शहरातील मुलांच्या त्वचेवर आढळल्यास त्याचे विपरित परिणाम संवेदनशील त्वचेवर प्रामुख्याने दिसून येतात. ग्रामीण भागातही पर्यावरणातील जैवविविधता घटत असल्याचे परिणाम जाणवू लागले असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले.
हे संशोधन प्रोसिंडींग्स ऑफ नॅशनल अँकेडमी ऑफ सायन्सेस या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
अँसिनटोबॅक्टर |
-अँलर्जी साठी संवेदनशील लोकांच्या त्वचेवर गॅमाप्रोटिओबॅक्टेरिया (gammaproteobacteria) या कुळातील जिवाणूंची विविधता कमी अशल्याचे आढळून आले आहे. याच कुळातील अँसिनटोबॅक्टर (Acinetobacter) हा जिवाणू त्वचेवर रक्तवर्णीय चट्ट्याशी (IL-10 , आयएल 10 शी ) संबंधीत आहे.
- गॅमाप्रोटिओबॅक्टेरिया या त्वचेवर आढळणाऱ्या जिवाणूमुळे प्रतिकारकक सहनशीलता वाढते. त्यामुळे या जिवाणूंच्या जैवविविधतेमध्ये होणारी घट ही लक्षणीयरित्या त्वचा रोग व श्वासाशी संबंधीत रोगांमध्ये वाढ करत असल्याचे दिसून येते.
- पर्यावरणातील जैवविविधता कमी होत असल्याचा फटका मानवाला विविध आजाराद्वारे बसत असल्याचे स्पष्ट होत आहे.
जर्नल संदर्भ-
Environmental biodiversity, human microbiota, and allergy are interrelated. Ilkka Hanski, Leena von Hertzen, Nanna Fyhrquist, Kaisa Koskinen, Kaisa Torppa, Tiina Laatikainen, Piia Karisola, Petri Auvinen, Lars Paulin, Mika J. Mdkeld, Erkki Vartiainen, Timo U. Kosunen, Harr. Proceedings of the National Academy of Sciences, May 7, 2012 DOI:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा