नैसर्गिक घटकांचा वापर ठरेल उपयुक्त, ब्राझीलमध्ये झाला अभ्यास
ब्राझील येथील कृषी क्षेत्रासाठी अणू ऊर्जा संशोधन संस्थेने पपईच्या साठवणीचा कालावधी वाढवण्यासाठी एक अभ्यास प्रकल्प राबवला होता. त्यामध्ये विविध प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया, खाण्यायोग्य आवरण आणि किरणोत्साराचा वापर करण्यासंदर्भात अभ्यास करण्यात आला. त्यामुळे पपईचे आयुष्यकाळ 9 ते 15 दिवसापर्यंत वाढविणे शक्य होणार असून शेतापासून ग्राहकांपर्यंत चांगल्या दर्जाचे फळ उपलब्ध होण्यास मदत मिळणार आहे.
अमेरिकेमध्ये कमीत कमी प्रक्रिया केलेल्या पपईच्या फळांचे काप, कट आणि विविध प्रकार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. मात्र त्यांचा साठवण कालावधी हा सरासरी सहा दिवसापर्यंत असल्याने शेतकरी आणि ग्राहक दोघाच्या दृष्टीने ते आर्थिकदृष्ट्या फायद्याचे राहत नाही. हा आयुष्यकाळ वाढविण्यासाठी अभ्यास करणारे संशोधक सिल्व्हाना अलर्बटीनी यांनी सांगितले, की रासायनिक प्रक्रियाच्या साह्याने फळाच्या अधिक लवचिक व्यापारासाठी साठवण कालावधी वाढवण्यात येतो. मात्र सध्या ग्राहकामध्ये दर्जा, पोषकता आणि नैसर्गिकता याबाबत जागरूकता वाढत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांचा वापर करण्यासंदर्भात या अभ्यासामध्ये भर देण्यात आला. कॅल्शियम क्लोराईड (मीठ) , सिनॅनम्क एलडिहाईड ( सिनॅनमिन तेलापासून मिळवलेला घटक) या सारख्या घरगुती वापरातील नैसर्गिक घटकांचा वापर करण्याकडे लक्ष देण्यात आले. त्याच बरोबर पपईला खाण्यायोग्य आवरण तसेच किरणोत्साराचा वापर करण्यासाठी अभ्यास करण्यात आला, त्यामुले कमीत कमी प्रक्रिया केलेल्या फळांची साठवण करतानाच त्याचा दर्जा, अंतर्गत गुणधर्मामध्ये कोणताही बदल होणाऱ नाही, यावर भर देण्यात आला.
असे आहेत अभ्यासाचे निष्कर्ष
-पपईच्या तुकड्यांना कॅल्शियम क्लोराईड आणि सिनॅनमिक अलडिहाईड यांच्या वेगळ्या आणि एकत्रित प्रक्रिया केली असता, एकत्रित प्रक्रियेच्या पपईच्या तुकड्यांची साठवण 12 दिवसापर्यंत करता येत असल्याचे आढळून आले आहे. हे एकत्रित प्रक्रियेमुळे सुक्ष्म जीवांच्या वाढीलाही आळा बसत असल्याचे दिसून आले तरी, चवीमध्ये फरक पडतो. त्यामुळे त्यांचे प्रमाण मर्यादित ठेवण्याच्या म्हणजेच 0.1 टक्के पर्यंत ठेवल्यास चवीमध्ये फरक पडत नाही. कॅल्शिअम क्लोराईडचे प्रमाण 0.75 टक्के ठेवले तरी पपई 9 दिवसापर्यंत चांगल्या प्रकारे साठवता येते.
- पपईचे फळ कापल्यानंतर त्याची साठवण क्षमता वेगाने कमी होते. त्यासाठी नैसर्गिक खाण्यायोग्य आवरण वापरल्यास फळांतील पाण्याचे प्रमाण कायम राहून ऑक्सीजन, कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जनही रोखता येते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा