प्रथिनांच्या वाढीसाठी पाण्याची गरज असल्याच्या समजुतीला बसला धक्का,
पाण्याशिवायही असू शकेल जीवन
----
रसायनशास्त्रामध्ये प्रथिनांच्या वाढीसाठी आणि तग धरण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते, असे मानले जाते. मात्र इंग्लंडमधील ब्रिस्टॉल विद्यापीठाच्या संशोधकांना हे गृहितक चुकिचे असल्याचे आढळून आले आहे. या संशोधनाचा फायदा विविध प्रकारची रासायनिक विकरे विकसित करण्यासाठी उद्योगांना होणार आहे. हे संशोधन केमिकल सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
प्रत्येक सजीवामध्ये प्रथिने हि मोलाची भुमिका बजावत असतात. अन्नाचे उर्जेमध्ये रुपांतर करण्यासाठी, रक्त व स्नायूंना ऑक्सीजन पुरवण्याच्या कार्यामध्ये हे सेंद्रिय घटक महत्त्वाचे असतात. तसेच सजीवांची प्रतिकारशक्ती वाढवितात. हि सर्व प्रथिने पाणी अधिक असलेल्या वातावरणामध्ये आढळत असल्याने आजवर जगण्यासाठी आणि काम करण्यासाठी ती पाण्यावर अवलंबून असल्याचे मानले जात होते. मात्र ब्रिस्टॉल विद्यापीठातील संशोधक डॉ. अॅडम पेरीमॅन यांना स्पेक्ट्रोस्कोपिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यानंतर ऑक्सीजन वाहणारी मायोग्लोबिन प्रथिने ही पाण्याच्या कणांना दूर ठेवत कार्य करत असल्याचे आढळून आले आहे.
पाण्याचे तापमान आणि प्रथिनांची बांधणी
प्रथिनामध्ये अमिनो आम्लाची साखळी ही एक किंवा अनेक पेपटाईडच्या साह्याने बांधलेली असतात. हि पाण्यामध्ये असलेली प्रथिने उकळलेल्या पाण्यामध्ये सुटी होतात आणि त्यांची बांधणी विस्कळित होते. तापमान कमी केल्यानंतर हि प्रक्रिया माघारी फिरवून पुन्हा बांधणी मिळवता येते. अंड्यातील प्रथिनामध्ये उकळल्यानंतर ही प्रथिने विस्कळित होऊन एकमेंकाना घट्ट पकडून त्यांचा घन तयार होतो. मात्र पाणी थंड केल्यानंतर ही प्रक्रिया माघारी नेता येत नाही.
असे होतील या संशोधनाचे फायदे
- अनेक उद्योगामध्ये उष्णता प्रतिबंधकता हि महत्त्वाची असल्याने नवीन प्रकारची विकरे विकसित करण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होऊ शकतो.
- इंधनाच्या ज्वलनातून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड कमी करण्यासाठी जैविक सेन्सर विकसित करण्यासाठी हे संशोधन फायद्याचे ठरणार आहे. त्यामुळे प्रदुषण कमी करणे शक्य होईल.
जर्नल संदर्भ-
Alex Brogan, Giuliano Siligardi, Rohanah Hussain, Adam Periman, Stephen Mann. Hyper-thermal stability and unprecedented re-folding of solvent-free liquid myoglobin. Chemical Science, 2012; DOI:
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा