पुर्वी चष्मा हा चाळीशीनंतर लागायचा, त्यामुळे त्याला चाळीशी असा प्रतिशब्द मराठीमध्ये प्रचलित होता. नंतर च्या काळात लहान मुलापासून सर्व वयागटातील लोकांना चष्म्याची गरज पडत असते. त्यातच आता फॅशनसाठी गॉगल वापरणाऱ्यांची संख्याही काही कमी राहिली नाही. मात्र गुगल या विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये पुढारलेल्या कंपनीने नुकतीच एका नव्या अत्याधुनिक चष्म्याची झलक सर्वाना दाखवली. या चष्म्याचा उपयोग सुऱक्षा, व्यक्तीगत, फॅशन अशा अनेक कारणासाठी करता येणार आहे. त्यामुळे भविष्यातील या चष्म्यांनी अश्ररशः डोळे दिपतील अशा अनेक नव्या शक्यता आपल्यासमोर उघडल्या आहेत.
गुगल कंपनीने विकसित केलेल्या या अत्याधुनिक चष्म्यामुळे अनेक गोष्टी एकाचवेळी करता येणार आहेत. हा चष्मा एकाचवेळी आपल्याला ज्या ठिकाणी जायचे. त्याचे अंतर दाखवील, त्याचवेळी त्याचा फोनसारखा वापर करून आपण आपल्या मित्राशी बोलूही शकणार आहोत. आपल्याला एखाद्या गोष्टीचा फोटो घ्यायलाही हा चष्मा मदत करणार आहे. किंवा इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदीही करू शकणार आहे. किंवा आज संगणकाचे मॉनिटर ज्या गोष्टी करू शकते, त्या सर्व गोष्टी आपण चालता बोलता करू शकणार आहोत. याला गुगल कंपनीने प्रोजेक्ट ग्लास असे नाव दिले आहे. हे चष्मे थ्रीडी चष्म्यासारखे दिसत असले तरी स्वयंचलित कार पाठोपाठ येणारे गुगलचे नवे उत्पादन विज्ञान आणि तंत्रज्ञानातील एक चमत्कारच असेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा