सूक्ष्म दर्शकाचा वापर केल्यामुळे सजीवाच्या अत्यंत लहान मानल्या जाणाऱ्या पेशींच्या अंतर्गत अभ्यास सोपा झाला आहे. मात्र त्यासाठी ते सजीव हे त्यांच्या नैसर्गिक रहिवासापासून प्रयोगशाळेत आणावे लागतात. मोठ्या सजीवाच्या बाबत हे अवघड असे काम ठरते. त्यावर जर्मनीतील कार्लश्रुहे तंत्रज्ञान संस्था, मॅक्स प्लॅंक पॉलिमर रिसर्च इन्स्टिट्ट आणि अमेरिकन राष्ट्रीय आरोग्य संस्थेतील संशोधकांनी जिवंत माशांच्या पेशींची रचना पाहण्यासाठी नवी पद्धत विकसित केली आहे. या पद्धतीला मल्टीफोकल स्ट्रक्चरर्ड इल्युमिनेशन मायक्रोस्कोपी असे म्हणतात. त्याचा वापर एका मिलीमीटरच्या आठव्या भागाएवढ्या लहान माशाच्या पिल्लांच्या पेशीची रचना पाहण्यासाठी केला आहे. हे संशोधन नेचर मेथडस या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
झेब्राफिश या माशांची पिल्ले ही अत्यंत लहान आणि पारदर्शी असल्याने पेशींच्या जनुकिय रचनेचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त ठत असल्याची माहिती कार्लश्रुबे तंत्रज्ञान संस्थेतील संशोधिका मारिना मियॉन यांनी दिली. त्या माशांच्या त्वचेच्या पेशीतील मायक्रोट्यूबूली या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घटकावर संशोधन करत आहेत. या मायक्रोट्यूबूलींची लांबी 100 मायक्रोमीटर असून व्यास 20 नॅनोमीटर इतकी सूक्ष्म असते. ( मानवी केसांच्या जाडीच्या लाखाव्या भागाइतकी सूक्ष्म असते. ) या मायक्रोट्युबूली पेशीमध्ये सर्वत्र आढळतात. त्यांची आवश्यकता ही पेशीविभाजनासाठी आणि गतीसाठी असते.
अशी आहे नवी मल्टीफोकल स्ट्रक्चरर्ड इल्युमिनेशन मायक्रोस्कोपी
नवीन सूक्ष्म दर्शकिय (मायक्रोस्कोपी) तंत्रज्ञानामध्ये संपुर्ण पदार्थावर प्रकाश न टाकता, त्यातील आवश्यक अशा भागावर विशिष्ट प्रकाशाची सोय केलेली असते. प्रकाशाचे पारवर्तन कमी करून योग्य ते भाग प्रकाशात आल्यानंतर त्यांच्या अनेक प्रतिमा घेतल्या जातात. विविध प्रकारच्या प्रकाशांची तीव्रता मिळविण्यासाठी संगणकाचा वापर केला जातो. संपुर्ण प्रतिमा एकत्रीकरणातून मिळवली जाते.
- या प्रकाशांच्या पद्धतीमुळे विविध खोलीपर्यंतच्या प्रतिमा मिळवता येतात. अशा अनेक प्रतिमांचा वापर करून संगणकाच्या साह्याने त्रिमीतीय प्रतिमा मिळू शकतात.
- प्रतिमा घेताना 145 नॅनोमीटर पर्यंत द्वीमीतीय आणि 400 नॅनोमीटर पर्यंत त्रिमितीय प्रतिमा मिळू शकतात.
- या प्रतिमा घेण्यासाठी काही सेकंदाचा कालावधी लागत असल्याने ब्लर इमेज येत नाही.
- एकामागून एक घेतलेल्या प्रतिमाच्या माध्यमातून मायक्रोट्युबूलीच्या हालचालीचा व्हिडीओ मिळवता येतो.
माशांच्या त्वचेखाली 45 मायक्रोमीटर खाली लॅटरल लाईन तयार होण्याच्या सुरवातीच्या काळातील 60 मिनिटांची छायाचित्रे प्रयोगाच्या दरम्यान मिळवण्यात आली. या लॅटरल लाईनमुळे माशांना पाण्यातील प्रवाहामध्ये होणाऱ्या बदलांचा जाणिव होते. आगामी काळात माशांतील व्हर्टाब्रेटच्या विकासाच्या माशांच्या जिवंत अवस्थेतच प्रतिमा मिळू शकतील. त्यातून संशोधनासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल.
- या संशोधकांच्या गटामध्ये सपून पारेख, अजय चिटणिस आणि हरी श्रॉफ या भारतीय वंशाच्या संशोधकासह अॅण्ड्रू यॉर्क, डॅमियन दल्ले नोगार, रॉबर्ट फिशर, क्रिस्टियन कोम्ब यांचा समावेश होता.
गिनीपीग म्हणून वाढतोय झेब्रा फिशचा वापर
गोड्या पाण्यात वाढणाऱ्या झेब्रा फिश हे लहान तरिही त्यांच्यामधील प्रत्येक अवयव हा व्यवस्थितपणे वेगळे दिसून शकतील, एवढे मोठे आहेत. झेब्रा फिश अधिक पुनरुत्पादनक्षम असून प्रयोगशाळेत वाढवणे शक्य आहे. त्यांचा आयुष्यकाळ कमी असून अधिक पिल्लांना जन्म देतात. पृष्टवंशीय प्राण्यामध्ये मानवासारखेच काही घटक समान असल्याने त्यांचा वापर प्रयोगशाळेत प्रयोगासाठी केला जातो.
----------
हिरव्या रंगाच्या चमकदार प्रकाशामध्ये जिवंत माशाच्या पेशीतील मायक्रोट्यूबूलीचा अभ्यास करता येतो.(स्रोत- एनआयएच आणि केआयटी )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा