खाण्यायोग्य पॅकेंजिग झाले विकसित,
हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधन
-----हार्वर्ड विद्यापीठाचे संशोधन
सध्या अन्न पदार्थाच्या पॅकेजिंगसाठी प्लॅस्टीकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. त्यामुऴे प्लॅस्टीकच्या प्रदूषणात वाढ होत आहे. मात्र आता खाता येईल, अशा प्रकारचे पॅकेंजिंग हारवर्ड विद्यापीठातील संशोधकानी विकसित केले आहे. त्याचे नाव विकिसेल्स असे ठेवण्यात आले असून अन्न पदार्थांसाठी पॅकेजिंग आणि वाहतूकीसाठी प्लॅस्टीकचा वापर कमी करणे शक्य होणार आहे. येत्या वर्षाअखेरीपर्यंत लिंबाचा रस आता आपल्याला लिंबाच्या, पंपकिनचे सूप स्पिनॅचच्या किंवा वितळलेले चाॅकलेट चेरीचपासून विकसित केलेल्या पॅकेजिंगमध्ये उपलब्ध होऊ शकतील.
प्लॅस्टीक आणि अन्य पॅकेंजिग मटेरियलमुळे पर्यावरणात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. हे टाळण्यासाठी विघटन होऊ शकतील, किंवा खाता येतील अशा प्रकारची पॅकेजिंग तयार करण्यासाठी हाॅरव्ड विद्यापीठातील संशोधक डेव्हिड एडवर्ड यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या गटाने संशोधन केले आहे. त्यामुळे सफरचंदाला बाहेरून पातळ असा संरक्षक थर दिलेला असणार आहे. त्यामुळे फळांचे संरक्षण होण्यास मदत मिळणार आहे. म्हणजेच एखादा खाद्यपदार्थ खाता खाता त्याच्याबरोबर त्याचे पॅकेजिंग किंवा त्याचा कॅनही आपण खाऊ शकणार आहोत. याबाबत माहिती देताना डेव्हिड एडवर्ड यांनी सांगितले, की खाण्यायोग्य पदार्थाचे इलेक्ट्रोस्टॅटिक बलाच्या साह्याने भारीत कण पदार्थांच्या भोवती तयार करण्यात येतील. घन, द्रव या दोन्ही प्रकारच्या पदार्थांसाठी पॅकेजिंग वापरता येतील. हे पदार्थापासून वेगळे करता येतील किंवा त्यांच्यासह पदार्थ खाता येईल.
भविष्यातील पॅकेजिंगसाठी संशोधन व प्रसार
- पदार्थाची चव आणि खाण्याच्या अनुभवामध्ये बदल होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. पॅरीस येथील फुड लॅबमध्ये यावर संशोधन करण्यात येत आहे.
-सध्या कमी कालावधीसाठी ही पॅकेजिंग विकसित करण्यात आली असली तरी मध्यम आणि दिर्घ काळासाठी साठवण करण्यायोग्य पॅकेजिंग विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहेत. तसेच सध्या दिवसाच्या वातारणामध्ये आणि फ्रिझमध्ये दिर्घ काळ साठवण शक्य आहे. मात्र त्यामध्येही काही सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे एडवर्ड यांनी सांगितले.
- सध्या या पॅकेंजिगमधील खाद्यपदार्थाची विक्री पॅरीस येथील इन्व्हेन्शन बार येथे करण्यात येत आहे.
-या प्रकारच्या पॅकेजिंगचा प्रसार करण्यासाठी फ्रेंच डिझायनर फ्रान्कोइस अॅझमबोर्ग यांच्यासह या पॅकेंजिगचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा