मोबाईलमध्येच सूक्ष्म दर्शक उपलब्ध झाल्याने ग्राणी भागातील वैद्यकीय कर्मचारी आणि सर्वासमान्य शेतकऱ्यांचा फायदा होईल. |
आपण शेतकरी लोक शेतामध्ये फिरत असतो. फिरताना आपल्याला पानावर काही लक्षणे दिसतात, त्यांचे निरीक्षण करण्यासाठी भिंग अथवा सूक्ष्मदर्शक असता तर किती बरे झाले असते असे वाटून जाते. कारण सूक्ष्म अशा जिवाणू आणि विषाणूमुळे पानावर लक्षणे दिसेपर्यंत उशीर होऊ शकतो. मात्र फिनलॅंड येथील तंत्रज्ञानी मोबाईल सूक्ष्मदर्शकाचे कार्य करू शकेल, असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. या मोबाईल सबक्ष्मदर्शकाच्या साह्याने एक मिलिमीटरच्या 100 व्या भागाइतके सूक्ष्म पाहता येऊ शकेल. तसेच त्याच्या प्रतिमा त्या मोबाईलमध्ये असलेल्या कॅमेराच्या साह्याने घेता येतील.
मोबाईल सूक्ष्मदर्शकातून अत्यंत सूक्ष्म पेशीपर्यत पाहता येईल. |
फिनलॅंड येथील व्हीटीटी टेक्नीकल रिसर्च संस्थेतील संशोधकांनी साध्या कॅमेरा फोनमध्ये बसवता येईल, अशी भिंगाची जोड तयार केली आहे. त्यामुळे साध्या फोनचे रुपांतर उच्च दर्जाच्या सूक्ष्म दर्शकामध्ये (मायक्रोस्कोप) होणार आहे. एलईडी लाईट आणि ऑप्टिकल लेन्स यांच्या एकत्रित प्रयत्नातून चांगल्या दर्जाच्या प्रतिमा घेता येणार आहे. या प्रतिमा एमएमएस च्या माध्यमातून पाठवता येणे शक्य होईल. म्हणजे शेतात आढळलेल्या रोगांच्या लक्षणांची प्रतिमा लगेच एमएमएस द्वारे तज्ज्ञापर्यंत पोचवता येणार आहे. त्यामुळे त्यावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळवणे सोपे जाणार आहे.
या प्रकारचे पहिले व्यावसायिक उपकरण किपलूप ओवाय आणि व्हीटीटी यांच्या संयुक्त कंपनी मार्फत 2012 च्या मध्यापर्यंत बाजारात आणण्याचा मानस आहे. असे होतील मोबाईल सूक्ष्मदर्शकाचे फायदे
- एक लहान, पातळ चुंबकिय सूक्ष्मदर्शक मोबाईलसोबत असणार आहे. हा अत्यंत हलका असल्याने खिशामध्ये सहजतेने नेता येऊ शकेल. या उपकरणामुळे मोबाईलच्या लेन्समधून वस्तू मोठ्या दिसू शकतील. कॅमेराची फिल्ड ही 2 बाय 3 मिलीमीटर इतकी असेल. उपकरणामध्ये असलेल्या एलइडी प्रकाशामुळे विविध कोनातून प्रकाश घेता येऊन प्रतिमा अत्यंत सुस्पष्ट मिळवता येईल.
- केवळ एक सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये टाकल्यास गरजेनुसार त्रिमितीय प्रतिमाही या माध्यमातून मिळवता येतील. त्रिमितीय नकाशेही अत्यंत अचूकपणे मिळतील.
कॅलिफोर्निया विद्यापीठातही मोबाईल सूक्ष्मदर्शकावर संशोधन केले जात असून कोणत्याही अँटेचमेंटशिवाय सूक्ष्मदर्शक उपलब्ध करण्यात येत आहे. |
-पिकावरील किडी रोगाचे निरीक्षण करणे शक्य होणार आहे. त्यामुळे अचूकपणे रोग व किडीची ओळख झाल्याने नियंत्रण करण्यामध्ये मदत मिळणार आहे. पर्यावरण तज्ज्ञ, कृषी संशोधक, वस्त्रोद्योगातील तज्ज्ञ यांच्यासाठी हे उपकरण अत्यंत उपयोगाचे राहणार आहे. या संशोधनाचे फायदे शेतकरी, आरोग्य कर्मचारी, मुद्रण व्यवसायातील लोक यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा