उत्क्रांतीच्या विविध टप्प्यावर पडू शकतो प्रकाश
गेल्या काही दशकापर्यंत जमिनीवर चालणाऱ्या किंवा रहिवास करणाऱ्या प्राण्याचे मणके आणि फासळ्या हे वैशिष्ट मानले जात असत. त्याचा उपयोग त्याला चालण्यासाठी व शरीराला स्थिरता मिळवण्यासाठी होतो. मात्र 345 दशलक्ष वर्षापुर्वीचे इल या माशाचे जिवाष्म मिळाले असून त्यामध्ये मानवासारखे मणके आणि फासळ्या असल्याचे आढळले आहे. अर्थात ही गुंतागुंतीची संरचना असून पाण्यातून जमिनीवर येण्यापुर्वीच्या प्राण्यातील असणाची शक्यता असल्याने महत्त्वाची आहे.
359 दशलक्ष ते 318 दशलक्ष वर्षापुर्वीच्या ( कार्बोनिफेरस पिरीयड) कालावधीमध्ये आता स्कॉटलॅंडमध्ये असलेल्या सागरात उल माशासारखा टॅरासियस प्रोब्लेमॅटिकस (Tarrasius problematicus ) हा प्राणी राहत होता. अन्य पृष्टवंशीय माशाप्रमाणे त्यांची शरीर आणि शेपटी अशी रचना असायला पाहिजे होती. मात्र त्याची रचना ही जमिनीवर राहणाऱ्या प्राण्यासारखी असल्याचे प्रोसिडींग ऑफ रॉयल सोसायटी बी या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
सॅलन यांनी टॅरासियस प्राण्याची उत्क्रांती रे पिन माशामध्ये विकसित झाली असल्याच्या शक्यतेने संशोधनाला सुरूवात केली होती. त्यासाठी एडिंनबर्ग राष्ट्रीय संग्रहालयातील ज्यांची ओळख पटली नव्हती अशा जिवाश्मांचा अभ्यास केला. त्यामध्ये प्राचीन काळच्या माशांच्या जिवाश्मामध्ये टॅरासियस माशांच्या हाडाची रचना ही वेगळी असल्याचे दिसून आले. हि रचना चालण्याऐवडी पोहण्यासाठी विकसित झाली असावी. जमिनीवरील प्राणी विकसित झाल्यानंतरच्या काळातही हा प्राणी अस्तित्वात होता. आताच्या टेटपोल या उभयचर प्राण्याप्रमाणे किंवा रे फिश प्रमाणे हि रचना असून शेपटीच्या साह्याने हा प्राणी पोहताना स्थिरता मिळवत असावा. हि गोष्ट पुर्वीच्या अभ्यासकाकडून दुर्लक्ष झाले असण्याची शक्यता आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा