शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

रॉकवूल, कोकोपीट, पीट या सह दहा माध्यमांचा होतोय तुलनात्मक अभ्यास

नेदरलॅंडमध्ये पिकांसाठी योग्य माध्यमाचा घेतला जातोय शोध

रॉकवूल, कोकोपीट, पीट या सह दहा माध्यमांचा होतोय तुलनात्मक अभ्यास

पिकांच्या वाढीसाठी माती हेच माध्यम सर्वसामान्यपणे वापरले जाते. तसेच आधुनिक शेतीमध्ये विशेषतः हरितगृहामध्ये पीट, रॉकवूल, कोकोपीट या सारख्या माध्यमांचा वापर वाढत आहे. या पैकी पिकांच्या वाढीसाठी अधिक योग्य गुणधर्म असलेल्या माध्यमांचा शोध घेण्यासाठी नेदरलॅंडमध्ये तुलनात्मक अभ्यास करण्यात येत आहे.

माती ही मुबलक असल्याने त्यांचा वापर पारंपरिकपणे शेतीसाठी होत असतो. आधुनिक शेतीमध्ये निर्यातक्षम शेती करताना विविध प्रकारच्या 17 माध्यमांचा वापर पिकांच्या रोगमुक्त वाढीसाठी केला जातो. मात्र, त्यातील काही माध्यमे ही दरवर्षी बदलावी लागत असल्याने शेतकऱ्यांच्या खर्चामध्ये वाढ होते. त्यामुळे अधिक काळ टिकणाऱ्या माध्यमांचा शोध घेण्यासाठी तुलनात्मक अभ्यास ऍग्रो रिसर्च या नेदरलॅंड येथील संशोधन आणि सल्ला सेवा देणाऱ्या संस्थेने केला आहे.
त्याबाबत माहिती देताना संस्थेचे प्रवक्ते किज ऍमरलऍन यांनी सांगितले, की नेदरलॅंडमध्ये वापरल्या जात असलेल्या दहा प्रकारच्या माध्यमांचा अभ्यास करण्यात आला. त्यात पीट, रॉकवून आणि कोकोपीट यांचा समावेश होता. त्यावर तीन आठवड्यांकरिता रासायनिक व तापमानाची प्रक्रिया करण्यात येते. त्यानंतर त्याच्या चाचण्या घेण्यात येतात. त्यासाठी उत्पादकाकडून नमुने मिळवले जातात.  अशा चाचण्या दर वर्षी केल्या जातात. तीनवर्षापूर्वी केलेल्या चाचणीमध्ये फोम उत्पादने या परिक्षेत उतरली नव्हती. ती बाजारातून मागे घ्यावी लागली होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा