शनिवार, ७ सप्टेंबर, २०१३

अमेरिकेत लिंबूवर्गीय पिकांच्या रोपासाठी नियंत्रीत रोपवाटिकांचा आग्रह

अमेरिकेत लिंबूवर्गीय पिकांच्या रोपासाठी नियंत्रीत रोपवाटिकांचा आग्रह

कोकोपीट माध्यमांचा वापर ठरतोय फायद्याचा

लिंबूवर्गीय पिकांची रोपे तयार करण्यासाठी कोकोपीट आणि हायड्रोपोनिक्स पद्धतीचा वापर अमेरिकेतील फ्लोरिडा या राज्यामध्ये वाढत आहे. या पद्धतीमुळे रोपांच्या वाढी दरम्यान आणि पुनर्लागवडीदरम्यान रोपांना ताण निर्माण होत नसल्याने पुनर्लागवड यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक आहे. तसेच सिट्रस ग्रीनिंग या रोगाचा प्रादुर्बाव कमी करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरत असल्याचे दिसून आले आहे.
अमेरिकेमध्ये फ्लोरिडा आणि कॅलिफोर्निया या प्रांतामध्ये सिट्रस ग्रिनिंग या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोपांची निर्मिती ही नियंत्रित वातावरणामध्ये मातीशिवाय निर्जंतुकिकरण केलेल्या माध्यमामध्ये करण्याचा आग्रह पिक संरक्षण विभागाकडून केला जात आहे. त्यामुळे उत्पादकांना रोगमुक्त रोपे उपलब्ध होण्यास वाव मिळेल.

कोकोपीटमध्ये मिळतात एक सारखी रोपे
- कोकोपीट हे माध्यम लिंबुवर्गीय पिकांच्या रोप निर्मितीसाठी उपयुक्त ठरते.या पद्धतीमुळे रोप तयार होण्याचा कालावधी सहा महिन्यापर्यत कमी होतो.
- नियंत्रित वातावरणामध्ये रोपांची एकसारखी वाढ होते. त्यामुले बागेमध्ये एकाच वेळी लागवड केलेल्या रोपांची एकसारखी वाढ होण्यास मदत होते.
-एकाच वेळी अधिक रोपे तयार करणे शक्य होते.
-  कोकोपीटमध्ये मुळांची चांगली वाढ होते. मुळांना विशेषतः पांढऱ्या मुळांना इजा होत नाही. कोकोपीटमध्ये पाणी आणि अन्नद्रव्यांचे योग्य प्रमाण ठेवल्याने वाहतूक, हाताळणी, रोप लागवड आणि अन्य प्रक्रियामध्ये रोपांवर येणारा ताण कमी होण्यास मदत होते.
- निर्जंतुकिकरणामुळे निर्यातीचे विविध निकष पार करणे शक्य असल्याने रोपांची निर्यात वाढण्यास मदत होते.
- रोगांचे प्रमाण कमी होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा