रोपांच्या वाढीवर परिणाम करतो कुंड्यांचा रंग
मुळांच्या परिसरातील तापमान ठरते पिकाच्या वाढीसाठी निर्णायक
रोपाच्या वाढीवर व आरोग्यावर कुंड्यांच्या रंगाचा परिणाम होत असल्याचे कान्सास राज्य विद्यापीठातील फळबाग शास्त्र विभागातील संशोधक जॉन मार्खम (तृतीय), डेल ब्रेमर, चार्ल बॉयर आणि केनेथ श्रोडर यांना दिसून आले आहे. रोपाच्या लागवडीसाठी साधारणतः काळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या कुंड्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र, या संशोधनाच्या निष्कर्षानंतर कुंड्या निर्मिती उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याची गरज दिसून आली आहे. हे संशोधन हॉर्टी सायन्स या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.
रोपांची निर्मिती करताना सुरवातीच्या काळात अत्यंत काळजी घेण्याची आवश्यकता असते. रोपवाटिकेमध्ये वापरल्या जाणाऱ्या काळ्या रंगाच्या कुंड्यांमुळे उष्णता शोषून घेतली जाते. पर्यायाने रोपांच्या मुळांच्या परिसरामध्ये तापमानात वाढ होते. ही वाढ 30 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास, त्यांच्या रोपाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतोत. काही पिकांच्या बाबतील हे तापमान 39 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक झाल्यास रोपांची वाढ पुर्णपणे थांबत असल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. मुळांच्या परिसरात अधिक तापमान असलेल्या रोपामध्ये कुज रोगाचे प्रमाण वाढतो, फुलांची संख्या व दर्जा कमी होते. तसेच पिकांच्या वाढीच्या अवस्थेत भौतिक आणि प्रकाश संश्लेषण, बाष्पोत्सर्जन या सारख्या जैवरासायनिक प्रक्रियामध्ये बदल होतात. तापमान वाढल्यास रोपांमध्ये कायमस्वरुपी इजा होऊन रोप मरू शकते.
असा झाला प्रयोग
संशोधकांनी रोपांच्या वाढीसाठी विविध रंगाच्या कुंड्याचा वापर करीत प्रयोग केला. सपाट आकाराच्या पांढऱ्या, चंदेरी आणि काळ्या रंगाच्या कुंड्यामध्ये बुश बीन्स, रेड मॅपल आणि इस्टर्न रेडबड यांची लागवड केली. तसेच काही झाडासाठी हिरव्या रंगाच्या कुंड्यांचा वापर केला. या पिकांमध्ये गडद काळ्या रंगाच्या कुंड्यातील मुळांच्या वाढीवर तसेच फुटव्यांच्या वाढीवर परिणाम दिसून आला.
- वाढीसाठी मातीशिवाय अन्य माध्यमांचा वापर केल्याने कुंड्यातील पाच सेंटीमीटर खोलीवरील दक्षिणेकडील , मध्यावरील तापमान मोजण्यात आले.
तसेच सातत्याने चार महिने विविध घटकांच्या निकषावर पिकांच्या वाढीचे मोजमाप घेण्यात आले.
निष्कर्ष ः
- तापमानाला संवेदनशील असलेल्या पिकांच्या वाढ पांढऱ्या रंगाच्या कुंड्यांमध्ये चांगली झाल्याचे दिसून आले. तसेच ज्या हिरव्या आणि काळ्या कुंड्यांना बाहेरून पांढरा रंग दिला होता, त्यामध्ये वाढ चांगली झाली.
- रेडबड यापेक्षा रेड मॅपल हे पीक अधिक तापमान संवेदनशील असल्याचे दिसून आले आहे. त्याची वाढ पांढऱ्या रंगाने रंगवलेल्या कुंड्यामध्ये चांगली होते.
- रेडबड या रोपांच्या वाढीवर कुंड्यांच्या रंगाचा फारसा परिणाम दिसून आला नाही.
- पांढऱ्या रंगाच्या कुंड्यामध्ये या दोन्ही पिकांची वाढ चांगली होत असून चंदेरी रंगामध्ये मुळांचा परिसर अधिक थंड राहत असल्याचे दिसून आले.
- त्यामुळे रोपवाटिकेमध्ये तापमान संवेदनशील पिकांसाठी पांढऱ्या रंगाच्या कुंड्या वापरल्यास फायदा होऊ शकतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा